Wednesday, 31 January 2018

सारथी फाउंडेशनचे नवे पोर्टल

नागरिक व पालिका यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणार

[Video] गावडे कॉलनी, चिंचवड येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त स्वच्छता अभियान रॅली


पिंपरी-चिंचवड नागरिक पोर्टलचे अनावरण: पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद

शहरातील नागरिकांना नाविन्यपूर्ण डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने PimpriChinchwad.ORG या संकेतस्थळाची सुरुवात करण्यात आली आहे. 69 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (26 जानेवारी) या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

Health & vigil go hand in hand for Sangvi cops’ cycle brigade

Pune: Traffic constable Kunal Shinde has shed three kilos in just a month. "Cycling every day has increased my stamina and I can work more efficiently throughout the day," his colleague Santosh Jadhav said.

शिवसृष्टी उद्यानातील नवीन खेळणी बालचमुंसाठी खुली

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानात बसविण्यात आलेली नविन खेळणी बालचमुंसाठी खुली करण्यात आली. या उद्यानात शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा इतिहास शिल्पांमधून साकारलेला आहे. याच बरोबर येथे पिंपरी चिंचवड शहरातील मोठे आध्यात्मिक ध्यान धारणा केंद्र या उद्यानात आहे. 

‘अजंठानगर’ प्रकल्पाशेजारी वाढतेय झोपडपट्टी

पिंपरी - शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी झोपडपट्ट्यांचे सरकार पुनर्वसन करते. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे सरकारच्या या हेतूला हरताळ फासत आहे. असाच प्रकार अजंठानगर पुनर्वसन प्रकल्पाच्या बाबतीत घडला आहे. पुनर्वसन झालेल्या झोपड्या त्याच ठिकाणी आहेत, तर शेजारी झोपडपट्टी वाढत असून, अनेकांना एकापेक्षा जास्त सदनिका दिल्याच्या तक्रारी सरकार दरबारी दाखल आहेत. प्रकल्पात सदनिका वाटपात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी. के. दोडके यांनी पुराव्यानिशी मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

कासारवाडीतील शाळेला खासदार रेखा कडून ३ कोटींचा निधी; नगरसेवक शाम लांडे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्‍या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा यांच्या खासदार निधीतून ३ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे. या निधीसाठी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला आहे.

पिंपरी न्यायालयात मोफत वकील

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी न्यायालयात केस चालविण्यासाठी ‘रिमांड अॅडव्होकेट’ म्हणून अॅड.अतिश लांडगे व अॅड. प्रसन्ना लोखंडे यांची पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे. ज्यांना आपल्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकील नेमणे परवडणारे नाही, अशा नागरिकांना न्यायालयात हक्काचा वकील मिळणार आहे.

1 फेब्रुवारीपासून स्वरसागर संगीत महोत्सव; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती

निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्वरसागर संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात, गायन, वादनाचे विविध सांगितीक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांची मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

Cracks surface in Pimpri BJP, leaders train guns at each other

Less than a year after the BJP came to power in Pimpri-Chinchwad, different camps led by key leaders seem to be forming in the party. The party-led Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) administration recently came under the lens when BJP MP Amar Sable sought Chief Minister Devendra Fadnavis’s intervention in the “corruption in allotment of road development projects worth Rs 425 crore” and sought an investigation. Sources said the development has caused fissures and anger in the party rank and file.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pimpri BJP MP Amar Sable, PCMC Standing Committee Chairperson Seema Savale, PCMC, Pune News, Latest Pune News, Indian Express, indian Express News

विकासकामात राजकारण आणू नका; आमदार लांडगेंचा विरोधकांना सल्ला

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. मात्र भाजप सत्ता येताच समाविष्ट गावांचा कायापालट करण्यास सुरुवात केली. यामुळे विरोधकांनी भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप करायला सुरुवात केली आहे. आरोप करताना पुराव्याचा आधार असावा. विकासकामात कोणीही राजकारण आणू नये, असा सल्ला आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना दिला आहे.

[Video] पिंपरीच्या सीमा सावळे यांचा गौप्यस्फोट ...!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी त्यांच्या पालिकेतील कार्यालयात पत्रकार यांच्या बरोबर वार्तालाप करताना अनेक राजकीय गौप्यस्फोट करून धम्माल उडवून दिली.विरोधी पक्षासमवेत स्वपक्षातील विरोधकांचीही गय केली नाही

अमर साबळे यांची भाजपकडून चाचपणी

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरातून काँग्रेसचे उमेदवार होते.

शहरबात पिंपरी : भाजपचा तमाशा आणि शिवसेनेची खदखद

शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरू केली असली तरी पक्षात सध्या मरगळ आणि नैराश्येचे वातावरण आहे.

पिंपरीत काँग्रेसचे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील आंदोलन फसले; सायकल रॅलीत कार्यकर्ते गायब

शहराध्यक्ष सचिन साठे एकटेच किल्ला लढवत होते.

महापालिकेतील “ती’ निविदा रद्द करा!

– खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढा-यांनी व ठेकेदारांनी 425 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. 425 कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल्याने सुमारे 70 ते 90 कोटींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. जागा ताब्यात नसतानाही कामाच्या वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी या अगोदर 425 कोटींच्या रस्ते कामाच्या निविदा त्वरित रद्द कराव्यात. तसेच नव्याने निविदा मागविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महापालिकेत विरोधकांची मुस्कटदाबी?

पिंपरी – सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेताना महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या सूचनांचा त्यामध्ये अंतर्भाव होणे क्रमप्राप्त असते. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या काही विषयांना गटनेत्यांचा होणारा विरोध टाळण्यासाठी निर्णय पूर्व बैठकांमधून त्यांना सोयीस्करपणे डावलले जात आहे. बैठक असो अथवा भूमिपूजन, उद्‌घाटन सोहळा अशा सर्वच ठिकाणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांकडून कटू अनुभव मिळत आहे.

शहरातील उद्योजकांची चार वर्षांपासून ससेहोलपट

  • चाकण “एमायडीसी’तील जागेचा ताबा रखडला
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना चालू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अर्ज केले आहेत. या सर्व उद्योजकांना टप्पा क्रमांक दोनमधील डी-ब्लॉकमधील भूखंड मंजूर केला असतानाही स्थानिक गावकऱ्यांच्या विरोधामुळे हा भूखंड ताब्यात मिळालेला नाही. त्यामुळे या उद्योजकांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या 15 दिवसांत ही समस्या न सोडविल्यास “एमआयडीसी’ कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने दिला आहे.

विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प कात टाकणार

पिंपरी – महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विठ्ठलनगर येथील घरकुल प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पामधील ए-8 व ए-9 या दोन इमारतींमध्ये स्थापत्य, विद्युत, पाणी पुरवठा व जल नि:सारण विषयक कामे होणार आहेत. याकरिता सुमारे 2 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या विषयाचा प्रस्ताव बुधवार दि. 31 ला स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवणार आहे.

दांडीबहाद्दर लिपिकाची खातेनिहाय चौकशी

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महिला लिपिक विनापरवानगी तब्बल दहा महिने झाले गैरहजर राहिल्या आहेत. गैरहजेरीमुळे रुग्णालयीन अत्यावश्‍यक सेवेत आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे – दिलीप गावडे

चौफेर न्यूज –  शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून देखील स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे आहे. इंदिरा ग्रुपचा आदर्श घेउन इतर संस्थानी स्वच्छता मोहिमेत योगदान देवून शहराचा नावलौकिक वाढवावा, असे अवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह.आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

पिंपरी चिंचवडमधील १ लाख ९७ हजार बालकांना पोलिओचे लसीकरण

चौफेर न्यूज – राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ९७ हजार ७७८ बालकांना पोलिओचे लसीकरण देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.
या पोलिओ लसीकरण मोहिमेचे आज सकाळी भोसरी रूग्णालयात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात ८५५ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. ८ प्रभारी वैद्यकिय अधिकारी रूग्णालय व ५३ वैद्यकिय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २७३४ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले होते.

