Monday, 31 December 2018

Pimpri : बांधकाम कामगारांना आरोग्य योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केल्यामुळे राज्यासह इतर राज्यातील कामगारांनाही दीड लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत याची सुरुवात नुकतीच वाकड येथील अक्रोपॉलिस या साईटवर आरोग्य शिबिराचे आयोजन करून करण्यात आले.

पिंपरी पालिकेत मावळत्या वर्षांत

पिंपरी पालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपकडे कारभार आला. मात्र, मावळत्या वर्षांत भाजपची कामगिरी समाधानकारक नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पक्षांतर्गत नाराजीचा प्रत्यय अनेक घटनांनी आला.

Pimpri : किल्ले निमगिरी येथे दुर्गसंवर्धन व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

एमपीसी न्यूज –  दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवेच्या स्मृतींना अभिवादन करत भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली. संस्थेच्या शिलेदारांनी रमेश स्मृती सामाजिक पुनुरूत्थान उपक्रमांतर्गत जुन्नर तालुक्‍यातील किल्ले निमगिरी येथे श्रमदान, जनजागृती, वृक्षारोपण, ग्रंथिंदडी, अभ्यासपूर्ण दुर्गभ्रमंती असे उपक्रम राबविले. पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात आले. 

“पवनाथडी’तील “स्टॉल्स’साठी सोडत

पिंपरी – महापालिकेच्या वतीने 4 ते 8 जानेवारी या कालावधीत सांगवीमध्ये पवनाथडी जत्रा भरविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या 813 महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यासाठी आज (शनिवारी) सोडत काढण्यात आली.

PCMC strips down scrap centres violating norms

Residents had complained to the local body and state polluti


Pimpri : गुरुवारी विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

एमपीसी  न्यूज – समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) आयोजित दहावे एक दिवसीय विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन  गुरुवारी  (दि. 03 जानेवारी 2019) आकुर्डी येथील  श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट सांस्कृतिक भवनात होणार आहे. 

मोशीत महिलेचा विनयभंग

पिंपरी – महिलेसमोर अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना लक्ष्मीनगर मोशी येथे घडली.
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दादासाहेब गुलाबराव बाबळ (वय-39, रा. मोशी, मूळ रा. हिंगणी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारचा नवा कायदा , भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना पकडल्यावर किंवा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावर जामीन मिळाल्याने पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने चाप बसविला आहे. आता अशा अधिकाऱ्यांना मूळ पदाऐवजी दुसऱ्या विभागात रुजू होऊन कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. या निर्णयामुळे निलंबनाच्या काळातही कामावर हजर झालेले अधिकारी 'पूर्ण पगारी अन् बिन अधिकारी' ठरणार असून, त्यांनी यापूर्वी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यालयाची विभागीय चौकशी होणार आहे.

केंद्राच्या मान्यतेनंतर निगडीपर्यंतचे काम सुरू

पिंपरी ते निगडीपर्यंच्या 4.4 किलोमीटर अंतराचा ‘डीपीआर’ अल्पवेळेत महामेट्रोने पूर्ण केला आहे. राज्य शासनानंतर केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ महामेट्रोच्या वतीने त्या वाढीव मेट्रो मार्गिकेचे काम सुरू केले जाईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी रविवारी (दि. 30) सांगितले. 

पिंपरी, आकुर्डीतील घरांच्या मंजुरीचा विषय ‘स्थायी’पुढे

पिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वांत कमी दराच्या ठेकेदारास काम देण्याबाबत करारनामा करण्यास मान्यता देण्याचा विषय मंगळवारी (ता. १) होणाऱ्या महापालिका स्थायी समोर ठेवला आहे. 

पिंपळे सौदागरला साकारणार ग्रामसंस्कृती

पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे. 

प्राधिकरणातील उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

पिंपरी - प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक २६ येथे विकसित केलेली उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. 
आकुर्डीतील सुमारे पावणेदोन एकरावरील उद्यानात विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली आहेत. रोप क्राऊलर, बॅलसिंग ब्रिज, रोप वॉक, जंपर्स अशा प्रकारच्या खेळण्यांचा त्यात समावेश आहे. ‘ॲडव्हेंचर पार्क’च्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार जंपर्समध्ये मुलांना उंच उड्या मारता येतील. रोप वॉकमध्ये लोखंडी अँगलला दोरखंड अडकवून जमिनीपासून अँगलपर्यंत चढता येईल. तसेच हर्डल वॉकचीही (टप्प्याटप्प्याने उंच होत जाणारे आडवे लोखंडी अँगल) सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्‍लाइंबिंग वॉल, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅकही आहे. उद्यानात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला, पुरुष यांच्यासाठी आधुनिक प्रकारची प्रत्येकी दोन शौचालये बांधण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ‘गजिबो’ची सोय आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

Pimpri: कंपनी करणार संतपीठाचा मसुदा तयार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखलीतील बहुचर्चित संत तुकाराम महाराज संतपीठाबाबत स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कंपनीकडून संतपीठाचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामुळे या समितीमधील सदस्यांची संख्या, महापालिका पदाधिकारी, अथवा बिगर राजकीय सदस्यांना स्थान मिळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीमध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला

Pimpri: महापालिकेत समाजसेवकांची पदे रिक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात समाजसेवक कार्यरत असलेल्या महिला कर्मचा-याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करता न आल्याने त्यांना महापालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची सर्वच पदे आता रिक्‍त झाली असून या विभागाचा कारभार कसा चालणार ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पिंपरी: कुदळवाडीतील आग सहा तासानंतर आटोक्यात

पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार पिंपरी अग्निशामक मुख्यालय आणि चिखली उपकेंद्र येथून प्रत्येकी एक असे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले. मात्र आगीचे स्वरूप पाहता भोसरी, पिंपरी, प्राधिकरण आणि तळवडे येथील उपकेंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे चाकण एमआयडीसी, पुणे महापालिका तसेच खासगी कंपन्यांचे अग्निशामक बंबही मदतीसाठी बोलविण्यात आले. याशिवाय पाण्याची वाहतूक करण्यासाठी खासगी टँकरचीही मदत घेण्यात आली. तब्बल सहा तासानंतर ही आग आटोक्यात आली.

विद्युत खांबांवरील फलक काढण्यासाठी 95 लाख

पिंपरी – महापालिकेच्या विद्युत खांबांवर लावलेले दोन बाय तीन फूट या आकाराचे अवैध जाहिरात फलक काढण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना एक फलक काढण्यासाठी 24 रुपये मिळणार आहेत. या कामासाठी एकूण खर्च 95 लाख रुपये होणार आहे.

आकुर्डी, पिंपरीतील घरांचा मार्ग मोकळा

पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी येथे आर्थिकदृष्ट्य्‌ा दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या घरांसाठी निविदा प्रक्रियेतील स्पेसिफिकेशनमध्ये फेरबदल करून निविदा मागविल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांसाठी 84 कोटी 32 लाख रुपये लघुत्तम दर सादर केलेल्या एकाच ठेकेदाराला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अपघातात पोलिस कमर्चारी जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  – आळंदी जवळील देहू फाटा येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाला वेगाने येणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने ते जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली.

Bhosari : भोसरीत आदर्श शिक्षण संस्थेत विज्ञान प्रदर्शऩ

एमपीसी न्यूज – भोसरी येथील आदर्श शिक्षण संस्थेत कला, कार्यानुभव, विज्ञान प्रदर्शन आणि विद्यार्थी हस्तलिखित प्रकाशन सोहळा उत्साहात झाला.

पिंपरी-चिंचवड : सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून कोयत्याने ४० ते ४५ वार करून खून

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे पूर्ववैनस्यातून १९ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा तब्बल ४० ते ४५ वार करून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. अॅल्विन रवी राजगोपाळ (रा.जयभीम नगर, दापोडी) असं मयत गुन्हेगाराचे नाव आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक घरात घुसून अॅल्विनवर हल्ला करण्यात आला. यात तो जखमी झाला आणि कसाबसा त्याने घरातून चिंचोळ्या गल्लीतून पळ काढला. मात्र, हल्लेखोरांनी त्याला गल्लीत गाठत त्याच्यावर कोयत्याने ४० ते ४५ वार करून ठार केले. याप्रकरणी चार आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एकाचा शोध सुरू आहे. 

