काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रश्न सुटले नाहीत म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने मतदारांनी भारतीय जनता पक्षाला झुकते माप दिले. आज शहरात तीन खासदार आहेत. त्यात शिवेसेनेचे दोन आणि भाजपचे एक (राज्यसभा सदस्य) आहे. तीन आमदारांपैकी दोन भाजपचे एक शिवसेनेचा आहे. १२८ नगरसेवकांमध्ये तब्बल ७७ भाजपचे आहेत. अशा प्रकारे गल्ली ते दिल्ली अगदी घसघशीत पाठबळ भाजपच्या मागे आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही होती. ती जवळपास संपली. याचे कारण लोकांना भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, पारदर्शक, गतिशील कारभार हवा आहे. गुन्हेगारीपासून संपूर्ण मुक्ती हवी आहे. लोकसभा नंतर विधानसभा आणि वर्षापूर्वी महापालिका त्यासाठीच मतदारांनी भाजपकडे सोपविली. गेल्या तीन वर्षांतील ‘काय साधले, काय राहिले’ याचा लेखाजोखा मांडला तर, बऱ्यापैकी प्रश्न सुटले आणि आजही असंख्य मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत; हे मान्य करावे लागेल. पूर्वीपेक्षा विकासकामांचा वेग वाढला, पण निधीची चणचण आहेच. परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबरच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने शहराचे राजकीय वजन वाढले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 31 October 2017
आमदारांचे रिपोर्टकार्ड । महेश लांडगे (भोसरी): घोषणांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळ
भोसरी मतदारसंघातील बफर झोनची हद्द कमी करणे, बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळविलेला भक्कम पाठिंबा, शास्तीकर माफी आणि अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या लढ्याला आलेले यश या लांडगे यांच्या जमेच्या बाजू आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नागपूर येथील अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. कुंटे समितीने दिलेल्या अहवालानुसार आता बांधकामे नियमित होणार आहेत.
आमदारांचे रिपोर्टकार्ड । लक्ष्मण जगताप (चिंचवड): मागण्या मंजूर, मात्र कार्यवाही कागदावरच
पिंपरी- चिंचवडमधील भाजपचा पहिला आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांनी इतिहास घडविला. शहरातील सर्वांत गाजलेला मोठा प्रश्न म्हणजे अनधिकृत बांधकामांचा. ही हजारो अनधिकृत घरे नियमित व्हावीत यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावली होती. भाजपचे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्र्यांकडे व विधिमंडळात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु, कोणते बांधकाम नियमित होणार आणि कोणते नाही याचा तपशील महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. शास्तीकराचा प्रश्नदेखील असाच प्रलंबित आहे.
आमदारांचे रिपोर्टकार्ड । गौतम चाबुकस्वार (पिंपरी): पुनर्वसनात उतीर्ण; ‘एसआरए’त ‘अनुत्तीर्ण’
‘एमआयडीसी’मधील सुमारे १०० एकरांवरील १८ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, १२.५ टक्के परतावा यावर सातत्याने पाठपुरावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विभागीय ‘आयटीआय’ आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाला शासन मान्यता आणि संभाजीनगर, शाहूनगर येथील ‘जी’ ब्लॉकमधील बंदिस्त बाल्कनी प्रश्न निकालात काढून आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी स्वतःच्या प्रगती पुस्तकात उत्तीर्ण झाल्याचे शेरे मिळविले आहेत. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याबाबत ते ‘अनुत्तीर्ण’ठरले आहेत.
पिंपरीत मेट्रोकामे; हिंजवडीत निविदा प्रक्रिया वेगात
पिंपरी-चिंचवड शहरात अतिशय वेगवान पद्धतीने मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, महापालिका व महामेट्रो यांच्यात समन्वय आणि नियोजन नसल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत.
महामेट्रोला मिळणार शासकीय गोदामाची जागा
पुणे- पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा महामेट्रोला मिळाला आहे. सदर जागा मेट्रोला सुपूर्द करण्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नुकताच अध्यादेश जारी केला असून आता ही 2 हेक्टर 67 आर जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळणार आहे.
पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेच्या महापौरांची पिंपरी महापालिकेस भेट
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजासह विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेचे महापौर जितेंद्र तिवारी यांचे स्वागत महापौर नितीन काळजे यांनी केले. महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरसदस्य सुरेश भोईर आदी उपस्थित होते.
पंधरा शाळांचा कोटा अपूर्णच
पिंपरी - ‘राइट टू एज्युकेशन’अंतर्गत (आरटीई) शहरातील सुमारे १५ शाळांनी प्रवेश कोटा पूर्ण भरला नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. या शाळांनी प्रवेश नाकारून सरकारचा आदेश डावलला आहे. तर शिक्षण विभाग याविषयी गप्प आहे.
वैद्यकीय खरेदीवर आयुक्तांचा “वॉच’
निविदा रद्द ः संबंधित अधिकाऱ्याने अपात्र ठेकेदारांला ठरविले पात्र?
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका आरोग्य वैद्यकीय भांडार विभागात गोळ्या औषधे व यंत्रसामुग्री खरेदीत सतत गोलमाल झाला आहे. अनेक प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. काही प्रकरणांची चौकशी लागून तात्कालीन डॉक्टरांवर दोषारोप दाखल केले आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी वैद्यकीय खरेदीवर बारीक लक्ष ठेवले आहे. वैद्यकीय विभागाने राबवलेल्या एका निविदा प्रक्रियेत अपात्र ठेकेदारांला पात्र ठरविल्याने ती निविदा दक्षता व लेखाधिकाऱ्यांच्या आक्षेपानंतर आयुक्तांनी तात्काळ रद्द केली आहे.
41 स्वयंरोजगार संस्थांची नोंदणी रद्द! : महापालिका आयुक्तांचा आदेश
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 41 स्वयंरोजगार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांना महानगर पालिकेकडून देण्यात येणारी कामे यापुढे बंद होतील. तसा आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.
शहरातील कचरा समस्या जटिल
पिंपरी - शहराचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. तुलनेत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा अलगीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे. पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शहरातील सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायाने शहरातील कचरा समस्या जटिल बनत चालली आहे.