'स्थायी'च्या 11 सदस्यांचे राजीनामे घेणार?

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असणाऱ्या भाजपच्या 11 सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी नवीन सदस्यांची नेमणूक करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचे समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. पक्षाने हे सूत्र मान्य केल्यास पाच वर्षात 77 पैकी 55 नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे. 

Saturday, 27 January 2018

चिमुकल्यांनी केला उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, संस्थांमध्ये रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर निगडी-प्राधिकरण येथील गुरुकुल नर्सरीतील चिमुकल्यांनी व शिक्षकांनीही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. गुरुकुल नर्सरीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. हातात तिरंगा घेत येथील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.

चिमुकल्यांनी केला उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

[Video] देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज असा उभा राहिला ...!


पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने देशातील सर्वात उंच म्हणजे १०७ मिटर उंचीवर राष्ट्रध्वज निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात उभारला असून यासाठी २.४ कोटी रुपये खर्च आला असून राष्ट्रध्वज उभा करण्यासाठी ३ महिन्याचा वेळ लागला असल्याची माहिती पिंपरी पालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांनी दिली

Civic bodies have to draft reports on project delay

PIMPRI CHINCHWAD: Municipal corporations have been asked to prepare detailed project reports on development works being delayed because of non-availability of land.

Crackdown time to tame errant drivers

PIMPRI CHINCHWAD: Officials in Pimpri Chinchwad will now be cracking down on traffic rule violators — those parking vehicles haphazardly, violating no-entry rules, carrying autorickshaws carrying more passengers than is allowed and private vehicles plying in BRTS lanes.

[Video] पाणी दरवाढीवरून राजकारण पेटले ....

पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील प्रत्येक कुटुंबाला ६००० हजार ली . मोफत पाणी देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला असला तरी इतर म्हणून प्रत्येक कुटुंबाला महिना २०० रु . आकारणी आकारणी व ६००० हजार ली . पुढच्या पाणी वापरास ५ टक्के दरवाढ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.

जुनी सांगवीत तृतीय पंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत विविध सामाजिक संस्था, शाळांमधून प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थानिक नगरसेवक संतोष कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, शारदा सोनवणे यांनी उपस्थिती लावली.  

पुण्यातील ५ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक

पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पुणे शहर पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत पाच अधिकारी, तर महाराष्ट्र राज्य कारागृह विभागातील सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

साडेआठ हजार घरे

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाचा 561 कोटी 3 लाख रुपये रकमेचा 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी प्राधिकरण सभेला सादर केला. चर्चेअंती हा अर्थसंकल्प मंजूर केला. शहरात एकूण आठ ठिकाणी प्राधिकरणातर्फे गृहयोजना साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये 8 हजार 570 घरे उभारण्याचे नियोजन आहे. संबंधित गृहयोजनांसाठी वर्षभराच्या कालावधीसाठी 213 कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे. 

आकुर्डी येथील विकास आराखड्यास शासनाची मंजुरी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध दहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकी आकुर्डी येथील सविस्तर विकास आराखड्यास (डीपीआर) राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी बुधवारी (दि.24) मान्यता दिली आहे.

सांगवीत स्वच्छता मोहिमेत आरोग्य विभागासह स्थानिक मंडळांचे श्रमदान

जुनी सांगवी : जुनी सांगवी प्रभाग क्र. ३२ सांगवी परिसरांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभाग व स्थानिक मंडळांच्या सहभागातून येथील शिवाजी पार्क, ममतानगर, संगमनगर भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातील मोकळ्या जागेमधील कचरा, प्लास्टिक उचलण्यात आले. 

स्वच्छतेकडे वैयक्तिक कर्तव्य म्हणून न पाहता गरज म्हणून पाहीले पाहिजे – आयुक्त श्रावण हर्डीकर

‘स्वच्छतेकडे वैयक्तिक कर्तव्य म्हणून न पाहता गरज म्हणून पाहिले पाहिजे.आरोग्यपूरक वातावरण निर्माण केले तरच आपण समाजाचा सन्मान केला असे होईल.’ असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. थेरगाव येथे प्रेरणा को.ऑप बँकेच्या १९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आज प्रेरणा बँक, प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था, प्रेरणा शिक्षण संस्था आणि प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित स्वछ भारत अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रूग्ण आढळला

यंदाच्या वर्षातील पहिला स्वाईन फ्लूचा रूग्ण पिंपरी चिंचवड शहरात आढळला आहे. शहरातील एका खाजगी रूग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. गेल्यावर्षी तब्बल ६१ जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला होता.

निगडीत 11 फेब्रुवारीला अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

पिंपरी – रोटरी क्‍लब ऑफ निगडी-पुणेच्या वतीने 11 फेब्रुवारी रोजी प्राधिकरण येथे आठव्या “रनेथॉन ऑफ होप 2018′ या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हेमंत कुलकर्णी यांनी शनिवारी (दि.27) पत्रकार परिषदेत दिली.

संशोधन क्षेत्रात तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा विक्रम पीसीसीओईआरच्या नावे – डॉ. हरिष तिवारी

रावेतच्या पीसीसीओईआर मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
चौफेर न्यूज –  पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयाची पहिली बॅच नुकतीच पास झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या महाविद्यालयाचा वार्षिक निकाल पहिल्या पाचमध्ये राहिल. तसेच शैक्षणिक, संशोधन, प्लेसमेंट या तीन विभागात लक्षणीय प्रगती केली आहे. संशोधन क्षेत्रात मागील तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा राष्ट्रीय विक्रम नुकताच पीसीसीओईआरच्या नावे नोंदविण्यात आला आहे. यामध्ये पीसीईटीच्या सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन आणि प्राध्यापक वृंद व कर्मचा-यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले.

पिंपरीच्या बालेकिल्ल्यासाठी भाजपची व्यूहरचना

प्रमुख राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.

पुरंदर विमानतळासाठी लागणार १४ हजार कोटी

पुणे - ‘‘पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे चौदा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे विमानतळ पीपीपी (खासगी व सार्वजनिक भागीदारी पद्धतीने) मॉडेल नुसार उभारण्यात येणार असून, विमानतळाचा ‘सर्वंकष प्रकल्प आराखडा’ (डीपीआर) डार्स या कंपनीकडून सादर झाल्यानंतर त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल,’’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

“बजाज’ कामगारांचे आंदोलनास्त्र

सोमवारपासून बेमुदत उपोषण : वेतनवाढ कराराची मागणी
पिंपरी – वेतनवाढ करार मार्गी लावावा तसेच बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी बजाज कामगारांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. विश्‍व कल्याण कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारपासून (दि. 29) आकुर्डी येथे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आहेत.

दापोडीतील जलसंपदा उपविभागावरील गंडांतर टळले

पिंपरी – दापोडी येथील जलसंपदा विभागातील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवणे तसेच या विभागाची 72 एकर जागेचे संरक्षण व उपाययोजना या बाबी लक्षात घेऊन स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवण्याचा निर्णय राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

हॉकर्स जागावाटप “लकी ड्रॉ’ उधळला!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता दबावापोटी मनमानी पद्धतीने हॉकर्स जागा वाटप होत होते. याचा गुरुवारी (दि.25) निषेध करत “ब’ क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांना जाब विचारत ते उधळून लावण्यात आले.