Saturday, 29 December 2018

शहरात ६५ टक्के रस्ते पदपथाविना

पिंपरी - शहरातील ६५ टक्के रस्ते पदपथविरहित असून वेगवेगळे अडथळे, असमान रचना, कचरा, राडारोडा, दुरवस्था, विक्रेत्यांची अतिक्रमणे, अशा गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना धोकादायकरीत्या मार्गक्रमण करावे लागत असल्याचे वास्तव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. 

‘नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल पहाटे पाचपर्यंत’ - आर. के. पद्मनाभन

पिंपरी - ‘‘नववर्षाच्या स्वागतासाठी सरकारने पहाटे पाचपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे. यामुळे सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,’’ असे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.

पिंपरीत इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

पिंपरी : राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 27) सकाळी पिंपरीगाव येथे घडली. प्रथमेश विजय अबनावे (वय 17, रा. पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याने तो राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास उडी मारली. 

पीसीईटीच्या विज्ञान स्पर्धेत शिवाजी विद्यालय प्रथम

चिंचवड : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान, वाद-विवाद आणि प्रश्‍नोत्तर स्पर्धेत देहूरोड येथील शिवाजी विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. तर एस.बी.पाटील कनिष्ठ विद्यालयास द्वितीय आणि एच.ए.स्कूलला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेस शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) चे विज्ञान अधिकारी वैभव घोलप यांच्या हस्ते विजेत्या संघांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. 

31 डिसेंबरला रुफ टॉप पार्ट्यांना परवानगी नाही

पिंपरी : राज्य शासनाच्या आदेशानुसार हॉटेल्सच्या रुफ टॉपवर केल्या जाणर्‍या पार्ट्यांना प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मोकळ्या आणि बंदिस्त जागेत 31 डिसेंबरच्या पार्टीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने पहाटे दीड वाजेपर्यंत तर हॉटेल्स पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तरुणाईने मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी प्रशासन देखील विविध पातळ्यांवर सज्ज झाले आहे. हॉटेल, मद्य विक्रीची दुकाने यापासून ते मद्यपींवर होणार्‍या कारवायांबाबत देखील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या 15 पोलीस ठाण्यांमध्ये 15 ब्रीद अ‍ॅनालायझर आहेत. त्यापैकी आठ नादुरुस्त आहेत. तसेच ऑनलाइन चलन करण्यासाठी 63 यंत्रे आहेत. आणखी 145 यंत्रांची मागणी पोलिसांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे वाहनचालक तळीरामांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ११ महिन्यात पाडली तब्बल १ हजार ५५ अनधिकृत बांधकामे

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने २०१८ मधील ११ महिन्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २५१ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून १०५५ अनधिकृत बांधकामे पडली आहेत. तर ५३४८ बांधकामधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Pimpri: भाजपच्या नाकर्तेपणामुळेच शहरातील संरक्षणखाते विषयक प्रश्न प्रलंबित

एमपीसी न्यूज – संरक्षण मंत्रालयाशी संबंधित महाराष्ट्रातील प्रलंबित विकास कामांविषयी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत पुण्यातील संरक्षण विषयक प्रश्न मार्गी लागले. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षणखाते विषयक सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी शहरातील भाजपच्या बेजबाबदार पदाधिका-यांनी पाठपुरावा केला नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच शहरातील संरक्षण विषयक प्रश्न प्रलंबित राहिले असल्याचा आरोप राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केला

Pimpri : वाढीव दराच्या नावाखाली कोट्यवधीची लूट; ‘सीआयडी’ चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शहरातील रस्ते विकास कामात मूळ अंदाजीत खर्चात वाढीव दराच्या नावाखाली पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) मार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

महामार्गावर एकाचा खून

पिंपरी : पुणे-मुंबईवरील बावधन परीसरात एका अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे. ही घटना बावधन उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष आहे. अंगावर निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, चॉकलेटी रेघा असलेला पांढरा शर्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर बावधन येथे सर्व्हिस रस्त्यावर एक अनोळखी इसम मृतावस्थेत पडलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. 

सांगवीच्या पाच पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

पिंपरी चिंचवड : पोलीस आयुक्तालयात पुन्हा फेरबदल करण्यात आला आहे. दोन पोलीस उप आयुक्तांसाह तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण दहा अधिकार्‍यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. या दहा अधिकार्‍यांमध्ये पाच अधिकारी सांगवी पोलीस ठाण्यातील आहेत. अचानक एकाच पोलीस ठाण्यातील पाच अधिकार्‍यांची बदली झाल्याने पोलीस वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. 

सात अल्पवयीन मुलांकडून मौजमजेसाठी चोरलेल्या 56 सायकल जप्त

पिंपरी चिंचवड : मौजमजेसाठी सायकल चोरी करणार्‍या सात अल्पवयीन मुलांकडून 4 लाख 17 हजार 500 रुपये किमतीच्या 56 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली. जप्त करण्यात आलेला यामुळे निगडीतील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी माहिती दिली.

गुणवंत कामगार परिषदेचे जानेवारीत अधिवेशन

पिंपरी – कामगारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेचे जानेवारी 2019 मध्ये दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे. स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, अध्यक्षपदी भारती चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली.

महापालिकेचा सांडपाणी पुनर्वापर आराखडा तयार

पिंपरी – पिंपरी – चिंचवड सह हिंजवडी, चाकण आणि तळेगाव – दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार, कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज 312 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.

December 2019 deadline: MahaMetro struggles to find sponsors for stations in Pune

Racing against time to meet the December 2019 deadline to launch the Pune Metro, officials are struggling to find sponsors for Metro stations, with the corporate sector in the city giving it a cold response.

सांगवीतील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर ‘अटल महाआरोग्य शिबिर २०१९’ चे आयोजन

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य संयोजक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने मोफत ‘अटल महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
शिबीर सांगवी येथील पी. ड्ब्लु. डी मैदानावर ११, १२ व १३ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. ‘’अटल महाआरोग्य शिबीरा’’ मध्ये विशेषतः गंभीर आजारावर लक्ष्य केंद्रित केले असून, त्यात हृदयरोग, शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण, किडनी विकार व प्रत्यारोपण, लिवर प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया आदी आजारांवर गोर-गरीब रुग्णांसाठी शस्त्रक्रिया पूर्णत: मोफत करण्यात येणार आहेत.

पुणे ते लोणावळा मार्गावर सीसीटीव्ही

केंद्र सरकारच्या निर्भया फंड अंतर्गत पुणे - लोणावळ्याच्या दरम्यान असणाऱ्या सर्व पंधरा स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल,' अशी माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलींद देऊस्कर यांनी दिली. 

वल्लभनगर आगाराचे पालटतेय रूप

पिंपरी - नवीन नळ, आकर्षक टाइल्स, बेसिन, दरवाजे, इलेक्‍ट्रिक फिटिंग्ज, सीसीटीव्ही कॅमेरे, रंगकाम यांसारख्या कामांमुळे एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगारातील वाहकांना विश्रांती घेण्यासाठीच्या जागेचे रूप पालटले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

केबल व्यावसायिकांमध्ये संभ्रम

पिंपरी - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी नव्याने जाहीर केलेले नियम शनिवारपासून (ता. २९) लागू होणार आहेत. मात्र, या नियमांचे नेमके स्वरूप स्पष्ट नसल्यामुळे ग्राहकांसह केबल व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

हिंजवडीत भूसंपादन रखडले

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित नव्या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अडकले आहे. 
मर्सिडीज बेंझ शोरूम ते माणदरम्यान नवा सहा किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, केवळ दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एमआयडीसीला १४.४ हेक्‍टर जमिनीची आवश्‍यकता असून, त्याचे संपादन ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येणार आहे. मात्र, ही जमीन अद्याप ‘एमआयडीसी’ला मिळाली नसल्याने रस्त्याचे काम अडकून पडले आहे. या ठिकाणी सहा लेनचा रस्ता प्रस्तावित आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजी व भूमकर चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल.