औंध येथील मुळा नदी काठी कचऱ्याचे ढीग; प्रशासनाला निवेदन
पिंपरी- औंध येथील मुळा नदीच्या पिंपरी महापालिका हद्दीतील काठावर मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचऱ्याचे ढिग लागले आहेत. याकडे ह-क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे नदीकाठी स्वच्छता करावी, अशी मागणी शिवशक्ती व्यायाम मंडळाने केली आहे. औंध येथील परिहार चौकातून श्रीमंत महादजी शिंदे पुलावरून पुढे आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द सुरू होते. हा पूल ओलांडल्यावर दोनही बाजूंना खोल नदीपात्र असून त्या ठिकाणी प्लास्टीक कचऱ्याचे ढीग साठले आहेत. नदीपात्रात घरातील भंगार व टाकाऊ वस्तूही टाकल्या आहेत. यामुळे मुळा नदीच्या नदी पात्रास धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागानेही कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्या ठिकाणचा कचरा साफ करून मुळा नदीपात्र कचरामुक्त ठेवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Pune: No water for cremation of kin of deputy collector, corporator
PCMC standing committee chairperson Seema Savale said, “The water tank might not have been filled as there was a technical problem at the water pumping ...
Hinjawadi traffic chaos: Some relief on the cards as PCMC unfolds plan to build two roads
TO ease the growing traffic chaos in Hinjewadi and Wakad areas, two new alternatives have been planned by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). One will be from Wakad octroi post while other will be from close to Hotel Sayaji in Wakad on ...
‘आयटी सिटी’ची कोंडी सुटणार!
हिंजवडीसाठी दोन पर्यायी रस्ते: आमदार जगताप यांची माहिती
पिंपरी – वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील ‘आयटी सिटी’ म्हणून ओळख असलेल्या या भागातील कोंडी सोडवण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे 12 आणि 18 मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
पिंपरी – वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील ‘आयटी सिटी’ म्हणून ओळख असलेल्या या भागातील कोंडी सोडवण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे 12 आणि 18 मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
Monday, 30 October 2017
Additional lane opened for traffic on road to IT Park
Pune: The traffic police has allowed vehicular movement on three lanes of the 1.8km-long road joining Shivaji chowk with Hinjewadi Phata on Katraj-Dehu Road bypass to reduce the traffic congestion at Hinjewadi IT Park.
पालिकेतील संगणक “अँटीव्हायरस’साठी 30 लाख खर्च
पिंपरी – महापालिकेच्या विविध विभागातील संगणक यंत्रणेकरिता अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी सहायक कर्मचारी वर्गही नियुक्त केला जाणार आहे. या दोन्ही कामासाठी 30 लाख रूपये खर्च होणार आहे.
“स्मार्ट सिटी’साठी 21 कोटींचा सल्लागार
पिंपरी – स्मार्ट सिटी योजनेच्या एरीया बेस डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत 1300 एकर जागेचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार संस्था नेमण्यात येणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अकरा नामांकित संस्थांनी स्वारस्थ दाखविले आहे. त्यापैकी एका संस्थेची निवड केली जाणार असून त्यांना सुमारे 21 कोटी रुपये मेहनताना दिला जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी वाढवली ‘धडधड’
पिंपरी - होणार... होणार... राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे गेली सहा महिने चर्चाच सुरू आहे. मात्र त्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर विस्ताराचे वारे पुन्हा वाहू लागले. त्यामुळे मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अनेक आमदारांना हायसे वाटले. पण याबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणाने शहरातील इच्छुक असणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची मात्र धडधड वाढविली आहे.
पिंपरी विधानसभेत भाजपाचा चेहरा कोण? इच्छुकांची ‘भाऊगर्दी’
पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता ‘काबिज’ करून शहरात भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची त्यानुसार पक्षाने तयारी देखील सुरू केली आहे. मात्र पिंपरी विधानसभेत इच्छुकांची ‘भाऊगर्दी’ झाल्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून पक्षश्रेष्ठींची चांगलीच ‘डोकेदुखी’ वाढणार आहे.
Commuters rail against PMPML fare hike; term it ‘steep and unfair’
“The hike is not only too steep, it is also unfair and illegal. Nationally and internationally, senior citizen and students are given concessions in almost every sector, but the PMPML has suddenly decided to increase the monthly fares, so much that everyone is up in arms against it.”
'सारथी'च्या तक्रारींवर पालिका करणार चिंतन
आयुक्त हर्डीकरांची सूचना: चार वर्षातील 48 हजार तक्रारींचा अभ्यास
जगताप डेअरी रस्त्यावर जड वाहनांना बंदी
जगताप डेअरी येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, या कामामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी सकाळी साडे सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या वर्दळीच्या वेळी जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी व कस्पटे वस्ती ते जगताप डेअरी या दोन मार्गावरून बस, खासगी बस, ट्रक व इतर जड वाहनांना सकाळी सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या कालावधीत प्रवेश बंद असणार आहे. ही बंदी जगताप डेअरी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. यामध्ये शासकीय बस, रुग्णवाहिका व अग्निशामकदल अशा अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.
दोन पर्यायी रस्ते
पिंपरी - हिंजवडी आणि वाकडमधील वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, तो लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. वाकड जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ते हिंजवडी असे दोन नवीन रस्ते तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
‘एफएसआय’बाबत लवकरच निर्णय - गिरीश बापट
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चटई क्षेत्र निर्देशांकात (एफएसआय) वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
एसआरएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एफएसआय वाढविण्याच्या प्रस्तावावर विविध खात्यांकडून प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता नगरविकास खात्याकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात गेला आहे. मुख्यमंत्र्यांची त्यावर स्वाक्षरी झाल्यावर याबाबतची अधिसूचना निघेल आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती मिळेल, असे बापट यांनी स्पष्ट केले.
चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय डॉग शो संपन्न
वाल्हेकरवाडी : चिंचवडमध्ये १०८ व १०९ वा आंतरराष्ट्रीय ‘ऑल ब्रीड चम्पिअन डॉग शो’ संपन्न झाला. या शो चे आयोजन पुना केंनेल कॉन्फेडेरेशन यांनी केले होते. या डॉग शो मुळे शहर वासियांना ३० ते ३५ प्रजातींचे श्वान पाहण्याची संधी मिळाली व श्वान प्रेमींनी याचा आनंद लुटला. आज (ता.२९) सकाळी अकरा वाजल्यापासून वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मध्ये हा शो सुरु झाला.
