पुणे – आम आदमी रिक्षा संघटनेच्या वतीने ओला रिक्षाच्या जाहीरातींना काळे फासण्यात आले. ओला कंपनीने शहरभर 29 रुपयांत चार किलोमीटरचा रिक्षा प्रवास अशी जाहीरात केली आहे. ही जाहीरात तसेच ऑफर बेकायदा असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांचे भंग करणारी आहे. रिक्षाचा दर ठरविण्याचा अधिकार आरटीओला असताना ओला कंपनी परस्पर 29 रुपयांत चार किलोमीटर अशी जाहीरात करत आहे.
No comments:
Post a Comment