श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद

पिंपरी – महापालिकेने मागील चार वर्षात श्‍वान नसबंदीवर कोट्यावधी रुपये खर्च केले असताना शहरात श्‍वानांची संख्या वाढत आहे. श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्तेमारुती भापकर यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिका कंत्राटी कामगारांच्या हाती

पिंपरी – महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी व मानधन तत्वावर कर्मचारी नेमणूक मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. यामध्ये 4 हजार 347 कर्मचारी हे कंत्राटी तत्त्वावर; तर 815 कर्मचारी मानधन तत्त्वावर महापालिकेत कार्यरत आहेत. ही संख्या एकून कर्मचाऱ्यांच्या 39 टक्के एवढी आहे. त्यामुळे महापालिकेतील सुरक्षित वाटणारी कायमस्वरुपी नोकरी सुशिक्षित बेरोजगारांसाठी आता दिवास्वप्न ठरले आहे. मात्र, या कंत्राटी कामगारांना किमान वेतनही मिळणे अवघड झाले आहे.

Friday, 28 December 2018

पीएमपी’कडून 407 कोटींची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता अंदाजपत्रकात एकूण 407 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी पीएमपीएमएल प्रशासनाने केली आहे. महापालिका आयुक्त तथा पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे लेखी पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांना मोफत बसपास, विविध घटकांना दिले जाणारे सवलतीचे बसपास, बस खरेदी आणि संचलन तुटीचा खर्च या पत्रात नमूद केला आहे. संचलन सुरळीत सुरू राहण्यासाठी दरमहा 4 कोटी 18 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी या पत्रात केली आहे.

“थर्टी फर्स्ट’ला पहाटेपर्यंत “झिंग झिंग झिंगाट’

पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी केवळ तरुणाईच नाही तर या काळात कोणतीही अनुचित कारवाई होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क कर्मचारीही तयारी लागले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार शहरातील मद्य विक्रीची दुकाने पहाटे दीड वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर हॉटेल्स हे पार्टीसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

“रॉंग साईड ड्रायव्हींग’ करणारे चालक पकडा बक्षीस मिळवा!

पिंपरी – “रॉंग साईड’ने वाहन चालवणाऱ्या चालकाला पकडा व बक्षीस व पुरस्कार मिळवा अशी भन्नाट “ऑफर’ पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काढली आहे.

मालासोबत शुद्धता प्रमाणपत्राचे बंधन

पुणे – पुणे शहरासह राज्यात सर्वत्र रिटेल वस्तूचे आऊटलेट असणाऱ्या डि-मार्ट कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या आऊटलेटमधून विकण्यात येणारा प्रत्येक माल हा शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय विकू नये, अशी ताकीद या कंपनीला देण्यात आली आहे.

देशभरातील कुष्ठ रोगींना सरकारी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सरकारचे वेधले लक्ष

चौफेर न्यूज :    संपुर्ण भारतात १० लाखाच्या जवळपास कुष्ठ रोगी आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातुन २००५ पर्यंत संपुर्ण देश कुष्ठ रोगी मुक्त होईल, अशी घोषणा केली होती. संपुर्ण जगाच्या तुलनेत साठ टक्के कुष्ठ रोगी एकट्या भारतात आहेत ही देशाच्या दृष्टीने अत्यंत चितेची बाब आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनेचा लाभ कुष्ठ रोगींना मिळत नाही. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत शुन्य काळाच्या प्रश्ना दरम्यान प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

रावेत बंधार्‍याची उंची अर्धा मीटरने वाढविणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना नदीवरील रावेत बंधार्‍याची उंची अर्ध्या मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला दोन दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे. या कामासाठी बंधारा व मागील बाजूस 8 किलोमीटर अंतरापर्यंत नदी पात्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यासंदर्भात अहवाल पाटबंधारे विभागाकडे लवकरच दिला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली पालिका बांधकाम करणार आहे. 

बांधकाम कामगारांना आरोग्य योजनेचा लाभ

पिंपरी – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केल्यामुळे राज्यासह इतर राज्यातील कामगारांनाही दीड लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत याची सुरुवात आज (बुधवार) वाकड येथील अक्रोपॉलिस या साईटवर आरोग्य शिबिराचे आयोजन करून करण्यात आले.

पुणेकरांनाही ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’

पुणे – शहरातील सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधेसाठी महामेट्रोकडून प्रवाशांना कॉमन मोबेलिटी कार्ड दिले जाणार आहे. या कार्डमुळे मेट्रोसह, मेट्रो स्थानक परिसरातील “फिडर’ वाहतूक सेवांसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे कोणतीही रोख रक्कम न वापरता नागरिकांना या कार्डच्या माध्यमातून सलग प्रवास करता येणे शक्‍य होणार आहे.

बीआरटी’वर बस पुरविण्यास पीएमपी असमर्थ

पिंपरी- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पाच बीआरटीएस मार्गांवर सुरु असलेली बससेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडे पुरेशा बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दोन बीआरटीएस मार्गांवर ही बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याची धक्कादायक कबुली पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे. अन्य मार्गांवरदेखील ही सेवा पूर्ण क्षमेतेने चालविण्यासाठी एकूण 565 अधिक बसची आवशक्‍यता असल्याची बाब पिंपरी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता व आळंदी बोपखेल या दोन प्रस्तावित मार्गांवर ही बस सेवा सुरु केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन अधिकाऱ्यांकडे स्वच्छता विषयक कामांचे पर्यवेक्षण

पिंपरी- शहर एकदम चकाचक असावे, यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तीन सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आहे. प्रविण आष्टीकर, चंद्रकांत इंदलकर आणि मंगेश चितळे या तीन सहाय्यक आयुक्तांनी शहरातील साफसफाईच्या कामाचे पर्यवेक्षणाचे काम करावयाचे असून, तसा अहवाल आयुक्तांना सादर करावयाचा आहे.

पिंपरी चिंचवड सीए विद्यार्थी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चौफेर न्यूज –  निगडी येथील दि इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सीए विद्यार्थी परिषदेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

Urban street design plan near Akurdi train station

Pimpri Chinchwad: The civic body will develop an urban street design project, under the smart city plan, around Akurdi railway station at an estimated.

PCMC society installs aerator taps to save water

As water scarcity looms over Pimpri-Chinchwad, a housing society in the city has decided to install aerator taps in their flats to reduce water consumption.
The committee of Bhondve Empire society, located in Ravet area of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), has installed 200 aerator taps at 114 flats, estimating to save 10,000 litres of water every day.

महापालिका इमारत रंगीत एलईडींनी लखलखणार

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे सुशोभिकरण केले जाणार आहे. याअंतर्गत रंगीत एलईडी दिव्यांचा वापर करून रंगीबेरंगी प्रकाशयोजना केली जाणार आहे. त्याकरिता 33 लाख 40 हजार 135 रुपये खर्च येणार आहे. या खर्चाचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

अहो आश्चर्यम … शहरात प्रथमच हिवाळी आंब्याचे दर्शन

निसर्ग नियमानुसार आंब्याचा मोहर वसंत ऋतूत येतो व होळीच्या सणानंतरच आंब्याच्या कैऱ्या पहावयास मिळतात. बदलत्या हवामानामुळे पिंपरी चिंचवडच्या नैसर्गिक वृक्ष वाढीच्या चक्रामध्ये बदल पहावयास मिळत आहे. या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचा एक अभ्यास गट त्यामध्ये विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विजय जगताप, सतीश देशमुख, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे, अमोल कानु, अजय घाडी, नितीन मांडवे तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील हे “आपल्या शहरातील हिवाळी वृक्ष संपदा” ह्या विषयासंदर्भात निरीक्षण करीत आहेत. हे परीक्षण करीत असताना सदरचे आंब्याचे झाड निदर्शनास आले.

‘स्मार्ट’ शहरामध्ये पिंपरी-चिंचवड 41 क्रमाकांवर – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी योजनेतील शहरांमध्ये देशात पिंपरी-चिंचवड 41 व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाल्यानंतरही शहराचा 41 वा क्रमांक आहे. ही चांगली बाब असून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्यानंतर क्रमांकामध्ये आणखी सुधारणा होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. 