प्राधिकरणाच्या नियमांमुळे लघु उद्योगजकांना भुर्दंड!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक 7 आणि 10 मध्ये उद्योगांना भूखंड दिले आहेत. त्यामध्ये लघु उद्योगांनी प्राधिकरण प्रशासनाच्या नियमाप्रमाणे कमीतकमी 10 टक्के बांधकाम करून आपले उद्योग चालू केले आहेत. प्राधिकरणाने भूखंडाच्या कमीत-कमी 20 टक्के बांधकामाचा ठराव केला आहे. काही उद्योग अशा प्रकारचे आहेत की, त्यांना मोकळ्या जागेतच काम करावे लागते. त्यांना जादा बांधकामाची आवश्यकता नाही त्यांनाही 20 टक्के बांधकामाच्या नोटिसा काढल्या आहेत त्या रद्द कराव्यात. तसेच, काही उद्योगांनी पूर्वी 10 टक्के बांधकाम परवाना घेऊन रितसर बांधकाम पूर्ण केले आहे. बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही घेतला आहे. त्यांना वाढीव बांधकाम करायचे असल्यास त्यांना ज्यादा शुल्क (ए.पी.) भरायच्या नोटिसा आल्या आहेत, त्या रद्द कराव्यात. शुल्काच्या नावाखाली लघुउद्योजकांकडून वाढीव भुर्दंड आकारला जात आहे, असे गाऱ्हाणे लघुउद्योजक संघटनेच्या वतीने मांडण्यात आले.
पार्किंगमुळे भोसरीतील रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी
भोसरी – टेल्को रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटता सुटत नाही. कित्येकदा निवेदन देऊन आणि तक्रार करूनही पोलीस व प्रशासन दोघांनीही या विषयाकडे डोळेझाक केली आहे. रस्त्यावरच होणाऱ्या पार्किंगमुळे रोजच वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या शोरुम मालकांनी रस्त्यालाच पार्किंग झोन बनविले असल्याने भोसरी एमआयडीसीतील टेल्को रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते.
महापालिका : भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत; ५०० कोटींच्या उपसूचनांचा पाऊस
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी त्यामध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादीतील सदस्यांची संख्या अधिक आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाºया भाजपानेही विरोधकांशी सलगी करण्यास सुरुवात ...
बीआरटी अभ्यासदौऱ्यावर उधळपट्टी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआयटीएस व अन्य प्रकल्पांच्या पाहणीसाठी दोन टप्प्यात एकूण ८५ नगरसेवक व १८ अधिकारी अहमदाबाद येथे अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर तब्बल ५० लाख रुपयांचा खर्च होणार असून, केवळ ...
विमानवारीची तिकिटे केली रद्द, महापालिकेला लाखोंचा भूर्दंड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि अधिका-यांची अहमदाबाद रॅली काढली आहे. ऐनवेळी सुमारे चाळीस जणांची तिकिटे रद्द केल्याने महापालिकेस लाखोंचा फटका बसला आहे. नियोजनाअभावी, हा फटका बसल्याने जागरूक ...
पिंपरी-चिंचवडचा आराखडा मुंबई महापालिका तयार करणार
मुंबई : नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या शिफारशीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा आराखडा आता मुंबई महापालिकेचा विकास नियोजन विभाग तयार करणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणापाठोपाठ आता पिंपरी ...
मेट्रोच्या कामात सेवा वाहिन्यांचा अडसर
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम नाशिक फाट्यापासून सुरू झाले. हे काम प्रगतीपथावर असतानाच, महामेट्रोने दुसऱ्या टप्प्यातील काम सीएमईपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या भागातील रस्त्यांवर ...
बांधकाम परवानगीतून मेट्रोची सुटका
पिंपरी – मेट्रो रेल्वेचे काम जलद गतीने करण्यासाठी परवानगीच्या जाचातून मेट्रो रेल्वेला मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यापुढे मेट्रो रेल्वेला बांधकामासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका, पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्याही परवानगीची आवश्यक लागणार नाही. तशी सुधारणाच कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेला किती बांधकाम आणि कशाप्रकारे बांधकाम करता येईल, यावर कुणाचे नियंत्रण असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.
बांधकामे नियमीतकरणासाठी मराठीतून माहिती पुस्तिका
पिंपरी – अवैध बांधकाम नियमीतकरण्याची प्रक्रिया पिंपरी – चिंचवड महापालिकेने सुरु केली आहे. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिका मुख्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना तयार करण्यात आला असून अटी – शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. नियमावलीचे जाहीर प्रकटीकरण केले जाणार आहे. दोन दिवसात अर्जाचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. अवैध बांधकाम नियमीतकरण प्रक्रियेबाबत नगरसेवकांनाही माहिती देण्यात येणार आहे.नागरिकांच्या सोयीसाठी मराठीतून माहितीपुस्तिका काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले
Sunday, 29 October 2017
BRTS doing well in Pimpri-Chinchwad, but PCMC jumbo team insists 'Chalo Ahmedabad'
AFTER operating the Bus Rapid Transit System (BRTS) in Pimpri-Chinchwad for two-and-a-half years and even drawing praise from commuters, as many as 85 corporators and 18 top officials from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) are ...
Consultant for streetlights on cards
PIMPRI CHINCHWAD: For better efficiency of the streetlights in the city, the Pimpri Chincwad Municipal Corporation has decided to appoint a consultant for surveying, designing and commissioning of smart LED streetlights.
Twin townships set to get Swedish smart street soon
Pimpri Chinchwad: Commuters travelling through old Pune-Mumbai highway will soon get a feel of a Swedish smart street on the 3-km stretch from Harris bridge in Dapodi to Kasarwadi.
अपहरण, खंडणीच्या घटनांमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 'प्रोटेक्शन मनी'च्या नावाखाली व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या अपहरण, खंडणीच्या घटनांवरून पोलिसांचा गुन्हेगारांवरील जरब कमी झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिंहगड रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या गंभीर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. तीन दिवसांनतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला.
सिंहगड रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या गंभीर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. तीन दिवसांनतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला.
