Saturday, 29 September 2018

बेशिस्त 24000 वाहनचालकांवर कारवाई

पिंपरी - पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी तब्बल 24 हजार 103 जणांवर कारवाईस सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात वाहतुकीला शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही. 

Pimpri Camp traders eye biz boost after heavy vehicle ban

PIMPRI CHINCHWAD: Traders from Pimpri Camp expect to do bett ..

Super-specialties to come up in twin cities

PCMC’s five hospitals will get upgraded; authorities also identifying land to build a separate multi-specialty hospital; now the proposal awaits approval

सुदर्शननगर चौकात “ग्रेड सेपरेटर’

पिंपरी – पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर चौकात महापालिकेच्या वतीने 335 मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. यासाठी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत 27.86 कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. हा ग्रेड सेपरेटर नाशिकफाटा – वाकड बीआरटीएस रोडला जोडला जाणार आहे.

‘सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विषय घुसडतात’

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी सभा कामकाजात आयत्यावेळी चुकीच्या पद्धतीने विषय घुसडले. नगरसेवकांना देखील त्याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत आयत्यावेळी विषय घेण्यास नगरसेविका मंगला कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच तहकूब सभेत कोणत्या नियमाच्या आधारे विषय दाखल करुन घेतले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्मार्ट सिटीसाठी मालमत्ता देण्याचे अधिकार आयुक्तांना

पाच वर्षात केंद्र सरकारचे 500 कोटींचे अनुदान मिळणार 
महासभेची मान्यता घेणे बंधनकारक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतीसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीऐवजी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहेत. तसेच त्याला महासभेची मान्यता घेणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अभियानाचा कालावधी पाच वर्षाचा असून या योजनेत पाच वर्षात केंद्र सरकारचे 500 कोटींचे अनुदान मिळणार आहे. महापालिका आयुक्त हर्डीकर यांना जरी मालमत्तेबाबतचे अधिकार देण्यात आले असले तरी, कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महासभेची आयुक्तांनी मान्यता घेणे आवश्यक असल्याचे महासभेने नुकतेच जाहीर केले आहे.

पोलीस हप्ते घेण्यात दंग; नगरसेवकांचा हल्लाबोल

शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे : मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
सर्वसाधारण सभेत निषेध; पोलीस आयुक्तांना महापालिकेत पाचारण करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुणी सर्वच असुरक्षित आहेत. सोनसाखळी हिसकावणे, मोबाईल चोरी, भुरट्या चोर्‍यांचा कहर झाला आहे. पोलीस ठणे, चौक्या हप्ते वसुलीचे ठिकाणे झाली आहेत. पोलिसांचा उतमात वाढला असून तक्रारकर्ते, पीडितांनाही दाद देत नाही त्यांच्यावरच कायद्याचा दंडुका उगारला जातो, अशा संतप्त शब्दात सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेकानी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गुरुवारी टीकेची झोड उठवली.

पिंपरीतील शगुन चौकातील अतिक्रमणांवर कारवाई

पिंपरीच्या शगुन चौकातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

Pimpri Chinchwad police launch public awareness campaign for traffic violations

The Pimpri Chinchwad police commissionerate has taken a deci ..

‘Set up committee to watch PCMC hospitals’

Activists write to civic body chief, citing deteriorating patient care

PCMC catches 176 employees loitering

During surprise checks conducted over two days, the civic bod ..

रेंजहिल्समध्ये मेट्रोचे काम आठवड्यात

पिंपरी, ता. 28 - शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जात असले तरी हॅरिस पुलानंतरचे काम सुरू झालेले नव्हते. संरक्षण विभागाने काम सुरू करण्यासाठी महामेट्रोला परवानगी दिल्याने हा महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. रेंजहिल्समध्ये येत्या आठवड्याभरात मेट्रोचे काम सुरू होईल. 

“बंद’ला प्रतिसाद “थंड’

पिंपरी – रिटेल क्षेत्रामध्ये सरकारने शंभर टक्‍के थेट परकीय गुंतवणुकीला दिलेल्या मंजुरीच्या विरोधात “कॅट’ या व्यापारिक संघटनेने देशव्यापी “भारत व्यापार बंद’चे आवाहन केले होते. शहरातील बहुतेक सर्वच व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याची घोषणा केली होती. परंतु शहरामध्ये तसेच उपनगरांमध्ये या “बंद’ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शहरातील सुमारे 4500 दुकानांपैकी 20 टक्‍के दुकाने देखील बंद नव्हती. सामान्य नागरीक तर दूरच परंतु कित्येक व्यापाऱ्यांनी देखील या “बंद’ बद्दल कल्पना नसल्याचे दिसून आले.

आता जयंती उत्सवांसाठी ट्रस्ट

पिंपरी – उच्च न्यायालयाने करदात्यांच्या पैशातून धार्मिक सण व उत्सव साजरे करण्यास महापालिका व स्थानिक संस्थांना बंदी केली आहे. यामुळे महापालिकेसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत उत्सव व जयंती साजरी करण्याबाबतचे धोरण महापालिका प्रशासनाकडे नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 28) आयोजित बैठकीत नाराजी व्यक्त केली. जयंती उत्सव साजरे करण्यासाठी महापालिका ट्रस्ट स्थापन करणार असून गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर लवकरच शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पिंपरी महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग ‘गाढ झोपेत’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. भटकी कुत्री, डुक्करांच्या समस्यांनी नगरसेवकांची झोप उडवली आहे. मात्र या प्रश्नाचं महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला काहीच देणंघेणं नसल्याचं समोर आलं आहे. शहरात भटकी कुत्री आणि डुक्करांचा प्रश्न ‘आ’वासून उभा असताना पिंपरीत असलेल्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी भर दुपारी ऑनड्युटी कार्यालयात खुर्चीवर बसून ‘गाढ झोपेत’ असल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट टीव्ही प्रेक्षपणाची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा सतत वादळी ठरत आहेत. या सभेचे शहरातील टीव्ही वृत्तवाहिनीवरून नागरिकांसाठी थेट प्रक्षेपणाची सोय करावी, अशी मागणी  थेरगावातील सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी महापौर राहूल जाधव यांच्यासह सर्व गटनेत्यांकडे केली आहे.

स्वच्छ सुंदर शहरासाठी दोन ऑक्टोबरपर्यंत शहरात स्वच्छता मोहिम

स्वच्छ सुंदर शहरासाठी’,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्याची सुरूवात नुकतीच करण्यात आली. या कालावधीत श्रमदान, सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतेची शपथ, प्रभात फेरी यांचे आयोजन करण्यात येत आहे.

शर्मिला बाबर यांची विद्यापीठ अधिसभेवर नियुक्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर 2018-19 साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविका व शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पेन आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे भारतातील पहिले संमेलन आकुर्डीत रंगले

निर्भीडसत्ता न्यूज –
जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन आंतरराष्ट्रीय काँग्रेस’ या संस्थेचे संमेलन पेन साऊथ इंडिया सेंटरच्या वतीने ८४ व्या आंतरराष्ट्रीय पेन काँग्रेसचे आयोजन पहिल्यांदाच पुण्यात झाले. दि. २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या चार दिवसाच्या परिषदेमध्ये पुणे विद्यापीठातील काही निवडक महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यात आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाची निवड करण्यात आली.

भोसरीत 2 ऑक्टोबरला गदिमा कविता महोत्सव

भोसरी : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यातर्फे गीतरामायणकार ग.दि. माडगुळकर जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी (2 ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय 25 वा गदिमा कविता महोत्सव भोसरीत आयोजित केला आहे, अशी माहिती संयोजक पुरुषोत्तम सदाफुले व मुरलीधर साठे यांनी दिली. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार्‍या महोत्सवाचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस असतील.