अबब…शहरात 72 हजार मोकाट श्वान !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. शहरात तब्बल 72 हजार मोकाट श्वान आहेत. यावर्षी 14 हजार 907 श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

महापालिका 6 महिन्यात ‘ई-गव्हर्नंन्स’च्या दुस-या टप्प्याला सुरुवात करणार

एमपीसी न्यूज – सामाजिक मूल्य जोपासत प्रशासकीय कामकाज करीत असताना, नागरिकांना उत्तम आणि तत्पर सेवा देणे म्हणजेच सुशासन आहे. ई गव्हर्नंन्सच्या माध्यमातून सुशासनापर्यंत अधिक पोहोचता येणे शक्‍य असून पिंपरी चिंचवड महापालिका पुढील 6 महिन्यांच्या काळात ई-गव्हर्नंन्सच्या दुस-या टप्प्याला सुरुवात करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

Pimpri : कचरा गोळा करण्यासाठी महापालिका आकारणार दरमहा शुल्क; ‘असे’ आकारले जाणार शुल्क

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. 

महापालिकेची धूर फवारणी पद्धत बंद करावी

पिंपरी : शहरामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की, जेथे डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात रोज होत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी महापालिका स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार परिसरात धूर फवारणी करीत असते. मात्र एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने केलेल्या पाहणीनुसार अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही धूर फवारणी होय. धूर फवारणी करताना नजरेस आलेल्या गोष्टी इसिए टीम सदस्यांनी महापालिका वैद्यकीय संचालक डॉ.पवन साळवी यांच्याशी चर्चा केली. धूर फवारणी ऐवजी कीटक नाशकांची औषध फवारणी करावी, असा उपाय यावेळी महापालिका अधिकार्‍यांना सूचविण्यात आले.

घरकूल वाटप न केल्याने सहाय्यक आयुक्तांना सक्त ताकीद

पिंपरी : महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन प्रकल्पाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी अजंठानगर, मिलिंदनगर प्रकल्पातील घरकुलाचे वाटप अद्याप केलेले नाही, तसेच वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाबाबत तक्रारी प्रचंड वाढल्याने सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांना अतिरिक्त पदभार देवू नका

पिंपरी चिंचवड : अतिरिक्त पदभारामुळे अनेक अधिकार्‍यांना एकाही विभागाचे सुरळीत कामकाज करणे कठीण झाले आहे. त्यांना नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यास वेळ देखील मिळेना झाला आहे. महानगरपालिका आस्थापनेच्या वर्ग 1 व 2 पदांवरील विविध विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात येवू नये.अशी मागणी विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी केली. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे.

Wednesday, 26 December 2018

स्मशानभुमी विकसित करण्यासाठी 40 कोटींची तरतूद करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीलगतची जागा आणि डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करावे. शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमी आणि दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमीची स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी केली. यावेळी महापौरांना पाण्याची कमतरता, ठिकठिकाणी वाढलेले गवत, घाटांची दुरवस़्था, त्यातील शेड आदी सर्वच ठिकाणी दुरूस्ती करण्याची गरज होती, हे लक्षात आले.

महापालिकेची अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने आजपर्यंत 389 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजेच 78 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, सर्वात कमी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 30 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले.

2018, the year that was: PCMC’s Dapodi-Nigdi BRTS sees light of day

While formation of a new police commissionerate in the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was a major event in the year, other things such as increased swine flu deaths, making operational the Dapodi -Nigdi Bus rapid transit System (BRTS) lane operational, low rank in ease of living index, and an autorickshaw driver turning into a politician and becoming a mayor also were the major attractions.

डांगे चौक अतिक्रमणांच्या विळख्यात

पिंपरी - हातगाडी, टेम्पो, पथारी व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांसह पदपथ, दुभाजक, बीआरटी मार्ग येथेही विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे डांगे चौक परिसरात दर रविवारी मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे येथील नागरिक हैराण आहेत. 

भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक

पिंपरी - भोसरी पीएमपी बस टर्मिनल परिसरातील अवघे पाच मिनिटे... सोमवार-सकाळी अकराची वेळ...चाकणकडे निघालेली पीएमपी बस...त्यातील प्रवासी ४० ते ४५...त्याच वेळी चाकणकडे निघालेल्या ऑटो रिक्षा पाच, पॅगो रिक्षा दोन, एक जीप व एक ओमिनी...एका रिक्षात किमान प्रवासी पाच, एका पॅगोतील प्रवासी ११, जीपमधील प्रवासी १३... ओमिनीतील प्रवासी १२ सर्व मिळून प्रवासी ७२...असे अवैध प्रवासी वाहतुकीचे चित्र भोसरीत दररोज बघायला मिळते. ठराविक वेळेनुसार सुटणाऱ्या पीएमपी बस आणि इच्छितस्थळी थांबणारे अवैध प्रवासी वाहन चालक यामुळे भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे. 

मेट्रोसाठी सहा हजार कोटींचे कर्ज

पिंपरी - युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन बॅंकांकडून पुणे मेट्रोसाठी सहा हजार कोटी रुपये कर्ज मिळणार असून, त्याची प्रक्रिया येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी साठ टक्के रक्कम कर्जाद्वारे उपलब्ध करायचे ठरले होते. दोन विदेशी बॅंकांमार्फत ती रक्कम मिळणार असल्यामुळे, या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली रक्कम उभी राहणार आहे.

महापौरांनी घेतला “बीआरटी’चा आढावा

पिंपरी – महापौर राहुल जाधव यांनी सोमवारी (दि. 24) शहरातील बीआरटीएस मार्गांची पाहणी केली. सकाळी अकरा वाजता ऑटो क्‍लस्टर येथून या दौऱ्याला सुरुवात झाली.
या दौऱ्यादरम्यान काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावरील बस सेवा सुरु करण्यासाठी बसेसच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली व पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कॉरिडॉर वरील काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा विकास आराखड्या प्रमाणे करण्याची देखील सूचना दिली. त्यानंतर बीआरटीएस कॉरिडॉर वर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणेबाबत शहर वाहतूक पोलीस यांना सूचना दिल्या. तसेच उर्वरीत बीआरटीएस मार्गाची पाहणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

आता आयुक्‍तांची “सटकली’

पिंपरी – अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार टीकेचा सामना करावा लागणाऱ्या महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आपला दांडपट्टा फिरवायला सुरूवात केली आहे. कर्तव्यात सचोटी न राखल्याबद्दल सहाय्यक आयुक्‍त आण्णा बोदडे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे यांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी पालिकेकडून सल्लागारांची नियुक्ती

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी आता सल्लागाराची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने समीर घोष यांची नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शहरातील नागरिकांना मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

’स्मार्ट सिटी’योजनेअंतर्गत विकास कामांसाठी जनता दरबार घेण्याची मागणी

पिंपरी- चिंचवड – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळेसौदागर आणि पिंपळेगुरव परिसराचा विकास केला जात आहे. स्मार्ट सिटीतील कामे करताना नागरिकांच्या सूचना घेण्यात याव्यात. त्यासाठी जनता दरबार घ्यावेत. त्यातून येणार्‍या सूचनांचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करावा, अशी मागणी चिंचवड विधानसभा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी महापालिकेकडे केली आहे.

रावेत बंधार्‍याची पाणी पातळी तपासण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण

पिंपरी चिंचवड ः रावेत येथील जुन्या बंधार्‍याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे केले जाणार आहे. या सर्वेक्षणात बंधार्‍याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने बंधार्‍याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासण्यात येणार असून, त्यासाठी थेट पद्धतीने काम दिले जाणार आहे. याकरिता ड्रोन सर्वेक्षण करुन त्या कामास साडेपाच लाख रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूची 53 जणांना लागण

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात डिसेंबर महिन्यात 53 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, जानेवारी महिन्यांपासून अद्यापपर्यंत 563 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. वातावरणातील बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दर महिन्याला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाली आहे.