घरकुल बांधकाम परवानगीसाठी पालिका 31 लाख मोजणार
पिंपरी – महापालिकेमार्फत नवनगर विकास प्राधिकरणाच्या चिखली येथे बांधण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पातील इमारतीच्या बांधकाम परवानगीकरिता प्राधिकरणाकडे शुल्क भरण्यात येणार आहे. त्यामध्ये विकास शुल्क, बांधकाम सुरक्षा रक्कम आणि बांधकाम परवानगी शुल्कापोटी 31 लाख 49 हजार रूपये भरण्यात येणार आहेत.
“रेकॉर्ड’ गहाळ करणाऱ्या 47 अधिकाऱ्यांना नोटीस
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील 1992-93 आर्थिक वर्षांपासून “ऑडीट’ करण्यात आलेले नाही. मोठ्या प्रकल्पांचे “रेकॉर्ड’ पालिकेतील विभाग प्रमुखांनी गहाळ केले आहे. “रेकॉर्ड’ उपलब्ध न झाल्याने महापालिकेचे कित्येक वर्षांचे “ऑडीट’ रखडलेले आहे. याबाबतचा अहवाल लेखापरीक्षण विभागाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी विभाग प्रमुखांसह 47 अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. त्यासाठी त्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
“रिंग रोड’च्या “रिअलायमेंट’ अहवालास गती द्या
पिंपरी – सुधारित नियामावलीमध्ये प्राधिकरण आणि महानगर विभागाचा समावेश केल्यामुळे प्राधिकरणमधील 22 हजार अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याचे पुनरावलोकन करण्याकरिता पुर्नसर्वेक्षण विकास आराखडा समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या अंतिम रिअलायमेंट अहवालासाठी नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी गती द्यावी, अशी अपेक्षा घर बचाव संघर्ष समितीकडून वर्तविण्यात येत आहे.
BMC to help other cities in drafting DP
It has proposed to form an institute, which will offer technical know-how to officials of other civic bodies in this regard. Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has become the first civic body to seek help from the BMC in preparing its DP ...
Migrants choose Pune over costly & crowded Mumbai
Pune: The high cost of living and overcrowding in Mumbai is bringing more migrants to the city. This was revealed in a report by the World Economic Forum, titled Migration and its Impact on Cities, which said Pune has now emerged as a counter magnet of Mumbai.
Empire Estate flyover delay upsets World Bank team
Pimpri Chinchwad: During their visit to Pimpri Chinchwad city on Friday, officials of the World Bank expressed displeasure over the slow pace of work on the Empire Estate flyover.
Diversion put in place to facilitate MahaMetro work
Pune: MahaMetro has released a traffic diversion plan for Pimpri and Dapodi to prevent congestion because of the ongoing construction work from Nashik Phata to Kharalwadi foot overbridge.
11 firms show interest in PCMC ‘smart’ projects
Pimpri Chinchwad: Eleven national and international companies have expressed interest in taking up projects under the Smart Cities Mission in Pimpri Chinchwad.
In the first phase, developmental works will be carried out in Pimple Saudagar-Wakad area and will cover 1,390 acres.
In the first phase, developmental works will be carried out in Pimple Saudagar-Wakad area and will cover 1,390 acres.
‘पेटा’ हटावसाठी आमदार महेश लांडगे अनोख्या अंदाजात मैदानात
पिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवी यासाठी जंग जंग पछाडणार्या आमदार महेश लांडगे यांनी अखेर ‘पेटा’च्या विरोधात एल्गार पुकारला आहे. महेश लांडगे आणि बैलगाडा संघटनांच्या प्रयत्नांनंतर विधानसभेत बैलगाडा बंदी उठवणारे विधेयक पास झाले खरे..पण पेटा न्यायालयात गेल्याने विधेयका नंतर ही बंदी कायम राहिली…त्यामुळे राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरणारा हा निर्णय होण्यात पेटाचा अडथळा लक्षात घेऊन, लांडगे यांनी पेटालाच लक्ष्य केलंय…! त्यासाठी त्यांनी पेटाचा विरोध करणारा ड्रेस परिधान करत बैलगाडा शर्यती वरील बंदी उठवण्याच्या आंदोलनात भाग घेतला आहे.
BJP corporator booked for 'submitting fake educational documents'
According to the police, 34-year-old Kamthe contested the 2017 civic polls from Ward number 26B, which comes under the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). Sathe got to know that Kamthe had failed in Class 11th exams, but allegedly ...
आवडत्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आरटीओचे आवाहन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांसाठी एमएच 14 जीपी ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. त्यातील आवडता क्रमांक हवा असणाऱ्या वाहनधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने तुकाराम सृष्टी साकारण्याची मागणी
पिंपरी – महापालिकेने संत तुकारामनगरमध्ये तुकाराम सृष्टी उभारावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत देहू व आळंदी असे दोन मोठे तीर्थक्षेत्र आहेत. पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये संत तुकाराम महाराजांचे सुंदर मंदिर आहे. त्यामुळे या परिसराला संत तुकारामनगर हे नाव पडलेले आहे. या मंदिरापासून जवळच असलेल्या एच.ए. कंपनीच्या मैदानावर संत तुकाराम महाराजाच्या पालखीचा मुक्काम व रिंगण सोहळा झाला आहे. वारीतील वारकऱ्यांचा संत तुकारामनगरमध्ये मुक्काम असतो.
मेट्रो, बीआरटीसाठी विशेष सभा बोलवा
– माजी नगरसेवक बाबू नायर यांची मागणी
पिंपरी – शहरातील मेट्रो व बीआरटीएस या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळावी, त्यावर सूचना देता याव्यात यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी नगरसेवक बाबू नायर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Friday, 27 October 2017
जीएसटीमुळे पालिका उत्पन्नाला फटका
पिंपरी – जीएसटीची भरपाई म्हणून सरकारकडून महापालिकेला मिळणारे अनुदान अत्यल्प आहे. स्थानिक नेते शहराला अधिक निधी आणण्यात अपयशी ठरत असून त्याचा फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे. त्यासाठी विशेष सभा घेऊन शासनाकडे अधिकचा निधी मागावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी केला आहे.
PCCOE Akurdi romp to second win in RYFS
Pimpri Chinchwad College of Engineering (PCCOE), Akurdi thrashed Dr DY Patil Arts, Commerce & Science College, Akurdi 11-0 to notch their second win in the college boys league of the RFYS Football Tournament here on Thursday. Three goals each from ...