शहरातील विद्यार्थी करणार नागरिकांचे प्रबोधन

निबंध, चित्रकला स्पर्धांचे इसिएकडून आयोजन
पिंपरी : इन्हॉयरमेंट कन्झर्वेशन असोसिशनच्यावतीने पिंपरी-चिंचवड मनपा शाळांच्या सोबत स्वच्छ भारत जनजागरण फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी 635 शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत जनजागरणबाबत लाखो विद्यार्थी शिस्तबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचे नियोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत विभाग प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 28 सप्टेंबरपासून शाळांमध्ये रोज स्वच्छता शपथ घेण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत मुलांना रोजच्या परिपाठात ही शपथ घेतली जाणार आहे. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.

स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करण्याच्या सूचना

भोसरी : महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणार्‍या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे.  खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. वर्षभरापासून त्याचे काम सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (दि.26)पालिकेच्या अधिका-यांसमवेत कामाची पाहणी केली. त्यावेळी आमदार लांडगे यांनी अधिकार्‍यांना काम दर्जेदार करण्याबरोबरच विविध सूचना दिल्या आहेत. यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता राहुल जन्नू, निलेश केदार, वास्तूविशारद पंकज कांबळे, राहुल राणे, योगेश कुमावत, ठेकेदार आनंद निकुंभ, मंदार कुलकर्णी उपस्थित होते.

चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा झाला विस्कळीत

नगरसेविका चिंचवडे यांनी केला निषेध 
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरुन देखील शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात देखील पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी महासभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांचा निषेध केला. त्यामुळे परिसरात समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला द्याव्यात, अन्यथा महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही नगरसेविका चिंचवडे यांनी दिला.

पुणे- लोणावळा लोकलच्या चार फेऱ्या रद्द

पुणे  - पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोहमार्ग देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार (ता. 1) ते 17 ऑक्‍टोबरपर्यंत दररोज तीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या काळात पुण्याहून लोणावळ्याला जाण्यासाठी दुपारी सव्वाबारा आणि एक वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच लोणावळ्याहून पुण्याला येण्यासाठी दुपारी दोन आणि तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

“थिसेनक्रुप’च्या कामगारांना 15 हजारांची वेतनवाढ

पिंपरी – येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये कामगारांना ऐतिहासिक मुदतपूर्व वेतनवाढ करार पार पडला. या करारानुसार कामगारांना सरासरी 15 हजार 250 रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.

शहरातील नऊ जणांना व दोन शाळांना कृतीशील जिल्हास्तरीय पुरस्कार

निगडी – महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय कृतीशील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील नऊ जणांना व दोन शाळांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. कृतीशील मुख्याध्यापक म्हणून चिंचवड येथील फत्तेचंद जैन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हिंदूराव नानासाहेब कलंत्रे, वाल्हेकरवाडी येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जयसिंग शितोळ यांची निवड करण्यात आली आहे. कृतीशील शिक्षक पुरस्कार धनराज संभाजी गुटाळ, गणेश अण्णा झोडगे, वंदना अलोक मिश्रा, माया माणिक पाटोळे, सौदागर कृष्णा केमदाराने यांना दिला जाणार आहे. तसेच कृतीशील शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार बिपीनचंद्र दादासाहेब माने, संदिप कारभारी गर्कळ यांना जाहीर करण्यात आला आहे. शहरातील कृतीशील शाऴा म्हणून ज्ञानदीप माध्यमिक व सौ अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालय रुपीनगर-तळवडे व शिवभूमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यमुनानगर निगडी यांनी जाहिर झाला आहे.

शालेय पोषण आहारात लवकरच दूध

पुणे – दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करण्याच्या अंमलबजावणीला लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबतची प्रक्रिया अंतीम टप्यात असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.

Friday, 28 September 2018

...आता कुठे पोलिसांमध्ये ‘सिंघम’ दिसला

सर्वत्र अंधकार पसरलेला असताना कुठेतरी एखादा कवडसा दिसावा, तसा अनुभव सध्या पिंपरी चिंचवडकर घेत आहेत. खून, खंडणी, दहशतवाद, चोरी, लूटमार, हाणामारी, टवाळखोरी, गुंडागर्दीमुळे शहर बदनाम झाले होते. सर्व सोयींनीयुक्त असे हे सुंदर, समृद्ध शहर राहण्यायोग्य राहिले नव्हते. वाहतूक समस्येने लोक हैराण होते. रोजच्या वाहतूक कोंडीत मेटाकुटीला आलेल्या हिंजवडीतील चार लाख आयटी कर्मचाऱ्यांनी आणि काही उद्योजकांनीही ‘आता पुरे’ची भाषा सुरू केली होती. प्रशस्त रस्ते असूनही रोजचे अपघात सुरूच होते. बेशिस्त वाहनचालकांमुळे शिस्तबद्ध चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. बाहेरून आलेल्या काही मुजोर रिक्षाचालकांमुळे सर्व रिक्षाचालकांची नालस्ती झाली होती. थोडक्‍यात गुन्हेगारी आणि एकूणच वाहतूक समस्येने सर्वसामान्य नागरिकांना नको नको झाले होते, कहर झाला होता. अशा परिस्थितीत आर. के. पदमनाभन्‌ यांच्यासारखा पहिलाच एक ‘सिंघम’ पोलिस आयुक्त शहराला लाभला.

शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा – राहुल जाधव

चौफेर न्यूज – शहर स्वच्छते मध्ये नागरीकांनी सहभाग द्यावा, असे आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास खात्या तर्फे नॅशनल इन्सिट्युट ऑफ अर्बन अफेयर्स आणि इकले साऊथ एशिया यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिका-यांची कार्याशाळा आयोजित करण्यात आली आहे त्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

दुचाकीची सीएनजी किट ‘गॅस’वरच

पिंपरी - दुचाकीच्या सीएनजी किटसाठी अर्थसाह्य देण्याचे बॅंकांनी नाकारल्यामुळे ही योजना फसली आहे. शहरामध्ये १६ लाख दुचाकी असून आतापर्यंत केवळ १५० दुचाकींना हे किट बसविण्यात आले आहे. 

मेट्रोचे काम 30 टक्के पूर्ण

पिंपरी-चिंचवड : वाढणारी वाहनांची संख्या, त्यामुळे होणारे प्रदूषण आणि प्रवासासाठी लागणार वेळ या सर्वांना पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात आहे. मेट्रोच्या वतीने शहरात मार्गिका क्रमांक एकचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवड करांना मेट्रोतून सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे.

शहरात कॅन्सर रुग्णालय बांधा – माजी महापौरांची मागणी

पुण्याच्या धर्तीवर पिंपरीतही माजी महापौरांची संघटना
निगडीत महापौर निवासस्थान उभारणार : राहुल जाधव
पिंपरी-चिंचवड : शहरातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात प्रशस्त कॅन्सर रुग्णालय बांधण्यात यावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवण्यात यावी, अशी मागणी शहराच्या माजी महापौरांनी केली. तसेच माजी महापौरांसाठी पालिका मुख्यालयात कार्यालय करावे, वैद्यकीय विमा चालू करावा, पालिकेच्या कार्यक्रमांना बोलविण्यात यावे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी, मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव द्यावे. आंद्रा-भामा आसखेड, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावावा, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर पुण्याच्या धर्तीवर पिंपरीत देखील माजी महापौरांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, महापौरांच्या निवासस्थानासाठी निगडीत आरक्षण आहे. त्याठिकाणी महापौर निवास्थान बांधण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

महापालिकेच्या वायसीएम व जलशुद्धीकरण केंद्रात सौर उर्जा प्रकल्प उभाणीस मंजुरी

सौर उर्जेतून वीज निर्मिती प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तेचा ताबा तब्बल 25 वर्षे ठेकेदार एजन्सीला मोफत का द्यायचा. पालिकेची आर्थिक क्षमता असताना ठेेकेदाराला पोसण्यासाठी हा प्रकल्प का राबवायचा, असा सवाल सत्ताधार्‍यांसह विरोधी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित करीत, आयुक्तांसह अधिकार्‍यांना धारेवर धरले. अखेर विरोध डावलून सत्ताधार्‍यांनी क्‍लीन मॅक्स कंपनीसोबत रेस्को तत्वावर सदर 459 किलो वॅटचा प्रकल्प यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) व सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यास मंजुरी दिली.