Friday, 26 January 2018

[Video] Historic Moment! India's Tallest National Flag hoisted at Bhakti-Shakti, Nigdi

#PCMCFirst Very proud & excited moment for all PCMCkar! On the auspicious occasion of India's 69th Republic Day we all have witnessed hoisting of India's tallest flag at Bhakti-Shakti, Nigdi सर्व पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत गर्वाचा व आनंदाचा क्षण! भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ प्रसंगी आम्ही सर्वांनी भक्ति-शक्ती, निगडी येथे भारताच्या सर्वांत मोठ्या ध्वजारोहणाचे साक्षीदार झालो

Thursday, 25 January 2018

रस्ते कामात भ्रष्टाचार, खोटारडे कोण ? भाजपला शिवसेनेचा सवाल 

पिंपरी ः भाजपच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सव्वाचारशे कोटी रुपयांच्या रस्तेकामात नव्वद कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या खासदारांनी नुकताच केला. त्यावर शिवसेनेचे खासदार खोटे बोलत असल्याचे महापौर नितीन काळजे काल म्हणाले. दरम्यान, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजपच्याच खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समोर आले. त्यामुळे कोण खोटारडे अशी विचारणा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली.

[Video] प्रेरणा बँकेचे स्वच्छता अभियान!

प्रेरणा बँकेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त थेरगाव,डांगेचौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानाचे उदघाटन पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

[Video] पिंपरी चिंचवड । पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट

निगडीपर्यंत मेट्रोसाठी नागरिकांनी सुरु केली मिस्ड कॉल मोहीम 08030636448

२६ जानेवारीला फडकणार सर्वात उंच राष्ट्रध्वज; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महापौरांचे आवाहन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक १०७ मिटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता भक्तीशक्ती येथे होणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

PCMC to provide 6k litres free water

Pimpri Chinchwad: The standing committee has approved a resolution to give free drinking water up to 6,000 litres per connection from April 1, 2018, chairperson Seema Savale said.

“पीसीएमसी’करांना पिण्याचे पाणी “मोफत’

पिंपरी – “उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी सत्ताधारी भाजपाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. शहरातील नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला सहा हजार लीटर पिण्याचे पाणी मोफत देण्यात येणार आहे. याचा जवळपास एक लाख कुटुबियांना फायदा होईल. त्यासाठी केवळ 200 रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल. दि. 1 एप्रिल 2018 पासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.

जिल्हा रुग्णालयातील “एआरटी’मध्ये कचऱ्याचा ढिग

पिंपरी – जिल्हा रुग्णालयात “एआरटी’ सेंटरमध्ये कचऱ्याचा ढीग लागला आहे. त्याचा त्रास येणाऱ्या रुग्णांना होत आहे. त्याबाबत नागरिकांनी तक्रार केली आहे, तरी देखील रुग्णालयीन प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ते रुग्णांच्या जिवावर बेतत आहे.

अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी. राज्य शासनाने घेतलेल्या बांधकाम नियमितीकरणाच्या निर्णयाला मूर्त स्वरुप येईपर्यंत कारवाई बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.

Wednesday, 24 January 2018

निगडीपर्यंत मेट्रोसाठी मिस्ड कॉल मोहीम

पिंपरी - पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास सत्ताधारी विलंब करत आहेत, या विरोधात आवाज उठवण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमतर्फे मिस्ड कॉल मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी ०८०३०६३६४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन फोरमतर्फे करण्यात आले आहे. 

MahaMetro looks to dip into corporate coffers

PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) is seeking help from industrial units to construct stations on the Pimpri-Swargate Metro route.

पहिल्या टप्प्यातील मेट्रो 2019 मध्ये धावणार

पुणे – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज-ते रामावाडी अशा दोन मेट्रो मार्गांचे काम सुरु आहे. दोन्ही मार्गांचे काम वेगाने सुरू असून 2021 पर्यंत दोन्ही मार्गांवर टप्प्याटप्प्याने मेट्रो धावणार आहे. पाच ते सहा किलोमिटरचे टप्पे करून मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. 2019 च्या शेवटापर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो धावेल तर, 2021 नंतर दोन्ही मार्गांवर पूर्ण क्षमतेने मेट्रो धावेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे ३२ पिलर पूर्ण – ब्रिजेश दिक्षीत

पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम वेगवान पध्दतीने सुरू आहे. पासून काम सुरू झाल्यानंतर मेट्रोचे ३२ पिलर पूर्ण झाले आहेत. खराळवाडी येथे दोन पिलरच्यामधील २८ मीटर लांबीचा १० सेगमेंटचा स्पॅन देखील बसविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.

PCMC chief to look into allegations of discrimination

PIMPRI CHINCHWAD: Shravan Hardikar, the Pimpri Chinchwad municipal commissioner, promised to look into allegations of discrimination against opposition corporators and the double standards in taking action against agitators from the ruling BJP and the opposition parties.

Woman leaps to her death before demolition drive

PUNE: A 35-year-old woman jumped to her death from the fourth floor of an illegal building in Pimple Gurav when employees of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) turned up there to tear down the structure as part of its demolition drive.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच!

अनधिकृत इमारत प्रकरण ः एकनाथ पवार यांची संतत्प प्रतिक्रिया
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे गुरव येथील देवकर पार्क येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेचे अधिकारी गेल्या चार दिवसांपासून कारवाई करत आहेत. त्याच इमारतीवरून एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत क्‍लेशदायक आहे. एवढे मोठे अनधिकृत बांधकाम सुरू असताना पालिकेचे अधिकारी गप्प का बसले? याची चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीती

दररोज १५ ते २० जणांना हे कुत्रे चावा घेत असल्याचे समोर आले आहे.

फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणार!

  • महापालिका आयुक्‍त : “हॉकर्स झोन’ धोरणाची अंमलबजावणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – वर्षानुवर्षे रखडलेला राष्ट्रीय फेरीवाला धोरणांर्गत शहरात “हॉकर्स झोन’ धोरण निश्‍चित करण्यात येणार आहे. तसेच, फेरीवाल्यांना स्थलांतरित करुन त्यांना झोननुसार जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे लवकरच पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

‘झोनिपू’मध्ये “बोगसगिरी’

  • प्रशासन आक्रमक : …तर मूळ मालकांवर होणार कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली येथील घरकुल प्रकल्पात मूळ लाभार्थिंनी स्वतःची घरे भाड्याने दिल्याच्या तक्रारी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार “झोनिपू’च्या पथकाने केलेल्या तपासणीत घरकुल प्रकल्पात भाडेकरु, नातेवाईक आणि बंद घरे आढळून आली आहेत. त्यामुळे घरकुल प्रकल्पातील मूळ मालकांना नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

RERA or consumer forum, where does one get relief?

PUNE: A settled and well-oiled dispute settlement mechanism is the crux for restoring buyer and investors' confidence in the real estate market.

दापोडीतील जलसंपदाचा एक विभाग कायम ठेवण्याचा निर्णय – राज्यमंत्री विजय शिवतारे

दापोडी येथील जलसंपदा विभागात स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या चार विभागाची कार्यालये आहेत. त्यातील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवणे तसेच या विभागाची ७२ एकर जमीन अतिक्रमाणापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड केली असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

शहरबात पिंपरी : भाजपविरोधात सर्वपक्षीयांचा हल्लाबोल

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास १५ वर्षे शहराचा कारभार होता.