PCMC claims to have saved Rs 2.39 crore on key contract

Pimpri Chinchwad: Even as opposition leader Data Sane alleged irregularities in the tender process, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) .

Pimpri Chinchwad Municipal Corporation to track sanitation workers through smartwatches

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning to use ‘smart’ wristwatches to track the movements of its sanitation workers and record their attendance. The decision was taken by the civic body in response to the complaints received from residents regarding erratic garbage collection in the industrial township.

Pimpri Chinchwad municipal corporation to use tracking system for garbage trucks

In order to keep track of the collection and disposal of garbage, Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has decided to implement a vehicle tracking and management (VTS) system to keep a tab on vehicles collecting garbage within the city limits.

साडे पाच लाख खर्चून बंधाऱ्याचे सर्व्हेक्षण

पिंपरी – शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्‍याची पाण्याची पातळी तपासणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ड्रोन सर्व्हेक्षण करण्यात येणार असून साडेपाच लाख रूपये खर्च केला जाणार आहे.

शिरूर-पुणे मार्ग आठपदरी होणार

शिरूर - ‘‘शिरूर- पुणे या राज्य मार्गावरील वाहतूक समस्येचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी हा मार्ग ‘नॅशनल हायवे’कडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. आठपदरीसह या रस्त्याच्या संपूर्ण कामासाठी सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या दळणवळण मंत्रालयाने मान्यता दिली आहे,’’ अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

आयटीयन्सच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

निगडी – तळवडे आयटी पार्क परिसरात वाढलेली लूटमार आणि आयटीयन्स महिलांची होत असलेली छेडछाड थांबवण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी स्विकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली आहे.

पुणे विद्यापीठात साकारणार 'रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'

पुणे : तुम्ही विद्यार्थी, शिक्षक वा तरुण असाल आणि तुमच्या डोक्‍यात उद्योग सुरू करण्यासाठी अभिनव आणि नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या पुढे नेण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'ची उभारणी करणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी त्याचे उद्‌घाटन होणार आहे. 

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे महापालिका, कंत्राटदारांचे दुर्लक्ष

पिंपरी – महापालिकेच्या अ व फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दितील कचरा वेचक कर्मचारी व कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही तसेच त्यांना सुरक्षा साधनेही पुरविण्यात आलेली नाहीत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कचरा वेचक कामगारांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.

महापालिका भवनाजवळची जागा “पीएमपी’ला

पिंपरी – महापालिका भवनाजवळील मोकळी जागा बसस्थानक आणि डेपो उभारण्यासाठी पीएमपीएमएलला देण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. तीस वर्षांच्या कालावधीसाठी ही जागा दिली जाणार आहे.

कुशल मनुष्यबळाचा अभाव बांधकाम क्षेत्रासमोरील मोठी समस्या

पिंपरी – सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी कित्येक संस्थांनी अंदाज वर्तवले होते की, 2019 ते 2020 च्या काळात बांधकाम क्षेत्राला कुशल मनुष्यबळाचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. मध्ये मोठा मंदीचा काळ गेला असताना या भाकितांबाबत शंका व्यक्‍त करण्यात येत होती परंतु आता ही भाकिते खरी ठरताना दिसत आहे. बांधकाम क्षेत्रासमोर कुशल मनुष्यबळ ही मोठी समस्या उभी राहिली आहे.

गहुंजेमध्ये होणार हायपरलूपचा ट्रॅक

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी गहूंजे ते उर्से टोलनाका दरम्यान सुमारे 11.4 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर “चाचणी ट्रॅक’ उभारण्यासाठी निवडला आहे.

Saturday, 22 December 2018

PCMC set to create fibre cable network of 750km

PIMPRI CHINCHWAD : The infrastructure for online connectivity  .. 

चिखलीतील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठीच्या घरकुल योजनेस मिळाला मुहूर्त

पिंपरी (दि. २१ डिसें.) :- केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून, घरकुल प्रकल्पातील ४ सोसायटयांच्या इमारतीमधील एकूण १६८ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज (दि. २१) रोजी काढण्यात आली.

महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – बस पकडताना महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी चोरटयांनी हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथे घडली. संजीवनी ज्ञानेश्वर देवकर (वय 54, रा. यमुनानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

‘खेलो इंडिया युथ गेम्स’साठी महापालिकेने दिले 36 लाख रुपये

एमपीसी  न्यूज – केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत ‘खेलो इंडिया युथ गेम्स-2019 ‘ होणार आहेत. बालेवाडीत होणा-या या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पावणेछत्तीस लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. 

पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर स्कूलच्या विद्यार्थ्यांची अनिकेत बालग्राम आश्रमास भेट

एमपीसी न्यूज – चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी आकुर्डी येथील अनिकेत बालग्राम या आश्रमास भेट दिली. विद्यार्थ्य़ांनी आश्रमातील विद्यार्थ्यांबरोबर आनंदात दिवस घालवला. तसेच येथील मुलांना शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत भेटवस्तू देऊन आश्रमातील मुलांच्या आनंदात सहभागी होता आले. आश्रमातील मुलांबरोबर गप्पा तसेच त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ हा खूप मौल्यवान होता. हा अनुभव चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेता आला.

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदेना निलंबित करा – शत्रुघ्न काटे

पिंपरी चिंचवड : महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ‘मी माहिती देऊ शकत नाही’, असे उध्दटपणे त्यांनी उत्तर दिले. अधिकार्‍यांना एवढी मस्ती कशाला हवी. असे म्हणत ज्योत्स्ना शिंदे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पाडली.

चिखलीच्या घरकूल प्रकल्पातील 168 सदनिकांची सोडत

पिंपरी चिंचवड : घरकुल प्रकल्पातील 4 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकूण 168 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत अ‍ॅटो क्लस्टर, चिंचवड येथे महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी ही घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

वाहन चालकांपर्यंत नोटीसा पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहने दामटणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अडवून दंडाची पावती फाडण्यास नकार देत पोलीसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारातही भर पडली आहे. इतकेच काय तर पोलीसांनी गाडी अडविली तर ‘दादा’, ‘भाऊ’, ‘भाई’,ला फोन लावून गाडी सोडविण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्यावर उपाय म्हणून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या संबंधित वाहन चालकाला न थांबवता किंवा त्याच्याशी काहीही न बोलता वाहनाचा क्रमांक असलेल्या पाटीचे छाया चित्र काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, गेल्या दहा महिन्यात नियम मोडणार्‍या दोन लाख 79 हजार वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी गोळा केली आहे. त्यातील 46 हजार 700 वाहन चालकांना देण्याच्या नोटीसा तयार झाल्या आहेत. या नोटिसा वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

महावितरणने कामबंदीचे आदेश मागे घ्यावेत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स संघटनेच्या सभासदाला महावितरणमधून केलेल्या नियमबाह्य कामबंदी आदेश जारी केल्याच्या  निषेधार्थ संघटनेच्यावतीने महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन 26 डिसेंबर पासून महावितरण कंपनीचे रस्ता पेठेतील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे.

टिकटॉकचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई – आयुक्त पद्मनाभन

पिंपरी : केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅप्लिकेशनचा दुरुपयोग करत त्यातून अश्‍लील, बदनामीकारक आणि चुकीचे व्हिडिओ बनविण्यात येत आहेत. यामुळे भांडण, आत्महत्या, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, वाहतुकीस अडथळा असे अनेक प्रकार घडत आहेत. मात्र याची पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली असून असा उपद्व्याप करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केली. 

कोकणात निघालेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका

पुणे  :  मंगळवारी आलेली नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शनिवारीच कोकणात फिरायला निघालेल्या पर्यटकांना वाहतूककोंडीचा फटका बसला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. विशेषतः अमृततांजन पुलाजवळ अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत आहे.

मेट्रोसाठी स्वनिधीतून १५५ कोटी

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका भवन ते निगडी या अंतरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास गुरुवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच, संबंधित प्रकल्पास पुणे मेट्रोऐवजी पुणे व पिंपरी- चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याच्या प्रस्तावालाही सभेने मान्यता दिली. राज्य सरकारने निधी न दिल्यास या प्रकल्पासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून १५५ कोटी रुपये देण्याची उपसूचना संमत करण्यात आली. 