मुंढेंच्या पिंपरी प्राधिकरणातील प्रवेशाने अनेकांचे धाबे दणाणले
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे असलेला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
तेराशे एकरचा होणार विकास, पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलमेंटसाठी २० कोटींची कामे
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर एक बैठक झाली. त्यानंतर पॅन सिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटच्या निविदा प्रक्रिया राबविणे, सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा विषय मंजूर झाला होता. त्यानुसार एरिया ...
PCMC wants fixed water charges & supply timings for slum areas
PIMPRI CHINCHWAD: The civic body has proposed that water charges should be fixed for slum areas.
PMPML mulls over issuing MI cards without Aadhaar
PUNE: With confusion prevailing over linking of Aadhaar cards with various essential services, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is considering accepting other identification documents for issuing MI cards.
महाराष्ट्रात प्रथमच मोशीत इंद्रायणी घाटावर गंगा आरती संपन्न
पिंपरी (प्रतिनिधी):- संपुर्ण उत्तर भारतीय समाजात लोकआस्थेचे महापर्व समजला जाणारा लोकोत्सव संपुर्ण भारतभर आज कार्तिक शुक्ल षष्टीला मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे मोशी इंद्रायणी घाटावर विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपुजेनिमित्त इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरती करण्यात आली. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, माजी उपमहापौर शरद बो-हाडे आदींसह हजारों उत्तर भारतीय बंधू भगिनी उपस्थित होते.
First Metro pier on Pimpri-Swargate route erected; no let up in congestion
Nearly 8 km of the elevated stretch, from Pimpri to Harris bridge (Dapodi), lies within the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits. This elevated route starts from near the Ahilyabai Holkar chowk and goes along the PCMC main office ...
PCMC civic chief seeks ideas for development work
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), has called suggestions from common citizens on development and construction related works from their area. The civic body has prepared a form, which includes filling details pertaining to suggested ...
रिंगरोडच्या सर्वेक्षणाला पोलिसांकडूनच "ब्रेक'
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही. राज्याच्या वॉररूम मधील प्रमुख प्रकल्प असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या पोलिस खात्याकडूनच रिंगरोडच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पर्यटनासोबत ‘नो ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’चा संदेश
पिंपरी - पुणे-लडाख, नेपाळ-भूतान, सिक्कीम आणि ईशान्येकडील सात राज्यांतील पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच ‘एमएच-१४ रॉयल बुल्स’ मोटारसायकल क्लबने वाहतूक नियम आणि सुरक्षेच्या पालनास प्रोत्साहन देत ‘नो ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’, वृक्षारोपण, कारगिल शहिदांना मानवंदना देत सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे.
प्राधिकरण बांधणार साडेसहा हजार घरे
पिंपरी - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येत्या तीन वर्षांत आपल्या कार्यक्षेत्रात साडेसहा हजार परवडणारी व मध्यम स्वरूपाची घरे बांधणार आहे. वेगवेगळ्या पेठांमध्ये सुमारे पंधरा प्रकल्प राबविण्यात येणार असून, तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. पंधरापैकी वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक ३० व ३२ मधील ७९२ घरांचा प्रकल्प प्रगतिपथावर आहे, तर पेठ क्रमांक १२ मधील तीन हजार ४०० घरांसाठी कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) लवकरच देण्यात येणार आहे.
प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुंढे यांची नियुक्ती
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने एका विशेष अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती केली आहे. प्राधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडील अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून तो मुंढे यांच्याकडे सोपविला आहे. शुक्रवारी ते सूत्रे स्वीकारणार आहेत.
बीआरटीएसची लागली वाट, बॅरिकेड गेले चोरीला; रस्त्यावर पसरली खडी
निगडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटीएस मार्गात रस्त्याची, बसथांब्यांची, लोखंडी जाळ्यांची मोडतोड होऊन वाट लागली आहे. दापोडी ते निगडी हा बीआरटीएस मार्ग असून यावर ३२ थांबे आहेत. जुन्या ... किवळे : किवळे -सांगवीबीआरटी रस्ता किवळे ते रावेत दरम्यान रस्त्याची अत्यंत ...
पिंपरी पालिकेच्या वतीने हागणदारीमुक्त शहरासाठी २४४ ठिकाणी तात्पुरती शौचालये
पिंपरी-चिंचवड शहर हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना सुरू असताना, त्याचाच एक भाग म्हणून शहरभरात २४४ 'पोर्टेबल टॉयलेट' बसवण्यात आली आहेत. पालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांत मिळून उघडय़ावर शौचास ...
आधार कार्ड लिंक करण्यास ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ
चौफेर न्यूज – सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार कार्ड लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ होती. केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. महाधिवक्ता के. के. वेणुगोपालन यांनी सरकारच्यावतीने ही माहिती न्यायालयाला दिली.
ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही कामात हवे सातत्य
आमदार लक्ष्मण जगताप : एकनाथ पवार यांचे केले कौतुक
पिंपरी – कोणत्याही कामात सातत्य असल्यास यशस्वी होता येते आणि कोणतेही ध्येय गाठता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा वाढदिवसानिमित्त यमुनानगर येथील ठाकरे मैदान येथे नागरिकांसाठी स्नेहमिलन दिपावली फराळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते.
जिम्नास्टीकचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर
चिंचवड – महाराष्ट्र हौशी जिम्नास्टीक संघटना कृत पिंपरी-चिंचवड जिम्नास्टीक संघटनेच्या वतीने 27 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत ऐरोबिक जिम्नास्टीक खेळाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे
परांजपे करणार आणखी एका एसईझेडची उभारणी
हिंजवडी येथील ब्लू रिज टाऊनशिपजवळ साकारणार नवे एसईझेड
पुणे – बांधकाम क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परांजपे समूहाला आता आणखी एक एसईझेड (विशेष आर्थिक क्षेत्र) उभारण्यास परवानगी मिळाली आहे. हिंजवडी येथील ब्लू रिज टाऊनशिप जवळ हे एसईझेड साकारण्यात येणार आहे.
पुणे – बांधकाम क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परांजपे समूहाला आता आणखी एक एसईझेड (विशेष आर्थिक क्षेत्र) उभारण्यास परवानगी मिळाली आहे. हिंजवडी येथील ब्लू रिज टाऊनशिप जवळ हे एसईझेड साकारण्यात येणार आहे.