"एचए'मध्ये पुन्हा खडखडाट

पिंपरी - येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीत उत्पादननिर्मितीचे काम सुरू झाले आहे. तरीही 980 कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार मिळालेला नाही. थकीत पगाराची रक्‍कम 24 कोटी रुपये आहे. ती मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे (कॅबिनेट) दाद मागण्याची कामगारांची तयारी आहे. केंद्र सरकारकडून केव्हा मंजुरी मिळेल, याचे उत्तर तूर्तास कोणाकडेच नसल्याने कंपनीतील कर्मचारी चिंतेत आहेत. 

‘इंदिरा ग्रुप’कडून कचरा गाडीचे लोकार्पण

वाकड – येथील इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने इंदिरा स्वच्छता अभियान अंतर्गत इंदिरा कॉलेजच्या परिसरातील कचरा संकलनासाठी कायमस्वरुपी सुरू केलेल्या कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात आले.

शिवसेनेचे दोन्ही खासदार खोटारडे!

  • आरोप सिद्ध करा ः महापौर नितीन काळजे यांचे आव्हान
पिंपरी,  (प्रतिनिधी) – समाविष्ट गावांतील विकासकामांवर खर्च करण्यासाठी मंजूर केलेल्या 406 कोटींच्या निविदा सरासरी 7.19 टक्के कमी दराच्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांना निविदा दहा टक्के जादा दराने मंजूर केल्याचे सिद्ध करता न आल्यास त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असे आव्हान महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत दिले.

नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांची “स्टडी टूर’

  • पालक मंत्र्यांशी संवाद ः सायन्स पार्क, महात्मा फुले संग्रहालयास भेट
पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. 20 ला शैक्षणिक सहली अंतर्गत सायन्स पार्क व महात्मा फुले संग्रहालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानावर आधारित वस्तू व प्रयोगांचा सहलीत आनंद घेतला. नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांसाठी हा दुग्ध-शर्करा योग जुळून आला. यावेळी विद्यार्थ्यांची पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी भेट झाली. बापट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये मुलांना नवनवीन प्रयोग शिकण्यास मिळाले. यामुळे मुलांचा शैक्षणिकदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळाली. शैक्षणिक सहलीत विद्यार्थी जेव्हा विज्ञानावर आधारित प्रयोग बघतात, तेव्हा त्यांच्या मनात कुतूहल व जिज्ञासा जागृत होते आणि यातूनच एखादा वैज्ञानिक वा संशोधक तयार होतो. तसेच, नॉव्हेल शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.

Tuesday, 23 January 2018

मिळकतकरही पेटीएमव्दारे भरण्याची पिंपरी महापालिकेची सुविधा 

पिंपरी : केंद्रातील भाजप सरकार व त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "डिजिटल इंडिया'चे स्वप्न आहे. अधिकाधिक व्यवहार "कॅशलेस' करण्यावर भर आहे. त्याचाच कित्ता भाजपच सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत गिरवला जात आहे. ऑनलाइनसह डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे पालिका मिळकतकर जमा करून घेत आहे. आता पेटीएमद्वारेही हा कर पालिका आता जमा करून घेणार आहे. त्यामुळे हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांच्या जोडीने डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. त्यांचा वेळ वाचणार असून फक्त पाच रुपये शुल्कात या सुविधेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. याद्वारे "स्मार्ट सिटी' आता "डिजिटल सिटी'ही होऊ घातली आहे. 

निगडीपर्यंत मेट्रो: मिस्ड कॉल मोहीमेमुळे 'पिंपरी चिंचवड अस्मिता' जागृत झाली!

2000 मिस्ड कॉल फक्त 2 दिवसांमध्ये! केवळ निगडी, चिंचवड,आकुर्डी मधून नाही तर वाकड, पिंपळे सौदागर, मोशी व भोसरी येथील रहिवासी मिस्ड कॉल मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे कारण मेट्रो जर निगडीला येणार नसेल तर शहराच्या अन्य भागावर अन्याय होणे अटळ आहे... हिंजवडी-चाकण व्हाया आकुर्डी स्टेशन आणि हिंजवडी-मोशी व्हाया वाकड-पिंपळे सौदागर ह्या दोन मार्गांचे भवितव्य अधांतरी राहण्याचा धोका आहे

निगडीपर्यंत मेट्रो: माननीय खासदार श्रीरंग बारणे यांनी मिस्ड कॉल मोहिमेला पाठिंबा दिला

निगडी पर्यत मेट्रो पहिल्या टप्प्यात नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 29 ऑक्टोबर 2013 ला मंजूरी दिली आहे आणि केंद्र शासनाने 7 डिसेंबर 2016 ला मंजूरी दिली आहे असे असताना पालकमंत्री आणि सत्ताधारी पक्ष निर्णयाची  अंमलबजावणी करायला विलंब का करत आहेत? याकडे जनतेच्या माध्यमातून आवाज पोहचवण्यासाठी पिंंपरी चिंचवड सिटीझन फोरम (PCCF) आता अधिक व्यापक मोहीम राबवणार आहे. आम्ही मिस्ड कॉल मोहीम सुरु केली आहे. माननीय खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे यांनी मिस्ड कॉल देऊन मोहिमेला पाठिंबा दिला! त्यांनी नागरिकांना आव्हाहन केले आहे “जास्तीतजास्त लोकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे”.
सर्वांनी आपल्या मोबाईलवरुन या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदवा - 08030636448

निगडीपर्यंत मेट्रो: माननीय पालकमंत्री, आम्ही गेली 4 वर्षे हि मागणी करतोय

Girish Bapat Sir, Last 4 years (We are following this issue since 16/02/2013) we PCMCkar are patiently waiting to get justice. Justice Delayed is Justice Denied!
गिरीशजी आम्ही गेली 4 वर्षे हि मागणी करतोय… न्याय करण्यास विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणे

अडीच वर्षांत मेट्रो धावणार

- प्रकल्प उभारणीच्या कामाची वर्षपूर्ती 
- बालगंधर्वमध्ये विशेष कार्यक्रम 
- "महामेट्रो'कडून पिंपरीत आज पाहणी 
- पुढील कामाची दिशा ठरविली जाणार 
पिंपरी-चिंचवड शहरात 61 मीटर रुंदीच्या रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा न येता कामे मोठ्या गतीने सुरू आहेत. या भागातील चार स्थानकांची कामे, तसेच निम्म्यापेक्षा अधिक मार्ग येत्या वर्ष-दीड वर्षात पूर्ण होतील. मेट्रोची पहिली धावही पिंपरी-चिंचवडमध्ये होण्याची शक्‍यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड विभागातील पहिली मेट्रो पिंपरी महापालिका भवन ते शिवाजीनगर धान्यगोदामापर्यंत येत्या अडीच वर्षांत धावणार आहे. त्याच काळात पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठीच्या हालचाली गतिमान होण्याची चिन्हे आहेत. 

४४ किलोमीटर वर्तुळाकार मार्गावर मेट्रो धावणार

शहरातील उपनगरांना जोडणारा ४४ किलोमीटर मार्ग मेट्रो मार्गिकेने वर्तुळाकार पद्धतीने जोडण्यात येणार आहे.

Only 7 apply in past 4 months to regularise their unauthorised constructions in PCMC

The PCMC had introduced the scheme for authorising illegal constructions built before December 31, 2015, and to regularise them according to guidelines issued by the state government in September 2017.

शहरप्रमुखांची अडथळय़ांची शर्यत

गजानन बाबर यांनी शिवसेना सोडली तरी त्यांचे बंधू मधुकर व त्यांचा मुलगा योगेश शिवसेनेतच राहिले होते

पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख घरांची गरज

महापालिकेने स्वत:च्या आणि शासनाच्या जमिनींवर १० हजार घरकुलांच्या बांधणीचे नियोजन केले आहे.