११७६ फुकटय़ा प्रवाशांवर ‘पीएमपी’कडून कारवाई

पीएमपीकडून निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला आहे.

पिंपरी : शहरातील महिला अत्याचाराचे पडसाद सर्वसाधारण सभेत

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. मात्र शहरातील गुन्हेगारी आणि महिला सुरक्षित आजही नाहीत..शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांची हप्तेखोरी वाढली आहे. तक्रारदारांना न्याय देण्याचे सोडून त्यांच्यावरच कायद्याचा दंडुका उगारला जातो, अशा संतप्त शब्दात सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेकानी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज (गुरुवारी) सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठवत सभा तहकूब केली.

गिधाड प्रवृत्ती ठेचायलाच हवी


आज मध्यरात्रीपासून विमान प्रवास, एसी, वॉशिंग मशिन, फ्रीज महागणार

येत्या पाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही जर एसी, वॉशिंग मशिन, फ्रीज अशा वस्तू खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्याकरिता महत्वाची आहे. कारण या वस्तू आता महाग होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. यामध्ये विमान इंधन, वातानुकूलन यंत्रणा (एसी), वॉशिंग मशिन आणि फ्रीजचा समावेश आहे. यामुळे या वस्तूंच्या खरेदीकरिता रक्कम मोजावी लागणार आहे.

[Video] पिंपरी पालिकेच्या अधिकाऱ्याची चौकशी करा -आमदार चाबुकस्वार

पिंपरी पालिकेच्या अधिकाऱ्याची चौकशी करा -आ.चाबुकस्वार यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणार-हर्षल ढोरे

जुनी सांगवी (पुणे) : सांगवी व परिसरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने समाज बांधवांना इतरत्र जावे लागते. येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभरात प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा सांगता समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

[Video] पिंपरी पालिकेच्या गेटवरच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना रोखले !


Thursday, 27 September 2018

नदीप्रदूषण उद्योगांना भोवले

पिंपरी - औद्योगिक कंपन्यांकडून रसायनयुक्‍त पाणी नदीमध्ये सोडण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दीड महिन्यात शहरातील 21 कंपन्यांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला आहे. 

पिंपरीत रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे वाहतुकीचा बोजवारा

पिंपरीतील आंबेडकर चौक हा सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यापैकी एक आहे.

पिंपरीत वाहतुकीत अडथळे

महामेट्रोच्या कामांमुळे पिंपरी ते खराळवाडी तसेच पुणे मुंबई महामार्गावर काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे वाहनचालकांना वळणे वळणे घेत वाहने चालवावी लागत आहे.

स्केटिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या; आमदार महेश लांडगे यांचे अधिका-यांना निर्देश

अधिका-यांसमवेत कामाची केली पाहणी
निर्भीडसत्ता न्यूज  –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणा-या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे.  खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. 

Property cess concessions in PCMC area

Pimpri Chinchwad: Illegal constructions in the Pimpri Chinch .. 

‘पंतप्रधान आवास’च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पातील बांधकामांचा दर बाजारभावापेक्षा अधिक आहे. सदर प्रकल्पाचा ‘डीपीआर’ जाणीवपूर्वक चुकीचा पद्धतीने तयार केल्याबद्दल संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसर्‍यांदा केली आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत, अशी माहिती आ. चाबुकस्वार यांनी बुधवारी (दि.26) पत्रकार परिषदेत दिली.

स्वच्छता सप्ताह अंतर्गत मोरवाडी परिसर ‘चकाचक’

चौफेर न्यूज –  स्वच्छ भारत अभियान सप्ताह अंतर्गत ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पुढाकाराने प्रभागातील मोरवाडी परिसरात बुधवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. सकाळी साडेसात ते दहा या अडीच तास राबविलेल्या अभियानात संपूर्ण परिसर, रस्ते चकाचक करण्यात आले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंना ‘सायबर क्राईम’चा फटका

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डची गोफणीय माहिती हॅक करुन ५६२६.६ अमेरिकन डॉलर ऑनलाईन पध्दतीने काढून घेतले आहेत. सायबर क्राईम हा पोलिसासमोरील मोठा विषय झाला आहे. यापूर्वी शहरातील अनेकांना सायबर क्राईम द्वारे गंडा घातला असून आता तर चक्क आमदारांच्या बंधूंना याचा फटका बसला आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी “पोलीस आपल्या दारी’

पिंपरी – “पोलीस आपल्या दारी योजने’द्वारे पोलीस आता थेट नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या तक्रारींची दाखल घेणार आहेत. तसेच “फोन अ फ्रेन्ड’ उपक्रमाद्वारे शहरातील गुन्ह्यावर आळा बसवणार असल्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नवीन संकल्पना

आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये कायम सुसंवाद राहायला हवा. पोलीस यंत्रणा समाजात समाजासाठी काम करत आहे, याचा अनुभव नागरिकांना यायला हवा. ठाण्यात पोलीस नाही, तर समाजात दिसायला हवेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर ‘फोन अ फ्रेंड’ आणि ‘पोलीस आपल्या दारी’ या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

सूचना व हरकती नंतर पुन्हा एक महिना

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करत असताना सर्व प्रथम आयटी पार्कचा विचार करण्यात आला. हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत वाहतूक विभागाने चक्राकार वाहतुकीत अंशतः बदल केले आहेत. हे बदल आज (दि. 25) ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा प्रायोगिक तत्वावर सुरु ठेवण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे 24 ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात जमा कराव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

वाहतूक बदल कायम

आयटीपार्क हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथील शिवाजी चौकात चक्राकार वाहतूक योजना राबविण्यात आली. त्यानंतर भूमकर चौकात होणारी कोंडी लक्षात घेऊन तेथे नो राइट टर्न (दुतर्फा एकेरी) वाहतूक योजना राबविली जात आहे. यामध्ये काही आयटीयन्स आणि स्थानिकांनी दिलेल्या सूचनांवरून दोन बदल करण्यात आले आहेत. तसेच २६ ऑक्टोबर पर्यंत हे बदल कायम राहणार आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण शहरातील रस्त्यांवर सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

बेशिस्त १७० पालिका कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

महापालिकेच्या तब्बल 170 बेशिस्त कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहेत. त्यांच्यावर ओळखपत्र न लावणे, गणवेश न घालणे, रजेचा अर्ज न देता सुटी घेणे, फिरती रजिस्टरवर सही न करता परस्पर बाहेरील कामासाठी जाणे आदी बेशिस्तीचा ठपका ठेवला आहे.  प्रशासन विभागाचे नवे प्रमुख मंगेश चितळे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारताच बेशिस्त कर्मचार्‍यांवर बडगा उगारला आहे.

महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते माजी महापौरांचा सन्मान

शहरात कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पीटल बांधावे. त्यासाठी २ एकर जागा आरक्षित ठेवावी. माजी महापौरांसह एका प्रतिनिधीला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सन्मापुर्वक बसण्यासाठी जागा ठेवावी. सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. वाचनालय, स्पर्धा परिक्षा केंद्र महिलांसाठी लघु उद्योग तातडीने सुरू करावेत, अशा अनेक सूचना माजी महापौरांनी आज बुधवारी (दि. 26) बैठकीत केल्या.