लोकसंख्येएवढीच वाहने
मंदीचा काळ असल्याची ओरड सातत्याने होत असली, तरी शहरांतर्गत प्रवासाची गरज म्हणून खासगी वाहनांच्या खरेदीला पिंपरी-चिंचवड शहरातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. यंदा दिवाळीच्या तीनच दिवसांमध्ये उपप्रादेशिक परिवहन ..
भाटनगर पुनर्वसन प्रकल्पाचे “स्ट्रक्चरल ऑडिट’
पिंपरी – भाटनगर पुनर्वसन प्रकल्पाला 27 वर्ष पूर्ण झाल्याने इमारतीला तडे गेले आहेत. बांधकाम जीर्ण झाल्यामुळे दुर्घटना घडल्यास इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकल्पातील एकूण 17 इमारतींचे संरक्षणात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येणार आहे. त्यास स्थायी समितीने आज (बुधवारी) मंजुरी दिली.
Thursday, 26 October 2017
'सारथी'ची दिशा भरकटू नये यासाठी काही ठोस उपाय!
'चारमितीय यंत्रणा' व 'सारथी २.०' याद्वारे सारथीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माननीय आयुक्तांनी मी दिलेल्या सदर सूचना तत्वतः मान्य केल्या आहेत. लवकरच यावर कालबद्ध कृतिआराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर नक्कीच सारथी यंत्रणेचे पुनरुज्जीविकरण करतील असा विश्वास वाटतो.
👉 सारथी २.० कल्पना काय आहे हे इथे जाणून घ्या https://goo.gl/dPU9Rp
Secure move: Civic body to install CCTVs at STPs, crucial junctions
Initially, the cameras will be installed at the A divisional office — comprising Queens Town, Sudarshannagar, New SKF colony, Bhoir colony, Empire Estate, Chinchwad station, Mohan Nagar, Aishwaryam Society, Jai Ganesh Vision, Bajaj Auto, Akurdi ...
आठ मिनिटांत पीएमपी चकाचक
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या १३ आगारांत बस धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ही यंत्रणा उभारली जाऊ शकते. त्यामुळे पीएमपीची बस अवघ्या सहा ते आठ मिनिटांत धुतली जाणार आहे.
PCMC places faith in 3 plans for garbage mess
Pimpri Chinchwad: The civic body expects the waste-to-energy, hotel waste processing and debris processing projects to reduce dumping of garbage at its Moshi depot. Municipal commissioner Shravan Hardikar said the three projects are a long-term ...
Punawale land to share Moshi’s load
Pimpri Chinchwad: The civic body will receive possession of the land in Punawale for its garbage processing project thereby reducing the burden on the Moshi depot, municipal commissioner Shravan Hardikar said.
कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची मंत्रालयातून दखल; राबविणार 'वेस्ट टू एनर्जी'
पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात आहे. मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत काळ्या यादीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य निलेश बारणे यांनी केला होता. याचे खंडन ...
लालफितीत अडकला समांतर पूल
पिंपरी - हॅरिस पुलावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याठिकाणी समांतर पूल उभारण्यासाठी सरकारी दफ्तरदिरंगाई कारणीभूत ठरली आहे. नव्या पुलासाठी बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू असले तरी यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे पुणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनामुळे या कामाला खो बसल्याचे वास्तव समोर आले आहे.
वाकडला होणार ‘सिग्नल फ्री’ प्रवास
पिंपरी - वाकड येथील वाय जंक्शन अर्थात भुयारी मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना ‘सिग्नल फ्री’ प्रवास करता येणार असून, येथील रोजच्या वाहतूक कोंडीतून त्यांची निश्चितच सुटका होणार आहे.
मेट्रोचा पहिला पिलर वल्लभनगरमध्ये पूर्ण
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी ते रेंजहिल्स या कामाचा पहिल्या पिलरचे काम पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर येथे पहिला पिलर उभारण्यात आला आहे. पहिला पिलर उभारण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागला असून, आगामी दीड ते दोन वर्षात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचा मानस ‘मेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. रॉय यांना आयुक्तांचा “डोस’
पिंपरी – महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी पदोन्नतीवरून थेट महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. प्रशासनावर आर्थिक देवाण-घेवाणीचे थेट आरोप केल्यामुळे त्याची तक्रार थेट केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचली. त्यामुळे महापालिकेची देशभरात बदनामी झाली. या कारणामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांचे औषध व साहित्य खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी डॉ. रॉय यांना ही एक प्रकारची शिक्षाच दिली असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे.
एमआयडीसीतील कचरा समस्येची प्रशासनाकडुन पाहणी
चौफेर न्यूज – भोसरी मधील पेठ क्रमांक दहामधील अग्निशमन केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीररीत्या सुरु केलेले कचरा विलगीकरण केंद्र तात्काळ बंद करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली होती. या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी औद्योगिक परिसराला भेट देत, विविध ठिकाणची पाहणी केली.
दहावी परीक्षेसाठी ‘आधार’ अनिवार्य
पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. त्यामुळे सध्या हा क्रमांक नसेल, तर निकालापर्यंत काढून देण्याचे हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे.
पथारीवाल्यांवरील कारवाई अन्यायकारक
पिंपरी – शहरातील स्थिर व्यवसायिकांची फेरीवाला अशी नोंद करत, महापालिका प्रशासनाने त्यांची दिशाभूल केली आहे. या चुकीच्या निकषांवर पथारीवाल्यांचा माल जप्त करुन दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा आरोप शिव व्यापारी सेनेचे उपशहरप्रमुख गणेश आहेर यांनी केला आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी
पिंपरी – डांगे चौक ते काळेवाडी फाटा ; तसेच सांगवी फाटा ते किवळे “बीआरटी’दरम्यानच्या रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली आहे.
तेलंग इन्स्टिट्यूटमध्ये पर्यटन पर्व साजरे
पिंपरी – कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जागतिक पर्यटन दिन पर्यटन पर्व म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यातून विद्यार्थ्यांनी देशातील विविध राज्यातील पर्यटन संस्कृतीचे दर्शन घडवले.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील अंतिम करार नोव्हेंबरपर्यंत होणार
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पासाठी तीन कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी एका कंपनीला हे काम देण्यात येईल. आता दुसऱ्या टप्प्यात यासाठी व्यावसायिक करार करण्यासाठी दिल्ली येथील एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून नोव्हेंबरपर्यंत याबाबत अंतिम करार करण्यात येणार आहे.