न्यायालयीन शुल्कवाढ कमी करण्याची मागणी

पुणे - राज्य सरकारने न्यायालयीन शुल्कात वाढ केली असून, वकीलपत्रासाठी 10 ऐवजी 30 रुपये, कागदपत्रे मिळविण्यासाठी 50 रुपये आणि जास्तीत जास्त मूल्य असल्याचा दावा दाखल करताना आता तीन लाख रुपयांऐवजी 10 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ही वाढ कमी करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे. 

...तर पेट्रोल सहा रुपयांनी स्वस्त होईल

शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल सर्वांत महाग का आहे? त्याची कारणे काय आहेत? 
महाराष्ट्रात देशात सर्वांत महाग पेट्रोल डिझेल मिळते, याला राज्याकडून लावण्यात आलेले विविध कर हेच एकमेव कारण आहे. तेल कंपन्यांकडून विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या पेट्रोलचा दर (लॅंडेड कॉस्ट) 29 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर हा 19 रुपये प्रतिलिटर आहे. त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून मिळून 48.8 टक्के व्हॅट आणि उत्पादन शुल्क लावले जातो. याशिवाय राज्याकडून पेट्रोलवर 9 टक्के वेगळा सेस आकारला जातो. या नऊ टक्‍क्‍यांमध्ये तीन रुपये दुष्काळी कर, तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन भरून काढण्यासाठी लावलेला कर, एक रुपया शिक्षण, एक रुपया स्वच्छ भारत आणि एक रुपया कृषी कल्याण सेस घेतला जातो. (यातील शिक्षण, स्वच्छ भारत आणि कृषी कल्याणकर हे सध्या तीन वेळा भरत आहोत.) दुष्काळ जाऊन चार वर्षे झाली; तसेच महामार्गावरील दारूबंदीही शिथिल केली, तरीही कर वसूल करून सर्वसामान्यांवर भुर्दंड लादला जात आहे. हे दोन्ही कर तातडीने रद्द करायला हवेत. ते केले तर तत्काळ सहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त होईल. 

परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न

पुणे - ""जाहिरातींद्वारे स्वस्त घरांबद्दल दिलेल्या माहितीवर लोकांचा विश्‍वास बसणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीमधूनच हा विश्‍वास संपादन केला जाऊ शकतो. वाढते शहरीकरण आणि घरांची गरज लक्षात घेऊन "पंतप्रधान आवास योजने'द्वारे परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न "पीएमआरडीए'च्या माध्यमातून सरकारकडून केले जात आहे,'' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

म्हाळुंगे टीपी स्कीमचा ड्राफ्ट महिनाभरात

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) म्हाळुंगे -माण येथे सुमारे 719 एकरवर नगर रचना योजना (टीपी स्कीम ) जाहीर केली आहे. या टीपी स्कीमचा ड्राफ्ट येत्या महिनाभरात मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला ‘सावकारी धंदा’ महापालिकेने बंद करावा – श्रीरंग बारणे

पिंपरी चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनाधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्क्म मिळणार आहे. भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पुर्णत: माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता भाजपची सत्ता येऊन एक वर्ष होत आले. तरी आजपर्यंत शास्तीकर काय माफ होऊ शकला नाही. महापालिका करसंकलन विभागाने नागरीकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लाऊन नोटीस दिल्या आहेत. शास्तीकर भरला नाही तर मिळकती जप्त करण्यात येतील अशीही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरु केल्याचा आरोप करत हा धंदा त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. चक्रवाढ व्याज लाऊन नोटीसा देणे बंद करावे. तसेच शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी भाजप नगरसवेकांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे, आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये १०० टक्के पाणीपट्टी वाढ प्रस्तावित

मागील दहा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील पाणीपट्टी वाढविण्यात येणार आहे.  महापालिका प्रशासनाने थेट १०० टक्के पाणीपट्टी वाढ पिंपरी-चिंचवडकरांसाठी प्रस्तावित केली आहे. यापूर्वी २०० लीटर पाण्यासाठी अडीच रुपये मोजावे लागत होते, परंतु ही वाढ झाल्यानंतर शहरवासीयांना २०० लीटर पाण्यासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

व्हॉट्सअॅप बिझनेस या दिवशी होणार लॉन्च….

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपकडून भारतातील यूजर्सना लवकरच नवीन गिफ्ट मिळणार आहे. कारण, गेल्याच आठवड्यात व्हॉट्सअॅपने जगभरातील अनेक देशांमध्ये आपले नवे ‘बिझनेस अॅप’ लॉन्च केले होते. पण आता हे अॅप लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे.

‘आपले सरकार’ मार्फत पतंजलीच्या उत्पादनांची विक्री

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात स्थान देण्यात येणार आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या पतंजलीला ई-कॉमर्समध्ये खास स्थान देण्यात आले आहे.

रस्त्यावर धावणार ‘भगवी मॅजिक’!

रिक्षा संघटनेचा विरोध : परिवहन मंत्र्यांचा आणखी एक वादग्रस्त निर्णय
पुणे – राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकारला महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये धोरणात्मक बदल करण्यास लावून सहा आसनी रिक्षा स्क्रॅप करुन त्याबदल्यात टाटा मॅजिक हे वाहन बदली वाहन म्हणून रजिस्टर करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, याचा रंगही भगवा असणार असल्याचे समजते. पुण्यातील रिक्षा संघटनेने मात्र याला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि परिवहन कार्यालयाकडे निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Monday, 22 January 2018

“स्मार्ट सिटी’साठी पंधरा कंपन्या इच्छुक

पिंपरी – केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात पायाभूत विकास कामे करण्यासाठी महापालिकेने दोन निविदा प्रसिध्द केल्या आहेत. त्यात 15 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे सादरीकरण पाहून कामातील गुणवत्ता व नाविन्यतेवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भर दिला आहे. सादरीकरणासाठी इच्छुक कंपन्यांना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Wet waste collection to stop in April

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon stop accepting wet waste from bulk garbage generators such as housing societies, hotels, colleges and restaurants.

More FSI for Yashwantrao Chavan hospital in Pimpri

PIMPRI CHINCHWAD: Civic-run Yashwantrao Chavan Memorial Hospital at Sant Tukaramnagar in Pimpri will soon have a postgraduate institute, night shelters, multi-level parking space and a canteen, among others facilities as the state government has granted it an additional FSI of 0.5

पिंपळे सौदागरमधील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ आज करण्यात आला. पवना सहकारी बँक व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे तसेच सोसायटीतील पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.

संमेलनाध्यक्ष साधणार पिंपरी चिंचवडकरांशी ‘मुक्त संवाद’

पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मंगळवार दि.२३ जानेवारी  २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड मोरवाडी येथे अॅटो क्लस्टर सभागृहात बडोदे येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. 

चिंचवडला रंगली संतुर बासरी वादनाची जुगलबंदी

पिंपरी (Pclive7.com):- कान आणि मन समृद्ध व्हावे, डोळे दीपून जावेत, द्रूत होत जाणाऱ्या लयीने आपलीही धडधड वाढावी..अशा तालवाद्यांच्या जुगलबंदीने शनिवारी रसिकांच्या काळजाचा ‘ठेका’ चुकवला. संतुर व बासरी अशा तालवाद्यांची स्वरांची साथ मिळाल्याने अभूतपूर्व तालाविष्कार चिंचवड येथे घडला.