पिंपरी-चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट पतसंस्थांना देण्यात येणारा दीपस्तंभ पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यातील पतसंस्था संचालकांचे दोन दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटप्रसंगी मंगळवारी (25 सप्टेंबर 18) सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी आमदार बाळा भेगडे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त सतीश सोनी,  लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन झिंजूर्डे तसेच पतसंस्थेचे चेअरमन आबा गोरे व संचालक उपस्थित होते.

“इलेक्‍ट्रीकल वाहन’ उद्योगांसाठी लघु उद्योगांना तयार करावे

पिंपरी – वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुळे सरकार येत्या काळात इलेक्‍ट्रिक वाहन निर्मितीवर भर देणार आहे. या नवीन बदलांमध्ये पिपंरी-चिंचवडच्या लघु उद्योगांना प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या योजनांद्वारे इलेक्‍ट्रिक वाहन उद्योगासाठी तयार करावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या मनपा कर शास्तीमध्ये थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम एक रक्कमी ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ९०टक्के सवलत मिळणार आहे. तर दि.१६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ७५ टक्के सवलत देण्याच्या अभय योजनेस स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मनपा शास्तीच्या सवलतीच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम – मारुती भापकर

पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतींबाबत मनपा कर शास्तीमध्ये देण्याची माफी व सवलत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शास्ती (झिजीया) कराबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम दूर करून नागरिकांच्या खिशाला कुठलाही आर्थिक भृदंड न देता संपूर्ण शास्तीकर माफी व नाममात्र दंड आकारून घरांचे नियमितीकरण करावे, अशी मागणी मारुती भापकर यांनी महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

सह्याद्री फाऊंडेशन व वीर वाद्यपथकातर्फे इंद्रायणी घाटनदी स्वच्छता

सह्याद्री फाऊंडेशन व वीर वाद्यपथक भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक उपक्रम आज आयोजित करण्यात आला होता. च-होली परिसरातील इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे एकत्रीकरण करून नदी पात्र प्रदूषण मुक्त करण्यात आले. संपूर्ण घाट स्वच्छ करण्यात आला.

उद्योजकांनी बिनपावत्यांचे व्यवहार टाळावेत

उद्योजकांनी नवी मूल्ये आत्मसात करण्याबरोबरच व्यवसायात पारदर्शकता ठेवणे ही काळाची गरज आहे.

सोळाशे अभियंत्यांना रोजगार

पुणे - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने १ हजार ६०० अभियंते नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे तांत्रिक पर्यवेक्षण, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या अभियंत्यांवर  राहणार आहे. या अभियंत्यांना ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंता’ म्हणून ओळखले जाणार असून, जिल्हा परिषद बाह्य यंत्रणेद्वारे त्यांची नेमणूक करणार आहेत. त्यामुळे आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्याबरोबरच १६०० अभियंत्यांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे.

जाणून घ्या : आधार कुठे बंधनकारक आणि कुठे नाही

नवी दिल्ली – सरकारी योजनांपासून ते शाळेत प्रवेश मिळवण्यापर्यंत अशा अनेक ठिकाणी सरकाने आधार कार्ड अनिवार्य केले होते. याविरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने आधार कार्ड संविधानिकरीत्या वैधच ठरवले. परंतु, आधार सक्तीमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. जाणून घेऊया कोणत्या गोष्टीत आधार बंधनकारक –

न्यायालयातील कामकाजाचे होणार थेट प्रक्षेपण, सुप्रीम कोर्टाचा निकाल

चौफेर न्यूज – न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याची सुरूवात सुप्रीम कोर्टातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.

Wednesday, 26 September 2018

‘अनधिकृत’वर गुन्हे नको, कारवाई हवी

अनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीलाही त्याच तापल्या तव्यावर भाजपने आपली पोळी भाजून घेतली. मूळ प्रश्‍न आहे तिथेच आहे. निवेदने, मोर्चे, आश्‍वासने, आदेश, अध्यादेश या चरख्यात पावणेदोन लाख अनधिकृत बांधकामे अडकली. राजकारण्यांचा खेळ सुरूच आहे. दुसरीकडे प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने आणि राज्यकर्त्यांचे अभय असल्याने आजही ही अनधिकृत बांधकामे थांबायचे नाव घेत नाहीत. महापालिकेने आजवर फक्त नोटिसा पाठविण्यातच तीन-चार कोटी खर्च केले असतील. शेकडोने फौजदारी गुन्हे दाखल केले, पण सारेच्या सारे अगदी सहीसलामत सुटले. नव्याने अनधिकृत करू नका, असा कंठशोष प्रशासन करते; पण तिकडे ढुंकून कोणीही पाहत नाही. परिणामी, शहर अधिकाधिक बकाल होत आहे. नदीच्या पूररेषेतील, आरक्षणातील आणि रस्त्यात येणारी अनधिकृत बांधकामे कदापी नियमित होणार नाहीत, असेही थेट मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी बजावून सांगितले. त्याचाही परिणाम शून्य आहे. 

‘आयटीयन्स’ची डोकेदुखी

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे थे’ आहे. चाकण परिसरातून येणारी जड वाहनांची वाहतूक तळवडे आयटी पार्क भागातून होत असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना ये-जा करणे डोकेदुखी ठरत आहे. 

PCMC: Police inaction preventing us from running BRTS smoothly

AFTER work on the Pune Metro and the dedicated Nigdi-Dapodi BRTS lane had started, the 13-km stretch of the Pune-Mumbai Highway under the jurisdiction of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been witnessing regular traffic jams. Compounding the problem are the encroachers, who have, for years, captured the portion of the highway.

Pune Metro, Nigdi-Dapodi BRTS, Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad Municipal corporation, PCMC, Pune news

Seal on tenement proposal for Borhadewadi, Akurdi & Pimpri

Pimpri Chinchwad: A state-level committee on Friday sanctioned the revised detailed project report on the affordable houses under the Pradhan Mantri Awas Yojana at Borhadewadi, Akurdi and Pimprigaon.

PCMC helpline hits snag as complaints are closed without being resolved

Probe reveals extreme negligence by staff, officials to conduct routine audit of each individual plaint

१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या मनपा कर शास्तीमध्ये थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम एक रक्कमी ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ९०टक्के सवलत मिळणार आहे. तर दि.१६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ७५ टक्के सवलत देण्याच्या अभय योजनेस स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

[Video] पोलीस, पोलीस ठाण्यात नाही तर समाजात दिसायला हवेत : पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन


[Video] “फोन ऑफ फ्रेण्ड” पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची नवीन संकल्पना

शहरात घडलेल्या अनुचित घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलीस कर्मचा-यांच्या वेगवेगळी पथके तयार केली जाणार आहेत. एखाद्या भागात गुन्हेगारी घटना घडल्यास नागरिकांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. अवघ्या काही वेळातच त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक हजर राहील. त्यामुळे गुन्हेगारी कृत्याला आळा बसून पोलिसांना माहिती कळविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना प्राप्त होईल. त्यामुळेच “फोन ऑफ फ्रेण्ड” पोलीस आपल्या दारी ही संकल्पना राबविली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील डीपी रस्त्यातील अनधिकृत बांधकामावर पालिका थेट कारवाई करणार – महापौर राहूल जाधव

पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांमुळेच पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे. आता अंतर्गत डीपी रस्ते विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी आरक्षित जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. डीपी रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय महापौर राहूल जाधव यांनी घेतला आहे. तशा सूचनाही त्यांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिल्या आहेत. काही दिवसांत डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे, तसेच यात राजकीय हस्तक्षेप चालू देणार नाही अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.