वीटभट्टीवरील मुलांसाठी हवी स्कूलबस

पिंपरी - रावेत, पुनावळे, ताथवडे, किवळे, मामुर्डी भागातील वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना स्टोअर स्टेप स्कूलच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. मात्र, वीटभट्ट्यांपासून शाळांचे अंतर चार ते पाच किलोमीटर असल्याने मुलांना पायपीट करावी लागत आहे. या मुलांसाठी महापालिकेने बसची व्यवस्था करावी, या मागणीसाठी मुलांसह त्यांच्या पालकांनी महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर शुक्रवारी ठिय्या मांडला. 

स्मार्ट सिटीचे दोन ‘डीपीआर’ मंजूर

पिंपरी - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामे करण्यासाठीच्या दोन डीपीआरला (सविस्तर प्रकल्प आराखडा) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सुमारे २५५ कोटी रुपयांची कामे एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

पिंपरी शहरात होणार सांडपाण्याचा पुनर्वापर

पिंपरी - शहरात सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र व यंत्रणा उभारणीसाठी नागरिकांचा खासगी सहभाग घेतला जाणार आहे. त्यासाठी धोरण व कृती आराखडा निश्‍चित केला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडची आयपीएलमध्ये निवड, चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार

पिंपरी (Pclive7.com):- आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याची चेन्नई सुपर किंग्ज संघात निवड झाली आहे. शहरातून आयपीएलमध्ये निवड झालेला तो पहिला खेळाडू आहे. त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पीसीएससीएलच्या वैधानिक लेखापरीक्षकपदी प्रधान फडके ऍण्ड असोसिएटस

पिंपरी (दि. २० डिसें.) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (पीसीएससीएल) च्या वैधानिक लेखापरीक्षकपदी (ऑडीटर) चिंचवड येथील प्रधान फडके ऍण्ड असोसिएटस यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Friday, 21 December 2018

निगडीपर्यंत मेट्रोला ‘ग्रीन सिग्नल’

निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतचा 4.413 किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रोसाठी पालिका 155 कोटी रूपये खर्च करणार आहे. उर्वरित 1 हजार 150 कोटी रूपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, या उपसूचनेसह या वाढीव मार्गाच्या विस्तृत प्रकल्प आराखडा अहवालास (डीपीआर) पालिका सर्वसाधारण सभेने गुरूवारी (दि.20) मंजुरी दिली. 

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पंकजा मुंडे यांचा चिंचवड दौरा

एमपीसी न्यूज – लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त रविवारी ( दि. 23 डिसेंबर ) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी 5 वाजता शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होईल.

वाहतुकीचे नियम मोडताना सावधान

पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांनो, तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर सावधान! कारण वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. नियम मोडल्यानंतर पोलीस तुमच्याशी वाद न घालता तुमच्या न कळत तुमच्या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र घेऊन तुम्हाला सोडून देतील. मात्र, नंतर दंडाची नोटीस घेऊन पोलीसच आपल्या दारात उभा राहील. गेल्या दहा महिन्यात नियम मोडणाऱ्या दोन लाख ७९ हजार वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारे गोळा केली आहे आणि त्यातील ४६ हजार ७०० वाहन चालकांना देण्याच्या नोटीस तयार झाल्या आहेत. या नोटिसा वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

अध्यापक, कर्मचार्‍यांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाच्या शासकीय कार्यालये व महाविद्यालये, शिक्षण संस्थांमधील अध्यापक व इतर कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने ‘तक्रार निवारण समिती’ स्थापन केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन केली असून यामुळे अध्यापक व इतर कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू

पिंपळे सौदागर : येथील साई चौकात असलेली उच्च दाबाच्या (हायटेंन्शन) विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भाजपच्या नगरसेविका निर्मला कुटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला चालना मिळाली आहे. पिंपळे सौदागर येथील साई चौक येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या पूलाच्या शेजारीच उच्चदाबाची विद्युत वाहिनी असल्यामुळे त्याचा मोठा अडथळा निर्माण होत होता. भविष्यात निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी नगरसेविका निर्मला कुटे यांनी तातडीने या वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरु करण्याच्या सुचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या. यावेळी विद्युत विभागाचे अधिकारी कावळे उपस्थित होते.

पर्यावरण संतुलित सोसायटीस कर सवलत

पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळणार आहे. 

चिंचवडगावात ‘हेरिटेज वॉक’

पिंपरी - महापालिकेतर्फे चिंचवडगावातील सुमारे पाच किलोमीटरच्या क्षेत्रात ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यात मोरया गोसावी समाधी मंदिर, हनुमान, कालभैरवनाथ, धनेश्‍वर, श्रीराम या मंदिरांसह क्रांतिवीर चापेकर वाड्याचा समावेश आहे. यामुळे चिंचवड गावठाणासह परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. 

‘काळेवाडी-औंध पूल खुला करा’

पिंपरी - काळेवाडी-औंध मार्गावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येत असलेल्या दोन समांतर उड्डाण पुलांपैकी एकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुसऱ्या पुलाचेही काम प्रगतिपथावर आहे.

कचरा वेचक कामगारांची आरोग्य तपासणीच नाही

चौफेर न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ’अ’ व ’फ’ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील कचरा वेचक कर्मचारी व कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच त्यांना सुरक्षा साधनेही पुरविण्यात येत नाहीत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कचरा वेचक कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

केबल नेटवर्कच्या रस्ते खोदकामात गैरव्यवहार

चौफेर न्यूज ः पिंपरी-चिंचवड महापालिकेने एका खासगी कंपनीस शहरातील सुमारे 355 किलोमीटर अंतर भूमिगत फायबर केबल नेटवर्कसाठी रस्ते खोदकामास परवानगी दिली आहे. शासनाच्या अटी व शर्तीचे सर्रासपणे उल्लंघन करून त्यापेक्षा अधिक अंतराचे काम या कंपनीने केले आहे. हे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांवर दबाव टाकण्यात आला. त्यात आमदारांसह आयुक्त सामील झाले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे. महापालिकेच्या विरोधी पक्षनेते दालनात झालेल्या पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, नगरसेवक मयुर कलाटे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने गाडगे महाराजांना अभिवादन

चौफेर न्यूज  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

अग्निशामक केंद्राचे स्थळ दर्शवणारे फलक त्वरित लावा – दिनेश यादव

एमपीसी न्यूज – चिखली-कुदळवाडी परिसरात अलीकडेच उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचे स्थळ नागरिकांना माहित व्हावे यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी लेखी निवेदनांद्वारे केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, चिखली येथे अग्निशमन केंद्राचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले आहे. 

ग्रेड सेपरेटरच्या निविदेत चूक

पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर भागात उभारण्यात येत असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भूमिपूजन होऊन तीन महिने ‌उलटल्यानंतर या कामाच्या निविदेला मान्यता देताना त्यामध्ये तांत्रिक चूक झाल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला आहे. या कामाची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराबरोबर करारनामा करताना तांत्रिक चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामु‌‌ळे संबधित ठेकेदाराला ५७ लाख रुपये जास्त द्यावे लागणार असल्याची कबुली पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. काम करताना अशा पद्धतीने तांत्रिक चुका होत असल्याचे समर्थन करून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रसत्न केला.

पीएमपीचा ‘जीएसटी’ देण्यास नकार

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून पुरविल्या जाणार्‍या सीएनजीच्या बिलावर जीएसटी देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे. आगारांपर्यंत गॅस पाइपलाइन असल्याने आम्हाला जीएसटी लागू होत नसल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. ही रक्कम जवळपास दहा कोटी रुपयांची आहे. पीएमपीच्या ताफ्यात जवळपास 1100 बस सीएनजीवर धावणार्‍या आहेत. या गाड्यांना एमएनजीएलकडून गॅसपुरवठा केला जातो. त्यासाठी पीएमपीच्या आगारांपर्यंत पाइपलाइनद्वारे गॅस पोहचविण्यात आलेला आहे.