रिक्षा – टॅक्सी प्रवास महागणार , तीनशे पानी अहवाल सादर
चौफेर न्यूज – रिक्षा-टॅक्सींच्या भाडेदराचे सूत्र ठरववण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीने आपला 300 पानी अहवाल नुकताच सरकारला सादर केला. मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा, टॅक्सी सेवांसाठी किमान भाडेदरात एक रुपयांची वाढ करण्याची शिफारस तसेच ऍपआधारित टॅक्सी सेवांच्या चढ्या दरांवर अंकुश ठेवण्याची शिफारस या समितीने केली आहे. ऍप आधारित टॅक्सींसाठी चार ते पाच पटीच्या वाढीऐवजी दुप्पट भाडे वाढवण्याची शिफारसही समितीने केली आहे.
घर वाचविण्यासाठी रिंगरोड बांधितांचा वचननामा जाहिर
चौफेर न्यूज – रिंगरोडसाठी नागरिकांची घरे पाडू देणार नाही आणि याबाबत कायम बचनबद्ध राहण्याचा निर्धार घर बचाव संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. प्रत्येक घर वाचविण्याकरिता समिती वचनबद्ध राहणार असल्याचे सांगत संयोजकांनी या आंदोलनास बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवड येथे आयोजित एका बैठकीत घर बचाव संघर्ष समितीने याबाबतचा ‘वचननामा’ जाहीर केला आहे.
Wednesday, 25 October 2017
‘सारथी’कडे दुर्लक्ष
पिंपरी - नागरिकांना महापालिकेकडे तक्रार करता यावी आणि त्या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी ‘सारथी’ ही हेल्पलाइन सुरू केली. मात्र महापालिकेचे अधिकारी ‘सारथी’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असून, त्या परस्पर बंद करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे ‘सारथी’चा उद्देश पुरता फसला आहे.
पिंपरी पालिकेला कोटय़वधींचा चुना
पिंपरी-चिंचवडमध्ये जिकडे-तिकडे जाहिरात फलकांचा सुळसुळाट दिसत असला तरी, महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात जेमतेम दोन हजार फलक आहेत. वर्षांकाठी ५५ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकत असताना सद्य:स्थितीत अवघे आठ कोटी पालिकेच्या पदरात पडत ...
थकीत शास्तीकरमाफीसाठी सरकारकडे पाठपुरावा - हर्डीकर
|
'Regular' seal in sight for unauthorized constructions
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) commissioner Shravan Hardikar on Tuesday said the civic body has prepared samples of the application forms and printed those. "We have finalized the terms and conditions that the applicants have to fulfil ...
विकासकामांमुळे वाहतुकीवर ताण
पिंपरी - जगताप डेअरीतील साई चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे येथील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येत आहे. तो कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कस्पटे चौकात हाती घेतलेले रस्ता रुंदीकरणाचे कामही कूर्मगतीने सुरू आहे. येथील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत असून, महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत आयटीयन्स संतप्त झाले आहेत.
शहरबात पिंपरी-चिंचवड :'हप्तेगिरी'मुळे रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे सर्वाचीच डोळेझाक
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. भले मोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही वाहतुकीचे 'तीन तेरा' वाजले आहेत. वाहनस्वारांची बेशिस्ती, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता, हप्तेगिरी, ...
बांधकामे नियमितीकरणास स्वतंत्र कक्ष, नियमावलीविषयी नागरिक-नगरसेवकांचे करणार प्रबोधन
पिंपरी : अवैध बांधकामे नियमितीकरणाची अधिसूचना जारी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने या संदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुख्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना तयार ...
बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’च; भोसरीतून राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार
पिंपरी (प्रतिनिधी):- राज्यातील शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात ‘पेटा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. सत्ताधारी भाजप सरकार शर्यतीबाबत सकारात्मक आहे. पण, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’ आहे. या ‘पेटा’च्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
'टेस्टिंग ट्रॅक' पंधरा दिवसांत
वाहनांच्या फिटनेस टेस्टसाठी २५० मीटरचा टेस्टिंग ट्रॅक उभारण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सासवड भागातील दिवे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या नव्या ...
अतिरिक्त आयुक्तांची चार महिन्यांत बदली
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. मुख्याधिकारी संवर्गातील हांगे यांची लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून अवघ्या साडेचार महिन्यांत त्यांची पिंपरीतून ...
उद्योगनगरीतील आरोग्याचा राज्य सरकारकडून पंचनामा, नगरविकास मंत्र्यांकडून दखल; उपाययोजना करण्याचा महापालिका आयुक्तांना आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. महापालिकेतील आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शहराचे आरोग्य बिघडले आहे. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत १० महिन्यांच्या कालावधीत थंडी, ...
मंत्रिपदाची आवई सोशल मीडियावर, पक्षश्रेष्ठींनी शहरातील स्थानिक नेत्यांना ठेवले झुलवत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रथमच आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी पिंपरीला मंत्रिपद देण्यात येणार आहे, अशी चर्चा तीन वर्षांपासून सुरू आहे. मंत्रिपद मिळाले, अशी आवईही ...
Tuesday, 24 October 2017
पालकमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ
त्यांचे नाव पालिकेच्या प्रत्येक पत्रिकेत छापलेले असते, मात्र ते कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. सांगवी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हजेरी लावली. चिंचवड नाटय़गृहात झालेल्या 'गणेश फेस्टिव्हल'च्या कार्यक्रमासाठी ते आले होते.
सात हजाराहून अधिक घरे पिंपरी प्राधिकरण बांधणार
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून येत्या तीन वर्षांत विविध पेठांमध्ये सात हजारापेक्षा जास्त घरांची निर्मिती केली जाणार आहे. या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यामध्ये वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये सध्या ७९२ ...
विकासातही नागरी सहभाग, दहा लाखांपर्यंतची कामे शहरातील नागरिकांना सुचविता येणार
पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पुणे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्थानकही मेट्रोशी जोडणार
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलाही सामावून घेण्याचा निर्णय सोमवारी झाला. त्यामुळे मेट्रो स्थानकांभोवतालच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात आता रेल्वेचाही समावेश झाला आहे. परिणामी लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही दोन्ही शहरांतून धावणाऱ्या मेट्रोतून प्रवास करू शकतील.