महामेट्रोला लागणाऱ्या शासकीय जागांबाबत सहकार्य करण्याची ग्वाही

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी दरम्यान करण्यात येणाऱ्या दोन मेट्रो मार्गिकांसाठी एकूण ४२ हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यापैकी ३८.३० हेक्टर जागा शासकीय आहे. मेट्रो प्रकल्पासाठी लागणाऱ्या शासकीय जागा मिळवून देण्याबाबत महामेट्रोला सहकार्य करू, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली.

भुयारी मेट्रोचे काम महिन्यात

पुणे  - पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गातील कृषी महाविद्यालय ते फडके हौद आणि फडके हौद ते स्वारगेटदरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या निविदा एक महिन्यात मंजूर होणार असल्याचे महामेट्रोकडून मंगळवारी सांगण्यात आले. भुयारी मेट्रोसाठी सुमारे 250 कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी तीन पर्याय तयार केले आहेत. प्रत्येक कुटुंबाशी चर्चा करूनच या बाबतचा प्रश्‍न सोडविला जाणार असल्याची ग्वाही महामेट्रोतर्फे देण्यात आली. 

पिंपरी महापालिकेतील १०० कर्मचारी कामचुकार

कामाच्या वेळेत बाहेर फिरणारे, उपाहारगृहात तास न् तास गप्पांचे फड रंगवणारे, विनापरवाना गैरहजर राहणारे अशाप्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांची मंगळवारी एका मोहिमेद्वारे अचानक तपासणी घेण्यात आली. पालिका मुख्यालयातील या तपासणी मोहिमेत १०० हून अधिक कर्मचारी दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार?

पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित नाट्यगृहांचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाट्य कलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय होत आहे. प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्‍टोबर उजाडणार आहे, तर अत्रे रंगमंदिराचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.  

अधिकृत शाळांना ठरविले अनधिकृत

पिंपरी - महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारची अधिकृत मान्यता मिळालेल्या शाळेला अनधिकृत ठरवण्याचा प्रताप शिक्षण विभागाने केला आहे. पिंपरी गावातील बालगोपाल विद्या निकेतन व आळंदीतील जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल या दोन शाळांना सरकारची मान्यता असूनही शिक्षण विभागाने अनधिकृत ठरवीत नोटीस बजावल्या आहेत. संस्था चालकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर चुकीचा खुलासा करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. 

Maha govt to procure 1,000 e-vehicles in 1 yr

Maharashtra government will be getting 1000 electric vehicl ..

ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या विरोधात २८ सप्‍टेंबरला 'भारत बंद'

किरकोळ व्यापार अस्थिर व उध्वस्त करू शकणाऱ्या वॉलमार्ट- फ्लिपकार्ट करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोध करण्यासाठी शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली यांनी संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यास भारत भरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील सर्व संस्थांनी या बंदला पाठींबा दर्शविला आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद

पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘झी’ दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेच्या प्रमुख कलावंतांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिंचवड वाल्हेकरवाडी येथील ‘आहेर गार्डन’या ठिकाणी शनिवारी दि.२९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.

महापालिकेतर्फे राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्यांचा गौरव

महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटने मार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धेत सहभाग घेऊन कांस्य पदक मिळवल्याबद्दल प्रणित आढाव व रुजुला देव घरे यांचा तसेच त्यांना प्रशिक्षित करणा-या प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.

शहरबात : पाहणी दौऱ्याचा फार्स

पिंपरी महापालिकेच्या १८ माध्यमिक आणि १०५ प्राथमिक शाळांमध्ये ३८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना ११५० शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. श्रीमंत म्हणवणाऱ्या महापालिकेच्या शाळांची सध्याची अवस्था सांगण्यापलीकडची आहे. वर्षांनुवर्षे कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. त्याचा विद्यार्थ्यांना जराही उपयोग होत नाही. शाळांचा दर्जा खालावलेला असून सध्या विद्यार्थ्यांच्या गळतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक पाहणी दौरे होतात. त्यातून काडीचीही सुधारणा होत नसल्याचे यापूर्वीचे अनुभव आहेत.

माजी महापौरांचा होणार सत्कार

पिंपरी– महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत शहराचे प्रथम नागरिक हे महापौरपद भुषविणाऱ्या सर्व माजी महापौरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि.26) दुपारी एक वाजता हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात होणार आहे, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी दिली. माजी महापौरांच्या अनुभवाचा शहर विकासात हातभार लागावा, त्यांचे मार्गदर्शन लाभावे, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत माजी महापौरांशी संवाद साधून, त्यांच्याकडून विविध सुचना व अपेक्षित बदलांविषयी चर्चा केली जाणार आहे. तसेच या सर्वांचा महापालिकेच्या वतीने पुस्तक भेट देऊन सत्कार केला जाणार आहे.

महापालिकेत वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात शेकडो कर्मचारी, अधिकारी काम करतात, तसेच विविध कारणांमुळे दिवसभरात शेकडो नागरिक मुख्यालयाला भेट देतात. मात्र, वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत कोणतीही वैद्यकीय मदत मिळत नसल्याने, मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची मागण व्विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पत्रकारांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास

मुंबई: एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना प्रवास सवलत दिली जाते. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यात पत्रकारांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू करण्यात आली.

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमात १२ हजार ३०० मूर्तींचे संकलन

चौफेर न्यूज –  पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्तीदान करण्याचे आव्हान नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे. यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,.पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण १२ हजार ३०० मूर्ती दान करण्यात आल्या.

थकबाकीदारांना डिजिटल नोटीस

पुणे - थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम मधील तरतुदीनुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार थकबाकीदार वीजग्राहकांना व्हॉट्‌सॲप, एसएमएस, ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याचा आणि वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला मान्यता दिली आहे.

ड्रोनने आता मालमत्तेचा नकाशा

देशात ड्रोन प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात नवीन नियम डिसेंबरपासून लागू होत आहेत. अशा स्थितीत रिअल इस्टेट क्षेत्र देखील हे तंत्र वापरास तयार आहे. उद्योगजगतातील तज्ज्ञांच्या मते, मालमत्तेची थ्रीडी मॅपिंग ही मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकतेला चालना देणारे ठरू शकते. नवीन तरतुदीनुसार ड्रोनचा व्यावसायिक वापर हा एक डिसेंबरपासून वैध ठरला जाणार आहे.

Tuesday, 25 September 2018

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतुकीत मोठे बदल

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक विभागाकडून विविध ठिकाणी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठराविक वेळेत हे बदल असणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. हे सर्व बदल प्रायोगिक तत्वावर (२४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर) सुरू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या बदलांबाबत नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर त्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे लेखी स्वरूपात जमा करण्याचे आवाहन, वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतुकीत मोठे बदल

Water lines in PCMC to be regularized

Pimpri Chinchwad: Illegal water connections for domestic use

[Video] पिंपरी चिंचवडच्या गॅरेजचालकाने बनवलं भारतीय जवानांसाठी हेलीकॉप्टर

एकच नंबर !! पिंपरी चिंचवडच्या गॅरेजचालकाने बनवलं भारतीय जवानांसाठी हेलीकॉप्टर! 

Metro work in Range Hills, Khadki with MoD’s nod

MahaMetro will start constructing pillars and the station in ..