पीएफ देणे सर्व कंपन्याना बंधनकारक

पुणे : वंचित घटकांमधील कामगार आणि मजुरांना शासकीय सेवेचा लाभ आणि सेवानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ व्हावा, यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यासाठी सर्व कामगारांना पीएफच्या अखत्यारित आणण्याचा निर्णय पीएफ कार्यालयाने घेतला आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व कंपन्या आणि त्यांच्या कामगारांची संख्या पीएफ कार्यालयाला देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरापासून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

नाना-नानी पार्कचे कुंपण जागोजागी तुटले

पिंपरी : पिंपरी परिसरातील मासुळकर कॉलनी परिसरातील नाना-नानी पार्कचे जागोजागी कुंपण तुटले आहे. त्यामुळे उद्यानात गैरप्रकार होत असून याचा त्रास उद्यानात येणार्‍या लहान मुलांना व वृद्धांना होत आहे. त्यातच या उद्यानाच्या पाठीमागच्या बाजूने तारकुंपण तोडून लालटोपीनगर येथील रहिवाशांनी पाया वाटा तयार केल्या आहेत. यामुळे उद्यानात मध्यपी, गर्दुले, व टपोरींनी थैमान घातले आहे. उद्यानात लहान मुलांची खेळणे असल्याने मोठ्या संख्येने येथे मुलांची गर्दी असते. तर उद्यानातील एका सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचे विविध कार्यक्रम होतात. यामुळे रॉक गार्डन’ नेहमीच गजबजलेले असते.

Pipeline repairs to improve water supply in Pimpri Chinchwad

PIMPRI CHINCHWAD: Repairs to the water pipeline taken up by Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) will rectify the supply problems to .

नदीपत्रातील रस्त्याचे काम वेगात

पिंपरी - महापालिकेच्या वतीने काळेवाडी पुलापासून चिंचवड येथील यशोपुरम सोसायटीला जोडणाऱ्या व सुमारे नऊ कोटी ३३ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. चिंचवड-लक्ष्मीनगर येथे कामाला वेग आला असून काम पूर्ण झाल्यावर लिंक रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

बससाठी पीएमपीला साडेचार एकर जागा

पुणे - बस उभ्या करणे आणि त्या दुरुस्त करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला डुडुळगाव आणि चऱ्होली येथील एकूण साडेचार एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्यात एकूण १०० बस उभ्या राहू शकतात. त्यामुळे देहू, आळंदी येथून शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार आहे. 

नगरसेवकांचा विमा काढण्यास कॉंग्रेसचा विरोध

पिंपरी – महापालिकेतील नगरसेवक व त्यांच्या कुटूंबियांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून आरोग्य विमा काढण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे.

लोणावळा-पुणे आणखी एक लोकल सेमीफास्ट

पुणे – लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने रात्री 10.35 वाजता येणारी लोकल नुकतीच सेमीफास्ट करण्यात आली. यानंतर आता रात्री 11.40 वाजता सुटणारी दुसरी लोकलही सेमीफास्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.22 पासून प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Thursday, 20 December 2018

Pune: CM Fadnavis bats for 1,000 e-buses

PUNE: Chief minister Devendra Fadnavis on Tuesday said 1,000 new green electric buses, along with the three Metro lines, would ease traffic congestion in 

कासारवाडीतील श्री. दत्त मंदिरामध्ये मान्यवरांची मांदियाळी

कासारवाडी (दि. १९ डिसें.) :-  कासारवाडी येथील श्री. दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.
या महोत्सवा दरम्यान हभप शंकर महाराज शेवाळे यांच्या कीर्तन प्रसंगी बंजरंग राजवडे यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते विजू जगताप,  माजी नगरसेवक शंकर जगताप, आप्पा बागल व जनविकास युवा मंचाचे अध्यक्ष सचिन पांढरकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका शाळांसाठी राबविण्यात येणार्‍या क्रीडा धोरणाला मंजुरी

पुणे : महापालिकेच्या क्रीडा विभागाने तयार केलेल्या क्रीडा धोरणाला स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

खबरदार! आधारसाठी दबाव टाकल्यास होणार एक कोटींचा दंड व १० वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली – आधार कार्ड सक्तीवरून केंद्र सरकाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला बँक खाते किंवा मोबाईल सिम घेण्यासाठी आधार कार्ड देणे बंधनकारक राहणार नाही. ते पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. बँक किंवा टेलिकॉम कंपन्यांना ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड देण्यावर दबाव टाकला तर एक कोटीपर्यंत दंड भरावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनीतील संबंधित कर्मचाऱ्यांना ३ ते १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

“पीएमपी’ला मोफत प्रवास योजनेला “नकारघंटा’

पिंपरी – पीएमपीकडे अधिकाधिक प्रवासी आकृष्ट व्हावेत, यासाठी दर महिन्याला एक याप्रमाणे वर्षांला 12 दिवस पीएमपीतून मोफत प्रवासाची योजना पीएमपीने आखली. यासाठी पुणे महापालिकेने हिरवा कंदील दाखवला असला तरी, पिंपरी पालिकेने मात्र नकारघंटा दर्शवली आहे. एका पालिकेचा होकार व दुसऱ्याचा नकार राहिल्यास या योजनेचे भवितव्य अधांतरी राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

During a ‘smart’ pitch by PCMC chief, citizens ask for the basics

PIMPRI CHINCHWAD: At the Pimpri Chinchwad Municipal Corporat .. 

In a first, PCMC, not SRA, plans to rehabilitate slums on private land

After years of progressing at a snail’s pace, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation seems to have now decided to seriously implement its policy of a slum-free city, which has been gathering dust for more than a decade. For a start, it has planned a first-of-its-kind project to rehabilitate slums on a private land. “We have decided to implement a first-of-its-kind project of slum rehabilitation on private land. It will be a pilot project,” Municipal Commissioner Shravan Hardikar said on Tuesday.

‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’नुसार रस्त्यांचा विकास

पुणे शहरातील औंध परिसरात करण्यात आलेल्या ‘अर्बन स्ट्रीट डिजाईन’नुसार पिंपरी-चिंचवड शहरातीत रस्तेही ही सुशोभित केले जाणार आहेत. हे रस्ते व पदपथ पर्यावरणपुरक असणार असून, त्यावर सर्वांधिक महत्व पादचारी व सायकलस्वारांना दिले जाणार आहे. या कामासाठी पालिका तब्बल 52 कोटी 5 लाख रूपये खर्च करणार आहे.  

शहरात मेट्रोचा दोन किलोमीटर अंतराचा स्पॅन पूर्ण

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत दापोडीतील हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतच्या मार्गावर पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत एकूण 2 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गिकेचा स्पॅन पूर्ण झाला आहे. नव्या वर्षात फेबु्रवारीत त्यावर लोहमार्ग (ट्रॅक) बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. मार्गिकेसाठी सेगमेंट जुळवणीचे काम गर्डर लाँचरच्या विविध 3 मशिनने सुरू आहे. खराळवाडी येथे बसविलेल्या गर्डर लाँचरने संत तुकारामनगर येथील मेट्रो स्टेशनपर्यंत स्पॅन जुळवणीचे काम पूर्ण झाले आहे. स्टेशनच्या कनकोर्स व आर्म पिलरचे काम सुरू असल्याने तेथे मशिन उतरवून स्टेशनच्या पुढील पिलरवर चढविले जाणार आहे. 

वेताळनगर प्रकल्पातील 224 लाभार्थ्यांना सदनिकेचे वाटप

चिंचवडच्या वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाताील ए 2 व ए 7 या दोन इमारतीमधील सदनिकांचे वाटप मंगळवारी (दि.18) करण्यात आले. संगणकीय सोडत काढून एकूण 224 कुटुंबांना सदनिकांचा लाभ देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने हा प्रकल्प राबविला आहे. चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात ही सोडत काढण्यात आली.

ऑटो कल्स्टरच्या मैदानात भंगार जाळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज- चिंचवडच्या ऑटो कल्स्टर समोरील मैदानात भंगार व्यावसायिकांकडून रबर, प्लास्टिकचा भंगार माल जाळण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अशा भंगार व्यावसायिकांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

पुणे-लोणावळादरम्यान १५ डब्यांच्या लोकल?