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष बेततेय जिवावर

पिंपरी - दुचाकी वाहने आणि मोठमोठे रस्ते ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली आहे. त्यातच वाढत्या तंत्रज्ञानामुळे, तसेच बाजारात येणाऱ्या नव्या आलिशान वाहनांमुळे प्रवास सुखाचा होत असला, तरी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेष म्हणजे अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

प्रश्‍न पाठवा अाणि संसद पाहा - खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी - देशाची ध्येयधोरणे ठरविताना विद्यार्थ्यांची भूमिका सरकारपर्यंत पोचावी, या उद्देशाने मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी देशाचे धोरण निश्‍चित करणारा प्रश्‍न विचारायचा आहे. उत्कृष्ट प्रश्‍न विचारणाऱ्यास संसदेचे कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत मावळ मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी प्रश्‍न पाठविण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे. 

कौमार्य चाचणी प्रथे विरोधात जनजागृती करणाऱ्यांना मारहाण

पिंपरी: लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा कंजारभाट समाजात आहे. या प्रथेच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या तरूणांना मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे रविवारी (ता.२१) रात्री घडली.

योजनांच्या लाभासाठी पालिकेकडे विक्रमी अर्ज

पिंपरी - केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडे यंदा इच्छुकांचे विक्रमी ३९ हजार ८२५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी व तपासणी नागरवस्ती विभागाने हाती घेतली असून, ते काम पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.

“स्मार्ट सिटी’ संकल्पनेची जनजागृती आवश्‍यक – आर. श्रीनिवास

ताथवडे – भारतात अजूनही “स्मार्ट सिटी’ संकल्पनेची सर्वसामान्य अशी व्याख्या नाही. त्यामुळे “स्मार्ट सिटी’बाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय शहरी विकास व नियोजन महामंडळाचे प्रमुख आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.

‘टीडीआर’ वाटपाला स्थगिती द्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठ महिन्यात वाटप केलेल्या 41 लाख 27 हजार चौरस फुटांच्या टीडीआर प्रकरणाला स्थगिती देऊन चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

सोसायट्यांचा ओला कचरा उचलण्यास “नकार घंटा’!

पिंपरी – शहरात 75 पेक्षा जास्त सदनिका असणाऱ्या सोसायटींचा ओला कचरा 1 एप्रिलपासून महापालिका स्विकारणार नाही, त्या सोसायट्यांना ओला कचऱ्यावर निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यासाठी 31 मार्चची “डेडलाईन’ आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे कचरा विलगीकरण करणे व ओल्या कचऱ्यावर निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत.

महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत मॉर्डन फार्मसी प्रथम

– महापालिकेतर्फे स्वच्छ भारत सुदृढ भारत स्पर्धा
पिंपरी – स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ भारत-सुदृढ भारत या विषयावर आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत निगडीच्या मॉडर्न फार्मसी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.

स्वच्छ मोहीम नावापुरती!

पिंपरी – देशात स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक आणण्याचे उद्दीष्ट आयुक्‍तांनी डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षणावर जनजागृती करुन त्यांचा डांगोरा सर्वत्र पिटला; परंतु शहरात स्वच्छतेचा बोऱ्या वाजला असून जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम केवळ कागदोपत्री राबवली जात असल्याचे दिसून येत आहे.

वित्तीय संस्थांनी केली मेट्रो कामाची पाहणी

पुणे – मेट्रोचे काम जलदगतीने होण्याची सुचिन्हे दिसत असून युरोपियन इन्व्हेस्टमेन्ट बॅंक (ईआयबी) आणि फ्रेंच डेव्हलपमेन्ट एजन्सी (एएफडी) या दोन्ही वित्तीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेट्रो प्रकल्पाची शनिवारी एकत्रित पाहणी केली.

कामातील गुणवत्तेसाठी सल्लागारांची गरज – आयुक्‍त

पिंपरी – विकास कामांमधील नाविन्यता जपण्यासाठी सल्लागारांची पालिकेला आवश्‍यकता आहे. अभियंत्यांची कमतरता असल्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी एकच अभियंता नियुक्त केला आहे. त्यामुळे कामातील नाविन्यता आणि गुणवत्ता जपण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करावीच लागते, असे स्पष्टीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

आयुक्‍त भाजपची वकिली करताहेत?

विरोधी पक्षनेते बहल यांचा आरोप: भ्रष्ट कारभाराला मुख्यमंत्री, पालक मंत्र्याची मूक संमती
पिंपरी  – ना भय ना भ्रष्टाचार, स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता मिळविली, मात्र, अवघ्या दहा महिन्यात सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे उघड होवू लागले, 425 कोटींच्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला हे उघड सत्य असताना, त्या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी आयुक्त श्रावण हर्डीकर हे “एसएसआर’मध्ये 15 टक्के दर कमी करुन पालिकेची 30 कोटींची बचत केल्याचा बनाव करीत आहेत.

फरार भाजप नगरसेवक महासभेला हजर

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील भाजप नगरसेवक तुषार हिंगे हे गेल्या दोन महिने महापालिकेच्या सभागृहात महासभेला गैरहजर होते. त्यांच्या पत्रानुसार विधी समितीने त्यांना दोन महिन्यांची रजा मंजुरी दिली होती. परंतु, हिंगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असताना ते पोलीस रेकॉर्डवर फरार घोषित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना न सापडणारे नगरसेवक हिंगे हे नगरसेवक पद वाचविण्याकरिता शनिवारी (दि.20) सभागृहात महासभेच्या “मस्टर’वर हजर झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना न सापडणारे हिंगे महापालिकेत प्रकट झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

Saturday, 20 January 2018

पवना, इंद्रायणी दुर्लक्षितच

पिंपरी - शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या सुधार प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल अजूनही राज्य सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. गेल्या सहा वर्षांपासून यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने विस्तृत प्रकल्प अहवालाला मुहूर्त मिळालेला नाही. नद्यांची सद्यःस्थिती बघता त्यावर तातडीने अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. या प्रकल्पात नदीतील वाढते प्रदूषण रोखणे तसेच नदीकाठ विकसित करण्यात येणार आहेत. सर्वेक्षणानंतर विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. त्यासाठी प्रकल्प सल्लागारांकडून निविदा प्रस्ताव मागविले आहेत. सरकारचीही मान्यता व अनुदान न मिळाल्याने हा प्रकल्प राबविणे महापालिकेला शक्‍य होत नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

लोणवळ्यापर्यंत धावावी मेट्रो !

तळेगाव दाभाडे – पुणे ते पिंपरी मेट्रो या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची व्यापकता वाढावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार आहे, परंतु पहिल्याच टप्प्यात मेट्रोला निगडीपर्यंत घेऊन जावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे नागरीक करत असतानाच मेट्रो लोणावळ्यापर्यंत धावावी अशी मागणी आता मावळातून येऊ लागली आहे.

More citizen service hubs on the cards

Pimpri Chinchwad: A total of 56 additional citizen facilitation centres (CFCs) will be started in Pimpri Chinchwad in March to offer civic as well as Mahaonline services through public-private partnership for three years.

PCMC chief warns against interference

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad municipal commissioner, Shravan Hardikar, has sent letters to all corporators, warning them that they will face disqualification if they supported unauthorized constructions or interfered in the drive against illegal constructions.

निगडीपर्यंत “मेट्रो’ राज्याच्या कोर्टात

पिंपरी – पुणे महामेट्रोच्या 31 किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर 2016 रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावा, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याचा निर्णय आता राज्य सरकार घेणार आहे. हा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा पीसीसीएफकडून निषेध

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. ‘आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,’ अशा शब्दांत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे, आता मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. ‘आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,’ अशा शब्दांत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे, आता मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती; चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात – श्रीरंग बारणे

पिंपरी (Pclive7.com):- पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. मंत्री पुरी यांनी हे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांना देखील पाठविले आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे. 

पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो - श्रीरंग बारणे

पिंपरी - पुणे महामेट्रोच्या 31 किलोमीटर मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर 2016 रोजी मान्यता दिली आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावा, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. पत्राची प्रत खासदार श्रीरंग बारणे यांनाही पाठविली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

मुंढेंबाबत कुरघोडीचे राजकारण

पिंपरी - ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा प्रशासकीय सेवेत धाडा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी एकीकडे लावून धरलेली असतानाच महापालिकेच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत शिस्तप्रिय व धडाकेबाज सनदी अधिकाऱ्याची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिंगरोडबाधितांच्या घर बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

'पीएमआरडीए'चे अधिसूचित क्षेत्र घोषित

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकारक्षेत्रातील गावांची सुधारित हद्द निश्‍चित करून त्याला "अधिसूचित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तसेच पीएमआरडीएला "विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून मंजुरी दिल्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे.

अनधिकृत बांधकामप्रश्‍नी आयुक्‍तांच्या दालनात खलबते

पिंपरी – राज्य शासनाने 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. परंतु, बांधकाम नियमित करण्यासाठी केवळ सात ते आठ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामप्रश्‍नी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक घेवून जाचक अटी-शर्तींवर तोडगा काढण्यात यावा, तसेच बांधकाम नियमितकरणात सूसुत्रतता आणण्यात यावी, अशी मागणी केली.

समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य

पिंपरी – भविष्यात पिंपरी-चिंचवडचा जो भाग विकसित होणार आहे, याचा विचार करूनच तेथील भागाला सोयी सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी येवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे काढली आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

चिंचवडच्या ऑटो क्लस्टरमध्ये तोडफोड

चिंचवड – मोफत घरांची जाहिरात देऊन एका खासगी गृहकर्ज कंपनीने भरवलेल्या प्रदर्शनात संतप्त नागरिकांनी तुफान तोडफोड केली. प्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर येथे केवळ गृहकर्जाविषयी माहिती मिळत असल्याचे कळताच सकाळपासून रांगा लावून थांबलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांचा सहनशीलतेचा बांध फुटला. हातात येईल ते साहित्य घेऊन नागरिकांनी इथल्या टेबल, खुर्च्या फेकून देण्याबरोबरच गृहकर्जाची माहिती देणारी पोस्टर्स फाडली.

चार पोलीस निरिक्षकांच्या बदल्या

पिंपरी – परिमंडळ तीनमधील चार पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाकड, सांगवी, भोसरी व पिंपरी या पोलीस स्टेशनमधील निरिक्षकांचा समावेश आहे.

आता शाळांमध्ये “अग्निशमन समिती’

पिंपरी – आपल्या कार्यकक्षेतील एका शाळेत आगीपासून बचाव करता येऊ शकेल अशा विद्यार्थी, शिक्षक व पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शालेय अग्निशमन व्यवस्थापन समितीसह विविध स्तरांवरील एकूण दहा समित्या स्थापना करण्याचे निर्देश महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय येत्या रविवारी (दि. 21) आगीपासून बचाव करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनाधिकृत हॉटेल, रुफ टॉप टेरेस हॉटेल, बार, हुक्का बार पार्लर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अमोल उबाळे यांनी पुण्याच्या जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आहे.

आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर

पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. तब्बल 50 हजार क्रियाशील सदस्यांची नोंदणी करण्याचे उदिष्ट राष्ट्रवादीने ठेवले असून या सदस्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रभागात जावून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.

चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे भुईसपाट

चिंचवड – ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 16, 17 व 18 मध्ये महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालु असलेले अनधिकृत पत्राशेड व आर. सी. सी. बांधकामावर कारवाई केली.

भोसरीतील ‘मराठा वॉरियर्स’ची पुणे ते वाघा सायकलस्वारी पूर्ण

चौफेर न्यूज – समाजातील अनेक ध्येयवेडी माणसे स्वत:चा उदरनिर्वाह करून समाजासाठी आणि देशासाठीही काम करत असतात. अशाच प्रकारे देशाच्या रक्षणार्थ ‘जॉईन इंडियन आर्मी’ हा संदेश घेऊन भोसरीतील ‘मराठा वॉरियर्स’ या ग्रुपच्या १० ध्येयवेड्या तरुणांनी सायकलीवर पुणे ते वाघा बार्डर हि अनोखी मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरी प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष बैठका – एकनाथ पवार

चौफेर न्यूज – महापालिकेच्या सर्व प्रभागातील नागरी प्रश्न व समस्या जलद गतीने मार्गी लावण्यासाठी सर्व प्रभाग स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तर बैठकीत पदाधिकारी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी केलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत व प्रभागातील प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज अ प्रभागात आयोजीत करण्यात आलेल्या प्रभागस्तरीय विशेष बैठकीमध्ये ते बोलत होते.

निगडीतील राष्ट्रध्वजाची रंगीत तालीम यशस्वी: प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानामध्ये सुमारे १०७ मीटर उंच राष्ट्रध्वजाचे येत्या प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून उपमहापौर शैलजा मोरे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत त्याची रंगीत तालीम शुक्रवारी (दि. १९) घेण्यात आली.

भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटन सरचिटणीसपदी प्रमोद निसळ यांची निवड

एक व्यक्ती, एक पद या तत्त्वानुसार पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षाच्या शहर संघटन सरचिटणीसपदी प्रमोद निसळ यांची निवड केली आहे. तसेच संघटनेत यापुढे सहाऐवजी चार सरचिटणीस असतील. भाजपच्या पक्ष संघटनेतील संघटन सरचिटणीसपद हे शहराध्यक्षानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद आहे.

महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

सांगवी – नवी सांगवीतील भक्‍ती सामाजिक संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महिला प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच झाली.

“त्या’ अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ?

पिंपरी – महापालिकेच्या प्रशासकीय कमकाजात अफरातफर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचे हात दगडाखाली अडकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ असताना सत्ताधारी पदाधिकारी कारवाई करण्यास चालढकल करीत आहेत. सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबाव वाढवत असल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांच्या आपील अर्जांवर निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांचे तीन प्रस्ताव स्थायीने पुन्हा तहकूब ठेवले आहेत.

Friday, 19 January 2018

9 agencies give proposals for WTE project

Pimpri Chinchwad: Nine organizations, including environment agencies, have submitted their proposals for the Waste-To-Energy (WTE) project to be carried out at the Moshi garbage depot spread over 80 acres.

Bapat clips Metro dream of Nigdi, Katraj residents

Pimpri Chinchwad: Dashing hopes of lakhs of people, guardian minister Girish Bapat on Thursday said the Pune Metro routes would be extended in the project's second phase.

पिंपळे सौदागर येथे मेट्रो जंक्‍शन उभारण्याची मागणी

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात संयुकतपणे उभारल्या जाणाऱ्या मेट्रोचा मार्गविस्तार करुन पिंपळे सौदागर येथे जंक्‍शन उभारावे, अशी मागणी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी केली आहे. पीएमआरडीएचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

‘मेट्रो’ला पालकमंत्र्यांचा खोडा

शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. 'आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,' अशा शब्दांत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे, आता मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

girish bapat on pune project

रेल्वे स्थानकांवरून थेट मेट्रोमध्ये!

पिंपरी भागामध्ये पिंपरी ते दापोडी या टप्प्यात मेट्रो मार्गासाठी पिलर उभे करण्यात येत आहेत.

पिंपरी परिसरात वर्षभरात ३३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

पिंपरी, चिंचवड, खडकी, दापोडी आणि वाल्हेकरवाडी हा परिसर ‘ई’ विभागाच्या अंतर्गत येतो.