रिक्षा संघटनेचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना साकडे

पिंपरी – इलेक्‍ट्रॉनिक रिक्षांना केंद्र सरकारने परवानगी दिली असून या रिक्षांना परवान्याची आवश्‍यकता राहणार नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, हे परवाने वाटप करताना रिक्षा चालकांना विश्‍वासात घ्या, अशी मागणी रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याबरोबर विविध मागण्यांचे निवेदन गडकरी यांना सादर केले. या शिष्टमंडळात दिल्ली रिक्षा टॅक्‍सी संघटनेचे नेते राजेंद्र सोनी, अचल सिंग, मधुकर थोरात, मारुती कोंडे, मोशवीर लोकरे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव यांचा समावेश होता.

…अन्यथा क प्रभागाला टाळे ठोकणार

पिंपरी – गेली महिनाभरापासून बालाजीनगर परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दो दिवसांत यात सुधारणा न झाल्यास क प्रभाग कार्यालयाला “टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा बहुजन सम्राट सेनेने दिला आहे.
बालाजीनगरची सुमारे दहा हजार लोकवस्ती आहे

नागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार

फुलेनगर येथे नागरी सुविधा केंद्र सुरू; पक्षनेते पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना घराजवळ पालिकेच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे पालिकेतील हेलपाटे कमी व्हावेत. त्यांना सर्व प्रकारचे दाखले सहजरित्या उपलब्ध व्हावेत. त्यांची पालिकेशी निगडीत कामे झटपट व्हावीत, यासाठी नागरी सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे, असे प्रतिपादन महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.

'त्या' बदल्या बेकायदा

शहर आणि ग्रामीण पोलिसदलाचे विभाजन करून नव्याने कार्यान्वित झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी कर्मचारी-अधिकारी आणि सरकारी वाहने देण्यावरून वाद सुरू असतानाच, आता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय विरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिस असा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. पिंपरी आयुक्तालय कार्यान्वित होण्याच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या बदल्या बेकायदा असल्याचा थेट पवित्रा पिंपरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. 'पुण्यात जाऊ नका. माझा तुमच्यावर वॉच आहे', अशा शब्दांत पोलिसांना जाहीर तंबी देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील ५ घाटांवर ४३ हजार मूर्तीदान

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध घाटांवर गणेश भक्तांना मूर्तीदान करण्यासाठी प्रेरित करून त्याद्वारे ४३ हजार १२३ मूर्त्यांचे दान जमा केले. हा उपक्रम संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्होलेंटीअरिंग टाटा मोटर्स पुणे आणि डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अँड रिसर्च पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाच विसर्जन घाटांवर राबविण्यात आला. तसेच या उपक्रमांतर्गत तब्बल ३५ टन निर्माल्य जमा करण्यात आले.

चिंचवडमध्ये हजारों गणेशभक्तांनी घेतला ‘नमो चहा’ सेवेचा लाभ

पिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात शहरात सर्वत्रच गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. चिंचवड येथे बाप्पांच्या या विसर्जन मिरवणूकीत आलेल्या गणेशभक्तांसाठी ‘नमो चहा’ सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेचा तब्बल १० हजार भाविकांनी लाभ घेतला असल्याची माहिती आयोजक भाजपाचे नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी दिली.

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस मित्रांना चिंचवड येथील प्रतिष्ठानने ‘घरचा डबा’ देण्याचा उपक्रम राबविला. 

चिंचवडमध्ये साडेदहा तास विसर्जन सोहळा रंगला

चिंचवड - फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट,थिरकणारी तरुणाई, "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा भक्तिमय वातावरणात रविवारी भक्तांनी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. गेल्या तीन वर्षापासूनची डिजे आणि गुलालविरहीत मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम होती. तब्बल साडेदहा तास विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला. विविध मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक तसेच शैक्षणिक विषयांवर देखावे केले होते. त्याची ही चित्रमय झलक. (छायाचित्रे - अरुण गायकवाड)

पिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...

नवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा हिरमोड निश्चित झाला असला तरी सामान्यांनी मात्र समाधान व्यक्त करीत सुटकेचा निश्वास टाकला. सांगवी पोलिसांच्या कडक, ठाम आणि नियोजनबध्द निर्णयामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणूकीतून डीजे या कर्कश: ध्वनीयंत्रेनेचे विसर्जनच झाले असे म्हणावे लागेल.  

जिल्ह्यातील साडेचार लाख कुटुंबांना ‘आयुष्मान’चे कवच

रामदास आठवले, गिरीश बापट यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप
पुणे – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 4 लाख 57 हजार 28 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करून घेतले जाणार आहे.

प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

चिंचवड – भारतीय रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर दरम्यान स्वच्छता मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चिंचवड रेल्वे स्थानक व परिसराची स्वच्छता व स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णा पाटील यांनी ही शपथ दिली. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या सुचनेनुसार मध्य रेल्वेच्या आवाहनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मध्य रेल्वे विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एस. के. दास, संजीव सोन्ना, चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख ए. एम. नायर, उपप्रमुख अमित कुमार आदी उपस्थित होते. प्रा. जस्मीन फरास, प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. तृप्ती बजाज, प्रा. अश्‍विनी तंटक, प्रा. समीता शिंदे, प्रा. प्रगती कलंबे, प्रा. नितू चव्हाण, ब्रिजेश देशमुख, प्रा. सुरेखा कुंभार, प्रा. मच्छिंद्र सोनावणे, प्रा. प्रज्ञा गुजराती, प्रा. सोनाली निकम, रेल्वे कर्मचारी मनोहर वडके, अनिल कदम आदींनी संयोजन केले.

Sunday, 23 September 2018

​​​पिंपरी-चिंचवडकरांनी वाचला समस्यांचा पाढा; शहरातील पहिल्या प्रवासी मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निगडी दापोडी BRT मार्ग व्यवहार्य आहे का? पिंपरी-चिंचवड शहराला PMPML कडून सावत्र वागणूक दिली जाते का? या पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळावीत यासाठी शनिवारी नॉव्हेल हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, संत तुकाराम संकुल निगडी येथे दिनांक 15 सप्टेंबर रोजी प्रवासी मेळावा आयोजित करण्यात होता.या वेळी, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने व नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अमित गोरखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Campaign on traffic in Pimpri Chinchwad coming

PUNE: The Pimpri Chinchwad police has decided to initiate a  ..

Deadline set for hawkers' biometrics

Pimpri Chinchwad: Hawkers and vendors in Pimpri Chinchwad Mu ..

PMC awaits MoD nod to widen vital road in Khadki

PUNE: With the defence ministry giving a go-ahead to the Met ..

PMRDA plans garbage processing plants at Hinjewadi, other areas

Pune metropolitan region development authority (PMRDA) is in talks with the Maharashtra industrial development corporation (MIDC) to establish four garbage processing plants in different areas under the PMRDA, including one at Hinjewadi, said Kiran Gitte, CEO, PMRDA.
PMRDA,garbage processing plants,Hinjewadi

H1N1 claims one more in PCMC, 2018 death toll reaches 21

Pimpri Chinchwad Muncipal Corporation (PCMC) on Friday has reported one more death due to influenza A H1N1, taking the toll to 21 this year.

हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी

पुणे -  पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची मोहोर उमटली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Centre approves Hinjawadi-Shivajinagar metro line

Pune: The ministry of housing and urban affairs has made its go-ahead for the third metro line from Hinjewadi-Shivajinagar official as per the Metro Act 1978 and published the proposal in the centre’s gazette.

अजितदादांनी घेतल्या पिंपरी चिंचवडमधील गणेश मंडळांच्या भेटी

पिंपरी (Pclive7.com):-  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांच्या भेटी घेतल्या. महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे काहीसे नाराज झालेले अजितदादांनी या शहरावर पुन्हा एकप्रकारे आपला हक्क दाखविण्यास सुरू केली असून त्यांचा आजच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीत चांगलाच उत्साह संचारला आहे.