खडीच खडी चोहीकडे; रस्ता गेला कुणीकडे?
पिंपरी - निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या सहा महिन्यातच चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबराचा थर पूर्णपणे निघून गेला असून त्याखालील खडी सर्वत्र पसरली आहे. परिणामी, दुचाकीस्वारांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
जागरूकता वाढली; प्रदूषण घटले
पिंपरी - शहरातील नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूकता आली असल्याचे चित्र दिवाळीदरम्यान पाहायला मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दोन ठिकाणी तीन ते चार डेसिबलने कमी झाल्याचे चाचण्यांमधून समोर आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी सांगितले.
पिंपरी शहरात आता पोर्टेबल टॉयलेट
पिंपरी - देशपातळीवर स्वच्छ शहर स्पर्धेत घसरलेला दर्जा सावरण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ऑटोमॅटिक टॉयलेट’नंतर पोर्टेबल टॉयलेटची मदत घेण्यात आली आहे. २२ लाख लोकसंख्येच्या शहरात अद्यापही उघड्यावर शौच केली जात असल्याने ‘ओडीएफ’च्या मार्गातील हा अडथळा दूर करण्यासाठी झोपडपट्ट्यांत ही पोर्टेबल टॉयलेट बसविण्यात आली आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता
पिंपरी – विविध गृहसंस्थांच्या आवारात, तसेच रस्त्यांवर फटाके वाजविल्यानंतर पसरलेला कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हटविला. गृह सोसायट्यांच्या लगतचा परिसर तसेच रस्त्यांच्या परिसराची साफसफाई करून कर्तव्य तत्परता दाखवून दिली.
'आरटीई'मधील प्रवेश नाकारले
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे 'आरटीई'चे प्रवेश नाकारल्याच्या २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विविध कारणांनी पंधरा शाळांनी 'आरटीई'अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत. या शाळांना शिक्षण मंडळाने नोटीस ...
पिंपरी-चिंचवड आरटीओ दलालमुक्त करणार, पूर्णानगर येथील कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
पिंपरी : पूर्णानगर येथील आरटीओमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर कामकाजात पारदर्शकता आणण्याचा कसोशीचा प्रयत्न सुरू केला आहे. हळूहळू बदल दिसून येत आहेत. दलालांचा सुळसुळाट झाल्याबद्दलचा मुद्दा उपस्थित ...
“त्या’ फेरीवाल्यांचे प्रमाणपत्र होणार रद्द
पिंपरी – राष्ट्रीय फेरीवाला धोरण कायद्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पात्र फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, आजही पात्र शेकडो फेरीवाल्यांनी नोंदणी प्रमाणपत्र नेलेले नाही. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र न घेऊन जाणाऱ्या पात्र फेरीवाल्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहे.
वैद्यकीय अधिकारी पदे भरणार, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची ५३ पदे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयास ...
शहराला मंत्रिपद मिळणार का?
शहरातील कोणा एकालाही मंत्रिपद मिळाले तरी चालेल, असे उसने अवसान आणणारे भाजपचे दोन्ही आमदार वास्तवात मात्र मंत्रिमंडळ विस्तारात खुर्ची पक्की करण्यासाठी प्रदेश पातळीवर आपापले वजन वापरू लागले आहेत. तर दुसरीकडे, पक्षात आले आणि ...
माजी महापौर आर.एस.कुमार यांचा पुन्हा भाजप प्रवेश
पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आर.एस.कुमार यांनी आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चिंचवड येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कुमार यांनी प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली होती. परंतू त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते.
दानवे पुन्हा घेणार झाडाझडती
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर भाजपच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी पदाधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन दिवाळीनंतर आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ही मुदत संपल्याने लवकरच ते पुन्हा आढावा बैठक घेणार आहेत.
परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या हाताला “लकवा’
पिंपरी – महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट वाढल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अशा फ्लेक्सवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 10 ते 11 कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके नेमली आहेत. तरीही, बेकायदेशीर फ्लेक्सची संख्या वाढतच चालली आहे. पूर्वीच्या एक हजार 849 फ्लेक्सपैकी एकाचीही नोंद नसल्याचे उघडकीस आले आहे. तरीही, हा विभाग कारवाई करण्याबाबत ढिम्म भूमिका घेत आहे. त्यामुळे आकाश चिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा झाला की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
'एमआयडीसी'तही कचराकोंडी
परंतु, औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसर मात्र स्वच्छ भारत अभियानापासून वंचित ठेवण्यात येतो, असा आरोप पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केला आहे. औद्योगिक परिसरातील कचरा वेळच्या वेळी ...
Monday, 23 October 2017
Pune: Network errors and confusion about filing make GST more complicated for many
A survey conducted by the GST Commissionerate among 600 assesses in Pune region has identified the major technical issues which need urgent attention from GSTN.
अठरा मीटरचा रस्ताच गायब
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४९ लाख रुपये खर्चून तयार केलेला काळेवाडीतील राजवाडेनगर परिसरातील अठरा मीटरचा रस्ता गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आला आ
How to link Aadhaar card with UAN number online
In big Diwali 2017 gift, EPFO makes it possible, here is how
EPFO has introduced a new facility for its members having Universal Account Number and other relevant details to link their respective UAN with Aadhaar online.
EPFO has introduced a new facility for its members having Universal Account Number and other relevant details to link their respective UAN with Aadhaar online.
More companies use Aadhaar to verify new hires
Employers are beginning to use Aadhaar to verify their potential employees, a move that could see the weeklong verification process reducing to less than 15 minutes, and hiring costs falling dramatically. It is also helping make the process paperless — no need to provide documents that show, say, the proof of residence. One of the country's largest private sector employers, contract staffing firm Quess, has onboarded more than 30,000 employees — blue collar and white collar — using Aadhaar verif ..
Even password protected Wi-Fi is unsafe, vulnerable to hacks: Researchers
Your password-protected Wi-Fi connection could be vulnerable to trespassing. Researchers Mathy Vanhoef and Frank Piessens from Belgium's KU Leuven University claim to have discovered a weakness in a Wi-Fi security protocol called WPA2 that leaves password-protected WiFi connections open to cyber-attacks and manipulation. The possible ramification of the startling discovery stretches worldwide from Allahabad to Auckland.
Subscribe to:
Posts (Atom)