Light & sound show on temple premises

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will organize a light and sound show on the Moraya Gosavi temple premises in Chinchwadgaon in three phases at a cost of Rs9 crore. The temple compound, located along the Pavana river, is quite large.

PMPML continues to bleed, suffers operating losses of Rs 210cr in 2016-17

Pimpri Chinchwad: Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) posted an operating loss of Rs 210.44 crore in 2016-17, an increase of Rs Rs 58.64 crore as compared to 2015-16.

PCMC boss refutes graft charge, says Rs 30cr saved

Pimpri Chinchwad: Refuting allegations of corruption in awarding contracts for development projects in the past few months, Shravan Hardikar, the Pimpri Chinchwad municipal commissioner, said the civic administration has, in fact, saved Rs 30 crore while awarding the contracts.

पालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे - बापट


बीआरटीच्या बस थांब्यावरील साहित्यांची चोरी

पिंपरी – निगडी- दापोडी मार्गावर लवकरच बीआरटीएस बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्या मार्गावरील किरकोळ कामे महापालिकेने उरकली आहे. तसेच मार्गावरील सर्व बसथांबे पीएमपीच्या ताब्यात दिले आहेत. या मार्गावर नव्याने कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या बसथांब्यावरील साहित्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी पीएमपी प्रशासनाने पिंपरी पोलीसांकडे तक्रार केली असून महापौर नितीन काळजे यांनी बसथांब्याच्या चो-या थांबविण्यासाठी पोलीस उपायुक्तांना पत्र दिले आहे.

[Video] ‘ना’राज लक्ष्मण जगताप यांची विकासकामांच्या उद्घाटनाला ‘दांडी’…


प्राधिकरणातील पाणीटंचाईबाबत सर्वेक्षण सुरू – उपमहापौर मोरे

निर्भीडसत्ता न्यूज – प्राधिकरण, निगडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईसह कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यातील त्रुटी शोधण्यासाठी पाणीपुरवठा विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती उपमहापौर शैलजा मोरे यांनी गुरूवारी (दि.१८) दिली.

तुकाराम मुंढेंची बदली करा: पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निर्भीडसत्ता न्पूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंढे पीएमपीचा कारभार सुधारण्याऐवजी कर्मचा-यांवर कारवाया करत असल्याने नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असल्याचे एकनाथ पवार यांनी म्हटले आहे.

कुशल मनुष्यबळासाठी पुढाकार

पुणे - कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यामुळे स्टार्टअप्सने संगणक अभियंत्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षणाचे कोर्स सुरू केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, ब्लॉकचेन अशा विविध तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रशिक्षण अभियंत्यांना देण्यात येत आहे.

नको असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोचवा

पुणे - तुम्हाला नको असलेल्या वस्तूचे छायाचित्र काढा अन्‌ संकेतस्थळावर अपलोड करा. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वस्तू गरजूवंत पाहतात अन्‌ संपर्क साधून ती घेऊन जातात. अगदी मोफत. हे सर्व कामकाज चालते ऑनलाइन आणि सामाजिक बांधिलकेतून. गेल्या वर्षभरात www.idonateaid.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेकडो वस्तू विद्यार्थी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम व सामाजिक संस्थांना देण्यात आल्या आहेत. 

मोकळ्या भूखंडांचा महिन्यात शोध

पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुणे जिल्ह्यात विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात मोकळे भूखंड, बंद कारखान्यांचा शोध घेण्यात येईल. महिन्यात या कामाला सुरवात होणार असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी सांगितले. 

घरपोच गॅस सिलिंडर नियमाला एजन्सीजकडून बगल

‘कॅश अॅण्ड कॅरीची रक्कम’ एजन्सीच्या खिशात : सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची पळापळ
पुणे – गॅस सिलिंडर घरपोच देणे गॅस एजन्सींना बंधनकारक असतानाही शहरातील काही एजन्सींकडून या नियमाचे पालन होताना दिसत नाही. ग्राहकांना स्वत: गॅस एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेऊन यावा लागतो. ग्राहकाने एजन्सीमधून सिलिंडर आणला तर कॅश अॅण्ड कॅरीचे 18 रुपये 50 पैसे परत मिळण्याचा अधिकार ग्राहकांना असताना एजन्सीकडून या नियमाला सोयीस्कररित्या बगल दिली जात आहे. एजन्सी कॅश अॅण्ड कॅरीची रक्कम कमी करत नाही. यामुळे सर्रास लुट सुरू असल्याचे दिसून येते.

29 वस्तूंवरील “जीएसटी’ शून्य टक्के

49 वस्तूंवरील कर होणार कमी

हातमागाच्या वस्तू होणार स्वस्त

25 जानेवारीपासून अंमलबजावणी

जीएसटी संचालक परिषदेच्या बैठकीत निर्णय

पेट्रोलबाबतचा निर्णय मात्र पुढील बैठकीत

पालकांनों सावधान.. आरटीईचे दलाल पुन्हा सक्रीय

प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याचे होतेय पालकांची लूट

प्रभात वृत्तसेवा

अशी होते फसवणूक
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये थेट हस्तक्षेप करता येत नाही. परंतु काही दलाल पालकांकडून पैसे घेतात व नियमित त्या विद्यार्थ्यांचा अर्ज आरटीई प्रक्रियेतून भरुन घेतात. जर विद्यार्थ्यांचा नंबर नियमित प्रक्रियेत लागला तर तो आम्हीच सांगून लावून घेतला असल्याचे सांगत पालकांकडून पैसे घेतात. अशिक्षित पालकांनाही आपले मूल इंग्रजी शाळेत जावे असे वाटत असल्याने ते पालक अगदी कर्ज काढूनही ही रक्‍कम देण्यास तयार होतात.

इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशासाठी सीईटीचे वेळापत्रक जाहीर

पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रीकल्चर या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी दि. 10 मे रोजी होणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 मार्चपर्यंत राहणार आहे, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आज जाहीर करण्यात आले.

पुणे-नाशिक, तळेगाव-शिक्रापूर महामार्ग सक्षम करणार

राजगुरूनगर-पुणे-नाशिक महामार्ग व तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन्ही महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे असल्याने या महामार्गाचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकाच्या माध्यमातून सोडविला जाईल हा महामार्ग मोठा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून हे दोन्ही महामार्ग सक्षम केले जातील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर येथे केले.

Pune petrol pump first one in state to be sealed for 'fraud, cheating customers'

At least two other petrol pumps in the state are also likely to be sealed as they had also tampered with the fuel dispensing machines to cheat customers, said the All India Petrol Dealers’ Association.

Thursday, 18 January 2018

[Video] सुखवार्ता | पर्यावरण रक्षणासाठी पिंपरी-चिंचवडच्या तरुणाची भन्नाट शक्कल

Pimpri Chinchvad Sukhvarta On Varun Salunkhe Recycle Pevhing Block From Plastic And Rubber

तुकाराम मुंडेंपेक्षा हिटलर बरा...त्यांना परत पाठवा! 

पिंपरीः पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत पाठविण्याची जोरदार मागणी आज पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. मुंडे यांनी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फी केल्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरीच्या स्थायी समितीनेही त्यांच्याविरुद्ध हे टोकाचे पाऊल उचलले. 

250 truckloads of water hyacinth removed in 71 days from Pavana

Pimpri Chinchwad: Some social organizations removed 250 truckloads of water hyacinth from Pavana river in 71 days during a cleanliness drive.

जे.के.यु रोड खोदाई करणाऱ्या रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करा

चौफेर न्यूज – जे.के.यु रोड खोदाई करणाऱ्या रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी- चिंचवड शहरप्रमुख  युवराज दाखले यांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.