दोन अभियंत्यांवर कारवाईचा बडगा

पिंपरी – कामकाजात दिरंगाई केल्याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

अण्णा जोगदंड यांना ‘मराठवाडा भुषण’ पुरस्कार प्रदान

पिंपरी (Pclive7.com):- मराठवाडा चँरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने ७० व्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे संचालक अण्णा जोगदंड यांना ‘वृक्षसंवर्धन मित्र, मराठवाडा भुषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

37 वाहन निरिक्षकांवर निलंबनाचे “विघ्न’

पिंपरी – तपासणी न करता नियमबाह्यपणे योग्यता प्रमाणपत्र देणारे 28 मोटार वाहन निरिक्षक व 9 सहायक मोटार वाहन निरिक्षक अशा 37 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्वाधिक 14 निरीक्षक तर 4 सहायक निरिक्षकांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील दोघांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Saturday, 22 September 2018

‘सारथी’च्या तक्रारींचे क्रॉस चेकिंग; महापौरांसह पक्षनेत्यांनी नागरिकांकडून घेतला ‘फिडबॅक’

पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांना मिळणाऱ्या मुलभुत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्याचे निराकरण चोवीस तासात करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘सारथी’ हेल्पलाइन सुरु केली होती. परंतू सारथी वरील आलेल्या तक्रारींचे निराकरण वेळेत होत नसल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांनी महापौरांसह महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन विभागात अचानक भेट दिली. या वेळी नगरसेवक नामदेव ढाके, महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नीळकंठ पोमन उपस्थित होते.

‘सारथी’च्या तक्रारींचे क्रॉस चेकिंग; महापौरांसह पक्षनेत्यांनी नागरिकांकडून घेतला 'फिडबॅक'

Sixty trees felled in Pimpri-Chinchwad

Pimpri: Environmentalists have alleged that a private contractor in connivance with Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) officials, has felled nearly 60 trees at the proposed site for the local police commissionerate in Chinchwad.

Agri produce may be sold at housing societies soon in Maharashtra

The Maharashtra government is coming out with a scheme that would allow/encourage housing societies to allot space in their societies for farmers to sell their produce, a move that will cut middlemen’s profits and ensure that farmers get better prices for their efforts. 

Untitled-1

वाहतूक नियमभंगाचे २५ हजार जणांवर गुन्हे

पिंपरी : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या तब्बल २५ हजार वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत, तर राँग साइडने जाणाऱ्या ६३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येत्या आठवड्यापासून वाहनचालकांच्या घरी जाऊन दंड वसूल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिलेल्या आदेशानंतर अवघ्या महिनाभरात ही कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड बेशिस्त वाहतुकीचे शहर

पिंपरी-चिंचवड शहराचे गावपण आजून गेलेले दिसत नाही. शहरातील नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या काळ्या फिल्ममिंग असणाऱ्या गाड्या चौकातही सुसाट असतात. त्यांना वाहतुकीचे नियम माहीतच नसतात यामुळे इतरही वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडून वाहने तशीच रेमटवतात. यातच अकार्यक्षम वाहतूक पोलिसांची भर पडत होती. मात्र स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले आणि आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांनी पदभार स्विकारला. शहरातील वाहतूक समस्या गंभीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली अन शहरातील बेशिस्त वाहन चालकांचे सर्व प्रकार बाहेर आले.

Traffic as usual, say techies after ban on heavy vehicles

The ban on heavy vehicles in Hinjewadi, which was rolled out ..

Eco-friendly visarjan: Maha may take up NCL soln

The state government may consider National Chemical Laborato ..

‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा

पुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात मेट्रो मार्ग आणि रेंजहिल्स स्थानकासाठी सुमारे ८५ खांब महामेट्रोला उभारायचे आहेत. त्यासाठीचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. 

अतिक्रमणांवर कारवाई

पिंपरी - पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. २१) चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपरीच्या रिव्हर रोड परिसरात कारवाई केली. यात चार टपऱ्या आणि चार हातगाड्या जप्त केल्या.

फेरीवाल्यांना बायोमेट्रिक नोंदणी गरजेची

पिंपरी - शहरातील फेरीवाल्यांचे पालिकेने २०१२-१३ मध्ये सर्वेक्षण केले. त्यात पात्र ठरलेल्या काहींची बायोमेट्रिक नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. उर्वरितांची नोंदणी करण्याचे काम पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू असून २९ सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रिक करून घ्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
 

PCNTDA extends property regularization deadline to Feb

The PCNTDA has extended the deadline to regularize illegal constructions till February 18 next year.

बांधकाम नियमितीकरणाला मुदतवाढ

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. संबंधित वाढीव मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

मूर्ती दान वाढता वाढे!

– तीन वर्षात दुप्पटीने वाढ
– नदी प्रदूषण रोखण्यास मोठा हातभार
– टाटा मोटर्स, संस्कार प्रतिष्ठानचा पुढाकार

महापलिकेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धा २०१७ चे बक्षिस वितरण; शहरातील 65 गणेश मंडळांना पाच लाखांची बक्षिसे

लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनासाठी होती. गणेशोत्सव मंडळाकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पुणे-नाशिक महामार्गाजवळील सेवा रस्त्यांच्या नाल्यांची होत नाही नियमित स्वच्छता

चाकणमधील सेवा रस्ते पाण्यात
आयआरबीच्या नालेसफाईचे पितळ उघडे
चाकण : चाकण परिसरात पुणे-नाशिक महामार्गाजवळील  सेवा रस्त्यांच्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत  नसल्याने त्यांचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे  पाणी वाहून जाण्यास कशी अडचण निर्माण होते  याचा अनुभव रविवारी (दि.16) दुपारी झालेल्या  मुसळधार पावसाने आला. सेवा रस्त्यांच्या  जवळच्या गटारींची योग्य स्वच्छता न झाल्याने  घाण, कचरा नाल्यात साचत गेला असून हे नाले  बंद झाले आहेत. मागील महिन्यात आयआरबी कं पनीकडून या गटारी मोकळ्या करण्याचा  थातुरमातुर प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या  स्वच्छतेचे पितळ रविवारी झालेल्या मुसाधार  पावसाने उघडे पाडले आहे. तळेगाव चौक आणि  आणि आंबेठाण चौक येथे सेवा रस्त्यांची अवस्था  अत्यंत दयनीय झाली असून पाणी वाहून जाण्यास  वाट नसल्याने या भागात पावसाच्या पाण्याचा  निचराच होत नसल्याची स्थिती पुन्हा एकदा  समोर आली आहे. मागील महिन्यात या  महामार्गावर टोल वसुली करणार्‍या आयआरबी कं पनीने सेवा रस्त्यांच्या लगतच्या गटारी मोकळ्या  करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये अनेक  ठिकाणी संबंधित गटारे बंद झाल्याची विपर्यस्त  स्थिती समोर आली आहे.

पिंपरी मतदार संघातील चार हजार ६४५ मतदारांची नावे वगळणार

स्थलांतरित, दुबार, मयत असणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या ३९९ यादी भागामधील   सुमारे चार हजार ६४५ मतदार वगळण्यास पात्र असल्याने त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे.

Friday, 21 September 2018

Pune Metro: After 10 months, Defence Ministry gives green signal for transfer of land in Khadki stretch

After sitting on a proposal by Maha-Metro for 10 months, the Defence Ministry on Thursday finally gave the green signal for the transfer of 10 acres of land for the Pune Metro project in Khadki area. “We are happy to announce that the Defence Ministry has cleared the Pune Metro right of way permission, as also the land transfer proposal for Metro stations,” said Brijesh Dixit, managing director of Maha-Metro.
Pune Metro: After 10 months, Defence Ministry gives green signal for transfer of land in Khadki stretch

मेट्रो मार्गातील जागेला संरक्षण खात्याची परवानगी

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच-1) या मेट्रो मार्गातील खडकीतील  रेंजहिल्स  येथे होणार्‍या मेट्रो स्टेशनचे काम संरक्षण विभागाच्या परवानगीसाठी रखडले होते; मात्र गुरुवारी संरक्षण विभागाकडून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला (महामेट्रो) या ठिकाणी मेट्रोचे काम करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

Hinjawadi to feel impact of heavy vehicle ban tomorrow

The police claimed to have reduced the traffic congestion on ..