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर येत्या काळात १५ डब्यांची लोकल चालविणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने या मार्गांवरील रेल्वे स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी लांब पल्याच्या गाड्यांना मार्ग देण्यासाठी स्थानकावर एक लेन वाढविण्याचा प्रस्ताव आहे. 

पिंपरीतील मिळकतींमध्ये दहा वर्षांत दुपटीने वाढ

पिंपरी : वेगाने नागरिकीकरण होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींची संख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. मिळकतींची संख्या गेल्या दहा वर्षांत जवळपास दुपटीने वाढली आहे. पुण्या-मुंबईच्या जवळचे शहर, चांगल्या सुविधा, प्रशस्त रस्ते, राहण्यायोग्य आणि व्यवसाययोग्य मुबलक सुविधा शहरात असल्याने नागरिकांची पिंपरी-चिंचवडला अधिक पसंती मिळत आहे. दुसरीकडे वाढते नागरिकीकरण व लोकसंख्येमुळे शहरातील नागरी सुविधांवर ताण पडत असल्याचे चित्रही समोर आले आहे.

शहरबात पिंपरी : पालथ्या घडय़ावर पाणी

पिंपरी महापालिकेत सत्तांतर झाले. तरीही वर्षांनुवर्षे असलेल्या त्याच समस्यांची जंत्री जशीच्या तशी आहे. कारभारी आमदारांनी महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला, तेव्हा जुन्याच समस्या नव्याने चर्चिल्या गेल्या. आयुक्तांचे नियंत्रण नाही. पुढचे पाठ आणि मागचे सपाट, अशी अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. आमदारांमध्ये एकवाक्यता आणि सातत्य नाही. त्यामुळे पालथ्या घडय़ावर पाणी अशीच परिस्थिती सध्या दिसून येते.

आकुर्डी स्टेशन रस्त्यांचे रुंदीकरण

पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरासह प्राधिकरण, रावेत, बिजलीनगर व वाल्हेकरवाडी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

पुणे-नाशिक केवळ २ तासांत

पुणे - पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून; प्रकल्पाचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

डिसेंबर महिना मेट्रोला लाभदायक

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारळ फोडलेल्या शहरातील पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मेट्रो प्रकल्पांच्या कामांनी गती घेतली आहे. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यातच मेट्रोची ‘ट्रायल रन’ होणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी डिसेंबर लाभदायी ठरणार असल्याची चिन्हे आहेत. 

वाकडमध्ये १५ मीटर उंचीवर असणार मेट्रो

पिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. 
महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तिसरा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग ‘संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा’ (डीबीएफओटी) तत्त्वावर सार्वजनिक खासही सहभागाने (पीपीपी) उभारण्यात येणार आहे.

“धन्वंतरी’साठी क्षेत्रीय कार्यालये उदासीन

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आस्थापनेवरील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ योजना लागू केली आहे. मात्र, महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या सुमारे 70 टक्के कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांची नावेच वैद्यकीय विभागाला सादर केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आणीबाणीच्या काळात एखाद्या कर्मचाऱ्याची गैरसोय झाल्यास त्याला संबंधित शाखा प्रमुखाला जबाबदार धरले जाणार आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. सर्व शाखा प्रमुखांना या परिपत्रकाद्वारे इशारा दिला आहे.

आमदारांनी घेतली झाडाझडती

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील या साठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरात ‘आरटीई’च्या 529 जागा रिक्‍त

पिंपरी – अर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय मुलांसाठी “आरटीई’ अंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत. मात्र, या प्रवेशाची सहावी फेरी झाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेशाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. सद्यस्थितीत “आरटीई’च्या पाचव्या फेरीअखेर शहरातील शाळांमध्ये 529 जागा रिक्‍त आहेत.

Wednesday, 19 December 2018

पिंपरीतील संतपीठासाठी 5 कोटींचा वाढीव खर्च

पिंपरी – महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात येत आहे. त्याच्यासाठी महापालिकेने 40 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. त्यामुळे 40 कोटींच्या कामाला आता पंचेचाळीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

सांस्कृतिक सभागृहासाठी वास्तूविशारद

पिंपरी – सल्लागार, वास्तूविषारद नेमणुकीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेची खर्चाची उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेच्या ह प्रभाग कार्यालयांतर्गत दापोडी गावठाणात सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार असून त्यासाठी देखील महापालिकेतर्फे वास्तूविशारदची नेमणूक करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील स्मशानभूमींसाठी लवकरच धोरण ठरविणार – महापौर

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या स्मशानभूमींसाठी लवकरच धोरण ठरविले जाणार आहे. याअंतर्गत पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, स्नानगृह, स्वच्छतागृह, दशक्रिया विधीसाठी चौथरे या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याकरिता लवकरच आयुक्त श्रावण हर्डीकर आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन शहरातील स्माशानभूमींचे धोरण ठरविले जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एच.ए.च्या प्रश्नांबाबत खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्री गौडांची भेट

चौफेर न्यूज –  पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स ही भारत सरकारची कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा १९ महिन्याचा पगार प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकली नाही. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही कोणी खरेदीदार पुढे आला नाही. या सर्व कारणाने कंपनी चालू ठेवणे अधिकच कठीण झाले आहे.

नरेंद्र मोदींच्या हस्ते हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे भूमीपूजन

पुणे –  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे भूमीपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. ३ हजार ३१३ कोटी रूपये एवढा या प्रकल्पाला खर्च येणार आहे. २३.३ किलोमिटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. हिंजवडी परिसरातील उद्योगांना या मेट्रोमुळे मोठी चालना मिळणार असून आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रोचा मोठा फायदा होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादीतर्फे प्राधिकरणात 63 कर्मचार्‍यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड ः प्राधिकरण येथे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून आरोग्य अधिकारी तसेच 52 पालिका कर्मचारी, खाजगी संस्थेचे 63 कर्मचारी यांचा स्वेटर देवून सन्मान करण्यात आला. यावेळी, शहर उपाध्यक्षा पल्लवी पांढरे,शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महीला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

दिव्यांग बांधव ऑर्केस्ट्रातून उभारणार सामाजिक प्रकल्पांसाठी निधी

पिंपरी चिंचवड ः वेदनेचा डोंगर घेऊन जाणार्‍या दिव्यांग आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संवेदनेचा हातभार लावण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि दीपस्तंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी या ऑर्केस्ट्राचे घेण्यात येत असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (दि. 28) रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

पिंपळे सौदागरमध्ये पाण्यासाठी आयुक्तांना घेराव

पिंपळे सौदागर ः शहरात पाण्याची समस्या बिकट असताना महापालिका आयुक्त विकासाच्या बाता करीत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांना संतापून स्मार्ट सिटीचे राहू द्या. पिण्याच्या पाण्याचे काय ते सांगा, असा सवाल आयुक्त हर्डिकर यांना केला. स्मार्ट सिटीचा हेतू, विकासकामांचे नियोजन, भविष्यात होणारे शहरातील बदल आदी विविध मुद्दयांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी सुमारे अडीच तास नागरिकांशी संवाद साधला. पिंपळे सौदागर येथील नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने स्मार्ट सिटीचे सादरीकरण व आयुक्तांशी संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लक्ष्मण जगताप होते. सहशहर अभियंता राजन पाटील, संगणक विभागाचे प्रमुख नीलकंठ पोमण, नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे आदी उपस्थित होते.

पिंपरीत 150 वाहने चोरणार्‍याला अटक

पिंपरी चिंचवड ः दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरून संसार आणि मुलांचे शिक्षणाचा खर्च भागविणार्‍या एक अट्टल चोरट्याला वाकड पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलिसांनी 150 चारचाकी वाहने चोरणार्‍या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. राजू जावळकर (वय 50) आणि सोमनाथ चौधरी अशी या आरोपींची नावे असून दोघेही कार चोरी केल्यावर भंगारात विकायचे. यातून मिळणार्‍या पैशांमधून दोघेही संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च भागवायचे.