घरच्या बाप्पासमोर ‘भक्ती-शक्ती उड्डाणपूला’ची प्रतिकृती साकारणाऱ्या अभिषेक दाणी याचा महापालिकेकडून सन्मान

पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूलाचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सुरू आहे. या पूलाची अगदी हुबेहूब प्रतिकृती आकुर्डीतील अभिषेक दाणी या तरूणाने घरीच्या गणपती बाप्पा समोर साकारली आहे. ही सजावट संपूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून केली आहे. विशेष म्हणजे बाप्पाची मुर्ती देखील शाडू मातीने बनवलेली आहे. अभिषेक याने केलेल्या या सजावटीचे महापालिकेच्यावतीने कौतुक करण्यात आले. बीआरटीचे प्रवक्ते उपअभियंता विजय भोजने यांनी अभिषेक याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान केला.

‘पिंपरी चिंचवड-वन’ मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार संपुर्ण शहरांची माहिती;अॅपचे महापौरांच्या हस्ते अनावर

पाणीपुरवठा, खोदकामामुळे रस्ता बंद, वाहतूक मार्गात बदल अशी प्रत्येक माहिती शहरवासियांना आता ‘पिंपरी चिंचवड-वन’ या अॅपद्वारे मिळणार आहे. महापालिकेने ‘पिंपरी चिंचवड-वन’ या नावाने मोबाईल अॅप कार्यन्वित केले आहे. या मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन इत्यादी स्वरुपाची सर्व माहिती एकाच अॅप द्वारे नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या अॅपचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका भीमाबाई फुगे, निर्मला गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.

शहरातील मोकाट कुत्री, डुक्करे व जनावरांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचा आयुक्त हर्डीकरांचा दावा

पिंपरी-चिंचवड शहरात या वर्षी आतापर्यंत तब्बल 11 हजार कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.  त्यासाठी 3 एजन्सी काम करीत आहेत. तर, डुक्करे पकडण्यासाठी नवीन एजन्सीचे प्रत्यक्ष काम 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, असे सांगून शहरातील मोकाट कुत्री, डुक्करे व जनावरांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचा दावा पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे ज्ञानप्रबोधिनीला बायोगॅस प्लांट भेट

नैसर्गिक वायूच्या वापरासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या संकल्पनेतुन इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेला बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात  बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, रेखा मित्रगोत्री, रंजना कदम, नेहा देशमुख, आरती मुळे, रेणू मित्रा, मुक्ती पानसे, वैशाली देवतळे, अर्जुन दलाल आदी उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनी निगडी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने सहभाग घेतला.

प्लास्टिक बंदीसाठी मनपा प्रशासन सरसावले; क क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई, 15 हजार रूपयांचा दंड केला वसूल

प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायीक उपयोगासाठी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहिम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून आज क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत सात किलो प्लास्टीक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल केला.

पिंपरीत मोफत महाआरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यातील कोणताही गरीब रुग्ण कितीही मोठा आजार झाला असला तरी उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोफत महाआरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आजार झालेल्या रुग्णापर्यंत पोचण्याचा या महाआरोग्य शिबीरांचे उद्देश असल्याचे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कुबडे यांनी गुरूवारी (दि. २०) सांगितले.
जिजाई प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पिंपरीतील बी. टी. अडवाणी हॉलमध्ये आयोजित मोफत महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. 

चिंचवडच्या भक्ती रेसिडेन्सी सोसायटीचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव

चिंचवड केशवनगर येथील भक्ती रेसिडेन्सी सोसायटीतील पर्यावरण पूरक ‘पुष्प महाल’ असा देखावा साकारला आहे. भक्ती रेसिडेन्सी सोसायटी गणेशउत्सवाचे अकरावे वर्ष आहे. सोसायटीचा गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेली दिसून येते. या सात दिवसाच्या गणपती उत्सवातील सोसायटीचे वातावरण उत्साहाचे होते. विशेष म्हणजे या भक्ती रेसिडेन्सी सोसायटीचा ‘पुष्प महाल’ देखावा हा कमी कालावधी आणि कमी खर्चात साकारला आहे. कापडी फुले, रद्दी, वर्तमानपत्रे, टाकाऊ लाकडे इत्यादी साहित्यांपासून सोसायटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून देखावा साकारला आहे.

PCMC invites revised tenders for garbage segregation

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation .. 

गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा

पिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे मोशीतील बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी आणि पिंपरी गावात राबविण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाला पंतप्रधान आवास योजनेच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या तीनही प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोशल मीडियावरून पुन्हा ‘गॅंगवार’

पिंपरी - शहरातील सोन्या काळभोर टोळी आणि रावण टोळी यांच्यात पुन्हा सोशल मीडियावर गॅंगवार सुरू झाले आहे. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांना ‘बघून’ घेण्याची भाषा केली जात असताना पोलिस याबाबत मात्र अनभिज्ञ आहेत.

भाजप वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप ननावरे

नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच याबाबतचे पत्र डॉ. ननावरे यांना दिले आहे. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोशिएशनच्या माध्यमातून डॉ ननावरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यात वैद्यकीय तपासणी व उपचार, पोलिस दलाची आरोग्य तपासणी, अनाथालयातील मुलांना औषधोपचार, सैनिकांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्याकरीता विविध उपक्रम राबविणे व वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम राबविले आहेत.   

विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

पिंपरी – शहरातील दहा दिवसांच्या गणरायांचे रविवारी (दि.23) विसर्जन होणार असून, यासाठी वाहतूक पोलिसांनी दुपारी दोनपासून वाहतुकीत बदल केले आहेत. या बदलानुसार, पिंपरी परिसरातील तीन रस्ते वापरासाठी बंद असणार आहेत. या बंद रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग वाहतूक पोलिसांनी निर्धारित केले आहेत.

सात किलो प्लॅस्टिक जप्त

पिंपरी – बंदी असतानाही व्यावसायीक उपयोगासाठी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी (दि. 20) केलेल्या कारवाईत सात किलो प्लॅस्टीक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल केला.

पिंपरीत पोलिसांचा रुट मार्च

पिंपरी – शहरातील सार्वजनिक व घरगुती गणपतीचे रविवारी (दि.23) विसर्जन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) शगुन चौकातून रुट मार्च करत विसर्जन सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश दिला.

पीएफवर आता आठ टक्के व्याज

चौफेर न्यूज – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने गुडन्यूज दिली आहे. सरकारने ऑक्टोंबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ केली आहे. अल्प बचत योजनांवरील व्याजदरात दर तिमाहीत बदल होत असतात.

Thursday, 20 September 2018

MoD approves bridge over Mula river

PUNE: A three-year struggle by Bopkhel’s residents for an ea ..

शहराची आवश्‍यक माहिती एका "क्‍लिक'वर

पिंपरी - महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यांचे संदेश, परिपत्रक, निवेदन आदी स्वरुपाची सर्व माहिती नागरिकांना आता एका क्‍लिकवर मिळणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या "पिंपरी-चिंचवड वन' या "मोबाईल ऍप'चे अनावरण महापौर राहुल जाधव आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते बुधवारी झाले. ""असे ऍप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे,'' असे आयुक्तांनी सांगितले.